काळदुर्ग किल्ला | माहिती भटकंती | Kaldurg Fort | पालघर | Information blog | Palghar | Sahyadri Bhatkanti

माहिती भटकंती सिरीज - काळदुर्ग किल्ला

Kaldurg fort

काळदुर्ग किल्ल्याची (Kaldurg Fort) सर्वसाधारण माहिती आम्ही शेअर करत आहोत. पालघर स्थानक पासून अगदी 6 किमीच्या अंतरावर हा किल्ला आहे. किल्ला समुद्रसपाटीपासून (Height of the Kaldurg Fort) 1500 फूट उंचीवर असून पायथा ते गडमाथा गाठण्यास सुमारे एका तासाचा वेळ लागतो. हा एक उत्तम जंगल ट्रेक असून सर्वोत्तम हंगाम हा पावसाळा आहे. ट्रेक सोप्या श्रेणीत (Easy Grade) व कमी सहनशक्ती पातळी मध्ये येतो. पायथ्याचे गाव म्हणजे वाघोबा मंदिर (Base village - Waghoba Temple) येते आपण पालघर स्थानकापासून सहज एस टी किंवा टमटम द्वारे पोहचू शकता. वाघोबा मंदिर येथे पुष्कळ माकडे आहेत त्यामुळे त्यांच्यापासून सावधानता बाळगावी.

गडाचे वैशिष्टय आणि पाहण्याची ठिकाणे

गडाचा माथा चौकोनाकृती असल्यामुळे जवळपासच्या ठिकाणावरून गड सहज ओळखला जातो. अर्ध्या एकरापेक्षा ही लहान गडमाथा असून टेहळणीसाठी गडाचा उपयोग होत असावा. पाण्याच्या टाक्या (दोन) व गडमाथ्यावर जाण्यासाठी काही पायऱ्याही एवढेच मानवनिर्मित काम गडावर आहे.
 
गडाच्या पश्चिमेस अरबी समुद्र, उत्तरेस देवखोप धरण व त्यामागे असावा किल्ला (Asawa fort), ईशान्येस अशेरीगड (Asherigad fort), पूर्वेला समांतर वाहणारी सूर्या नदी व त्यामागे कोहोज किल्ला (Kohoj fort) आणि दक्षिणेला काही डोंगराची रांग व तांदुळवाडी किल्ला (Tandulwadi fort) आहे. गडमाथा लहान असला तरी आपल्याकडे टेन्ट असेल तर आपण येथे रात्री राहू शकता.

पूर्ण ट्रेक ब्लॉग वाचण्यासाठी काळदुर्ग किल्ला येथे क्लिक करा.

माहिती भटकंती सिरीज मधील अन्य ब्लॉग वाचण्यासाठी माहिती भटकंती येथे क्लिक करा.

पालघर जिल्ह्यातील अन्य ब्लॉग वाचण्यासाठी पालघर येथे क्लिक करा.

#kaldurg #kaldurgfort #waghobamandir #palghar #MahitiBhatkanti #sahyadribhatkanti
Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu