जिओटॅग भटकंती सिरीज - सप्तश्रृंगी गडावरून दिसणारे किल्ले
कुटुंबासोबतची सहल किंवा कोठे फिरायला जाणे म्हंटला की नक्कीच ते ठिकाण एक देवस्थान असते. जवळपास सात वर्षापुर्वी आम्ही सप्तश्रृंगगड, नाशिक येथे गेलो होतोत. दर्शन घेऊन खाली आल्यावर समोरील पठारावर विसावा घेत असताना हा फोटो क्लिक केला. तेव्हा कुठलीही कल्पना नव्हती की आपल्या समोर सह्याद्रीची एवढी मोठी देण दिसत आहे. पण आज मात्र परत तिथे जाऊन हेच दृश्यं पाहावयाची चाहूल लागते. सप्तश्रृंगगड येथून आपल्याला सहज नजरेस पडेल मार्कण्डेय किल्ला (Markendey Fort), रवळ्या - जवळ्या किल्ला, धोडप किल्ला (Dhodap Fort), छोटा बंड्या, मोठा बंड्या आणि वातावरण स्वच्छ असेल तर इंद्राई किल्ला (Indrai Fort) देखील पाहू शकता.
नाशिक जिल्ह्यातील अन्य ब्लॉग वाचण्यासाठी नाशिक येथे क्लिक करा.
#saptashrungi #ravlyafort #javlyafort #chotabandya #mothabandya #dhodapfort #markandeyfort #sahyadribhatkanti #nashik
0 Comments