घृष्णेश्वर मंदिर आणि मालोजीराजे भोसले | इतिहास भटकंती | Grishneshwar temple | Malojiraje Bhosale | Aurangabad | Sahyadri Bhatkanti

इतिहास भटकंती सिरीज - घृष्णेश्वर मंदिर आणि मालोजीराजे भोसले

ghrishneshwar temple , malojiraje bhosale

आज आपण जाणून घेणार आहोत घृष्णेश्वर मंदिराचा इतिहास आणि कोण होते मालोजीराजे भोसले!

घृष्णेश्वर मंदिर (Ghrishneshwar temple) हे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात प्रत्येक शिवभक्तांना ज्ञात असलेले शिवमंदिर आहे. जगप्रसिद्ध अश्या वेरूळ लेण्याच्या (Ellora Caves) अगदी जवळ आणि औरंगाबाद पासून ३० किमी अंतरावर हे मंदिर आहे.

Ghrishneshwar temple


महाराष्ट्रात जी पाच ज्योतिर्लिंग आहेत त्यांपैकी एक हे ज्योतिर्लिंग आहे ज्यामध्ये पुण्यातील भीमाशंकर (Bhimashankar), नाशिकमधीत्रंबकेश्र्वर (Trimbakeshwar), बीडमधीपरळी वैजनाथ (Parli Vaijanath), हिंगोलीमधीऔंढा नागनाथ (Aundha Nagnath) आणि औरंगाबादमधी घृष्णेश्वर (Ghrishneshwar) यांचा समावेश होतो.

Jyotirlingas of maharashtra

 एवढेच नव्हे तर देशामध्ये जी १२ ज्योतिर्लिंग आहेत त्यांपैकी एक हे ज्योतिर्लिंग आहे. एवढे हे महान दैवत आहे.

Jyotirlingas of India

आज आपण जे मंदिर पाहतो त्याची पुनर्बांधणी झाली होती 18 व्या शतकात. पण त्या अगोदर 16 व्या शतकात (1599 साली) ही त्याची पुनर्बाधणी झाली होती.

काय झाले होते तेव्हा? ते आपण जाणून घेणार आहोत.

सुमारे चारशे वर्षांपूर्वीची गोष्ट. वेरूळच्या लेण्यांजवळील घृष्णेश्वर मंदिर मोडकळीस आले होते. त्याच्या भिंतीना भेगा पडल्या होत्या. मंदिरातील पुजारीही मंदिर सोडून निघून गेला होता. एवढे महान दैवत! पण कोण अवकळा आली होती त्या मंदिरावर. त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटे. येणारे जाणारे ही हळहळत, उसासे सोडत, पण त्याच्या दुरुस्तीचा विचार कोण करतो?

त्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त नित्य नियमाने येत असे. शिवाच्या पिंडीवर बेलफुल वाहत असे. हात जोडून आपल्या मनातले श्री शिवाला सांगत असे. एक दिवस त्याने गडी माणसे आणली. मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या. मंदिराची सारी व्यवस्था लावली. घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिराच्या आत बाहेर दिवे लावले. घृष्णेश्वर मंदिराचे गेलेले वैभव परतले.

हे कोणी केले? कोण होते हे शिवभक्त? (Who was Malojiraje Bhosale!)

हे होते मालोजीराजे भोसले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा (Grandfather of Shivaji Maharaj)

Malojiraje bhosale

वेरूळ गावचे पाटील मालोजीराजे भोसले हे थोर शिवभक्त होते. विठोजीराजे (Vithojiraje Bhosale) त्यांचे धाकटे भाऊ. वेरूळच्या बाबजीराजे भोसल्यांची  (Babajiraje Bhosale) ही मुले.  वेरूळ गावची पाटीलकी बाबाजीराजे भोसले यांच्याकडे होती.

मालोजीराजे भोसले व विठोजीराजे मोठे कर्तबगार होते, तसेच ते शुर होते. त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते. तो काळ फार धामधुमीचा होता. निजामशाहावर उत्तरेच्या मुघल बादशहाने स्वारी केली होती. त्या वेळी दौलताबाद ही निजामशहाची राजधानी होती. तेथे मलिक अंबर नावाचा त्यांचा वजीर होता. तो मोठा कर्तबगार व हुशार होता. त्याने दौलताबाद जवळील वेरूळच्या भोसले बंधूची कर्तबगारी पाहिली. त्याने निजामशाह जवळ त्याच्या कर्तबगारीची वाखाणणी केली. निजामशहाने मालोजीराजेना पुणे व सुपे परगण्यांची जहागीर दिली.

भोसल्यांच्या घरी वैभव आले. उमाबाई ही मालोजीराजांची पत्नी. ती फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होती. या उभयतांना दोन मुलगे होते. एकाचे नाव शहाजी (Shahajiraje Bhosale) आणि दुसऱ्याचे नाव शरीफजी (Sharifji Bhosale). शहाजी पाच वर्षांचा असताना मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले. विठोजीराजांनी आपल्या पुतण्यांचा आणि जहागिरीचा सांभाळ केला.

आम्ही तुम्हाला विनंती करीत आहोत, जेव्हा कधी ही आपण औरंगाबाद मध्ये जाल, वेरूळ लेणी व घृष्णेश्वर मंदिराला भेट द्या तेव्हा तेथून अगदी जवळ असलेल्या मालोजीराजे भोसले यांची गढी आणि समाधी यांना भेट द्यायला विसरू नका.

Malojiraje gadhi and samadhi

ह्या सिरीज मधील अन्य ब्लॉग वाचण्यासाठी इतिहास भटकंती येथे क्लिक करा.

औरंगाबाद/संभाजी नगर जिल्ह्यातील अन्य ब्लॉग वाचण्यासाठी औरंगाबाद/संभाजी नगर येथे क्लिक करा.

#ItihasBhatkanti #ghrishneshwartemple #ghrishneshwar #elloracaves #aurangabad  #sahyadribhatkanti
Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu