सह्याद्री आणि महाराष्ट्र पठार निर्मिती | भुगोल भटकंती | Formation of Sahyadri and Maharashtra Plateau | Sahyadri Bhatkanti

भुगोल भटकंती सिरीज - सह्याद्री आणि महाराष्ट्र पठार निर्मिती

Formation of Sahyadri and Maharashtra Plateau

पृथ्वीच्या अंतर्भागात प्रचंड तापमान असते. त्यामुळे या भागातील सर्व पदार्थ वितळलेल्या स्वरूपात असतात. भूपृष्ठांच्या भेगांमधून काही वेळेस हे पदार्थ बाहेर येतात.  त्याला आपण ज्वालामुखी म्हणतो. ज्वालामुखीच्या उद्रेकातून लाव्हारस, वायू, धुलीकण, राख, इत्यादी पदार्थ बाहेर पडतात. लाव्हारसापासून मूळ खडक (basic rock) तयार होतात. 

ज्वालामुखीच्या उद्रेका दरम्यान भूपृष्टाखाली शिलारस (magma) आणि भूपृष्ठावर लाव्हारस थंड होत जाऊन त्‍यांचे घनीभवन होते. या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या खडकांना अग्निजन्य खडक (igneous rock) असे म्हणतात. अग्निजन्य खडक पृथ्वीच्या अतंर्गत भागातील पदार्थांपासून तयार होत असल्यामुळे त्यांना मूळ खडक असेही म्हणतात. बहुतांश अग्निजन्य खडक हे कठीण व एकजिनसी दिसतात. हे खडक वजनाने देखील जड असतात. अग्निजन्य खडकांमध्ये जीवाश्म (fossils) आढळत नाही. 

 महाराष्ट्र पठार आणि सह्याद्री अग्निजन्य खडकांनी बनले आहेत. या अग्निजन्य खडकांमध्ये बेसाल्ट हा प्रमुख खडक आहे. सुमारे ७० दशलक्ष वर्षापूर्वी दख्खनच्या प्रदेशात भूपृष्ठावर प्रचंड भेग पडून भ्रंशमुलक उद्रेक (destructive volcanic eruption) झाला आणि लाव्हारसाचे संचयन झाले. लाव्हारसापासून महाराष्ट्र पठार तयार झाल्याने त्यास "दख्खन लाव्हा" या नावानेही ओळखले जाते. लाव्हारसाचे अशा प्रकारचे संचयन सुमारे २९ वेळा उद्रेक होऊन सरतेशेवटी पठार तयार झाले. दख्खन पठाराच्या पश्चिम बाजूस विस्तीर्ण कडा आहेत व त्यापासून पश्चिम घाटाची (western ghat) निर्मिती झाली.

पाण्यावर तरंगणारा अग्निजन्य खडक (Rock which floates on water - Pumice Rock)

Pumice rock

प्यूमिस खडक (pumice rock) हा अग्निजन्य खडक आहे. ज्वालामुखीतून येणाऱ्या फेसापासून हा खडक तयार होतो. तो सच्छिद्र (porous) असतो. त्याची घनता कमी असल्याने तो पाण्यावर तरंगतो.

भुगोल भटकंती सिरीजमधी अन्य ब्लॉग वाचण्यासाठी भुगोल भटकंती येथे क्लिक करा.

#BhugolBhatkanti #deccanplateau  #sahyadribhatkanti #westernghat #sahyadri #sahyadrimountains 
Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu