कोथळीगड (पेठ किल्ला) | माहिती भटकंती | Kothaligad Fort (Peth Fort) | Karjat | Raigad | Sahyadri Bhatkanti

माहिती भटकंती सिरीज - कोथळीगड (पेठ किल्ला)

Kothaligad (peth fort)

किल्ला हा कर्जत तालुका, रायगड जिल्ह्यात येत असून पायथ्याच्या अंबिवली (Ambivali village) या गावातून सोप्या श्रेणीचा ट्रेक करत आपण गडावर जाऊ शकता. पायथी असलेल्या पेठ (Peth Fort) या गावावरून किल्ल्याला पेठचा किल्ला म्हणून देखील ओळखले जाते. किल्ल्याची उंची ही 3100 फूट एवढी असून पायथा ते गडमाथा गाठण्यास 2 तासाचा अवधी लागतो. जवळील रेल्वे स्टेशन कर्जत असून तेथून बस किंवा टमटम करत आपण अंबिवली येथे जाता येते. 

किल्ल्याला भेट देण्याचा सर्वोत्तम हंगाम पावसाळा आहे. येथील निसर्गाचे विहंगम दृश्य आपल्याला तेव्हा येथे पाहायला मिळेल. किल्ल्याच्या उत्तरेला पदरगड किल्ला (Padargad Fort) असून त्यापुढे भीमाशंकर ज्योतिर्लिंग देवस्थान (Bhimashankar Jyotirlinga) आहे. 

किल्ल्यावरील भेट देण्याची ठिकाणे - तोफा, प्रचंड खडकात कोरलेली गुहा, पाण्याच्या टाक्या, अंतर्गत कातळकोरीव पायऱ्या, इत्यादीचा समावेश आहे. गडाचे वैशिष्ट म्हणजे त्याचा आकार उलटा फनेल सारखा आहे.

मुंबई, पुणे, रायगड, ठाणे जिल्ह्यातील भटकंती प्रेमींसाठी एक दिवसीय ट्रेकसाठी उत्तम ठिकाण.

माहिती भटकंती सिरीज मधील अन्य ब्लॉग्स वाचण्यासाठी माहिती भटकंती येथे क्लिक करा.

रायगड जिल्ह्यातील अन्य ब्लॉग वाचण्यासाठी रायगड येथे क्लिक करा.

#MahitiBhatkanti #pethfort #kothaligad #karjat #raigad #sahyadribhatkanti
Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu