Virtual Bhatkanti सिरीज
रायगड किल्ल्याला एक दिवसाची भेट देणार असाल तर तेथील पाहायच्या ठिकाणची माहिती असणे व त्यासाठी लागणारा वेळ ह्यांचे गणित जमणे अत्यंत गरजेचे आहे. वीस पेक्षाही जास्त ठिकाणांचे अंदाजित स्थान मी वरील व्हिडिओ मध्ये मार्क केले आहे. २०१९ पावसाळ्यामध्ये एक दिवसाची आमची भेट असल्या कारणाने जास्तीत जास्त ठिकाणांना भेट द्यावी असे वाटत होते पण मुंबई ते रायगड हा प्रवासाला आम्हाला खराब रस्त्यामुळे येताना आणि जाताना दोन्ही वेळेस जवळपास ६ तास लागले. त्यामुळे मुसळधार पाऊस व धुक्यामध्ये गड चढून जास्तीत जास्त ठिकाणांना भेट देऊन परत पायथ्याला येणे हे आम्ही अवघ्या ६ तासात केले. त्यामुळे काही ठिकाणांना भेट देता आली नाही ज्यात प्रामुख्याने राजमाता जिजाऊ यांची समाधी व वाडा, हिरकणी बुरूज, वाघ दरवाजा, बारा टाकी, अंधेऱ्या लेणी, निसणीची गुहा, भवानी कडा ही काही आहेत
ह्या सिरीज मधील अन्य ब्लॉग वाचण्यासाठी Virtual Bhatkanti येथे क्लिक करा.
#raigadfort #pachad #raigad #geotags_bhatkanti #sahyadri_bhatkanti #maharashtra_bhatkanti #bharat_bhatkanti #maharashtratourism #sahyadri_unlimited #maharashtraforts #sahyadri_tourism #sahyadri #westernghat #sahyadrimountains #trekkings #trekking_in_sahyadris #gadkille #bhatkanti
0 Comments