निसर्गरम्य मुळशी | मुंबई ते पुणे | Unlock Roadtrip | Mulshi |Mumbai to Pune | Travel Vlog

मुंबई ते पुणे प्रवास

मुळशी mulshi

कोरोना Unlock मध्ये मुंबई पुणे मुंबई असा प्रवास (road trip) झाला आणि एवढे महिने झाले, ट्रेकिंग जरी करता नाही आली तरी मार्गातील किल्ले, पर्यटन स्थळे यांना पाहता आले. ह्या ब्लॉग मध्ये मुंबई ते पुणे असा प्रवास समाविष्ट केला आहे व त्याचबरोबर मुळशी येथे मुक्काम असल्या कारणाने तेथील एका टेकडीवर केलेला ट्रेक देखील ह्या ब्लॉग मध्ये समाविष्ट केला आहे.

आपल्याला हाच ब्लॉग यूट्यूब वर पहायचा असेल तर त्याची लिंक शेवटी देण्यात आली आहे. त्याचबरोबर पुणे ते मुंबई ह्या प्रवासाचा ब्लॉग व vlog ची लिंक देखील आपल्याला खाली मिळेल.

मुंबई (घाटकोपर) पासून संध्याकाळी ५ वाजता आमचा प्रवास सुरू केला व मुंबई पुणे जुना महामार्गाने रात्री ९:३० वाजता आम्ही सुस, मुळशी, पुणे येथे पोहचलो. आमचा प्रवास पुढीलप्रमाणे -

घाटकोपर - मानखुर्द - नवी मुंबई - पनवेल - चौक - खालापूर - खोपोली - खंडाळा - लोणावळा - कामशेत - देहू रोड - सूस (मुळशी)

पनवेल येथे अजिवली गावाजवळ पोहचताच आम्हाला पहिले दर्शन झाले ते कलावंतीण दुर्ग, प्रबळगड आणि इर्शाळगडाचे (Kalavantin durg, Prabalgad and Irshalgad).

कलावंतीण दुर्ग प्रबळगड इर्शाळगड

तेथून पुढे अजिवली गावात येताच आपल्याला डाव्या बाजूला मार्ग दिसेल जो कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगड ट्रेकसाठी जातो तर सरळ गेले असता चौक जवळ, मोरबे धरण पासून डावीकडे मार्ग आहे जो इर्शालवाडीला जातो जे इर्शाळगडाचे पायथ्याचे गाव आहे.
Ajivali irshalgad

मित्रांनो आपल्याला माहितच असतील नेताजी पालकर (Netaji Palkar) ज्यांना प्रतिशिवाजी म्हणूनही ओळखले जाते, त्यांचे जन्मगाव हे चौक. गावात पोहचताच आपल्याला उजवीकडे गावचे प्रवेशद्वार दिसेल ज्यावर "नेताजी पालकर यांचे जन्मगाव" असे लिहिले आहे. 

नेताजी पालकर यांचे जन्मगाव

खोपोली येथे पोहचताच आणखी एका ठिकाणाने लक्ष वेधून घेतले ते म्हणजे खोपोली येथील एका चौकात, मुंबई पुणे मार्गाशी लागून असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा. 

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, खोपोली

त्यानंतर अंधार झाल्या कारणाने फोटो वगेरे काढता नाही आले पण वातावरण मात्र अत्यंत छान होते. एवढ्या दिवसानंतर भटकंतीचा आनंद घेता येत होता. त्यात खंडाळा घाट मधून गाडी चालवण्याची मज्जा काही औरच! खंडाळा लोणावळा ओलांडून आम्ही कामशेत - देहू रोड मार्गे मुळशी तालुक्यातील सुस गावी (पाषाण रोड) येथे पोहचलो. तेथे माझ्या मावशीच्या घरी मुक्काम करून सकाळी सहाला उठून मागेच असलेल्या एका टेकडीवर जायचे आम्ही ठरवले. वाटला नव्हता पण एक अविस्मरणीय असा ट्रेक मला तिथे करता आला. जवळपासच्या परिसरातील ते सर्वोच्च ठिकाण असावे कदाचित. येथील काही प्रसिद्ध ठिकाणांबद्दल बोलायचे झाल्यास जवळच मुळा नदी, लुपिन संशोधन सेंटर (Lupin Research Centre), सिम्बायोसिस विद्यापीठ (Symbiosis University), इत्यादी आहेत. 
 
रात्री आल्यामुळे मावशीच घर, जवळचा परिसर, शेत व्यवस्थित पाहिलं नव्हतं तर ते आधी सकाळी उठून बघितले. मस्त रम्य अशी सकाळ आणि त्यात पक्ष्यांचे आवाज ऐकू येत होते. मोरांची संख्या येथे खूप जास्त आहे. मी सकाळी एक मोर पाहिला खरं पण कॅमेरा मध्ये टिपता आला नाही.

टेकडी जाण्याच्या वाटेवर आम्ही पोहचलो व थोडेसे वर चढलो की एक फोटो आजूबाजूच्या परिसरातील आम्ही टिपला त्यात आपल्याला पहाट किती रम्य होती ते दिसेल

मुळशी

अश्याच आनंदमय पहाटे ट्रेक करायला नेहमी आवडते. ना पावलांना थकवा जाणवतो आणि ना अंगातील ऊर्जा कमी पडते. 

मुळशी

भटकंती प्रेमींसाठी असे वातावरण जणू स्वर्गातच आल्याची भावना. भटकंती बऱ्याच प्रकारची असते, त्यापैकी प्रत्यक्ष पायपीट ही माझ्या आवडीची.

मुळशी

पूर्ण मार्गात आजूबाजूला फक्त हिरवळ, थंडगार वारा आणि पक्षांचे आवाज. टेकडीवर बऱ्यापैकी धुके देखील होते व त्याठिकाणी भगवा झेंडा देखील होता.

मुळशी

जसे जसे वर जाऊ लागलो तसे लक्षात आले की जी टेकडी अगदी लहान वाटत होती त्यावर पोहचायला आम्हाला जवळ पास एक तास लागला. एक टेकडी चढून गेल्यावर लगेच पुढे अजुन एक टेकडी अस करत चार टेकडी चढून गेल्यावर आम्ही तेथील सर्वोच्च ठिकाणी पोहचलो.

मुळशी

येथे पोहचून नजर आजूबाजूला फिरवून जो नजारा पाहायला मिळाला तो शब्दात मांडता खरंच अवघड. आपल्या सोबत त्या क्षणांची काही फोटो खाली शेअर केली आहेत. तेव्हाच मला ह्या ब्लॉगला "निसर्गरम्य मुळशी" हे समर्पक असे नाव सुचले.

मुळशी
मुळशी

ह्याच ब्लॉगचा यूट्यूब व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई ते पुणे प्रवास येथे क्लिक करा

आमचा पुढील प्रवास म्हणजे पुणे ते मुंबई हा ब्लॉग वाचण्यासाठी पुणे ते मुंबई प्रवास येथे क्लिक करा.

मुंबई व पुणे ह्या जिल्ह्यातील अन्य ब्लॉग वाचण्यासाठी मुंबईपुणे येथे क्लिक करा.

Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu