इरशाळगड ट्रेक माहिती | पनवेल | रायगड | Irshalgad fort trek info | Panvel | Raigad

माहिती भटकंती सिरीज 

Irshalgad trek

प्रसिद्ध अश्या कलावंतीण दुर्गच्या शेजारीच असलेला हा इर्शाळगड, त्या बद्दलची थोडक्यात माहिती शेअर करत आहे.

इर्शाळगड हा रायगड जिल्ह्यात येत असून चौक येथील माणिवली गावातून हा ट्रेक चालू होतो. मुंबई पुणे जुना महामार्गावर चौक जवळ आपल्याला मोरबे धरण येथे जाण्यासाठी मार्ग आहे आणि त्याच मार्गाने आपण किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचतो. आपण पनवेल किंवा कर्जत स्थानकातून चौकसाठी बस घेऊ शकता व तेथून १५-२० मिनिटात चालत गेलात तर आपण माणिवली गावात पोहचाल. इर्शाळगडाची उंची ३७०० फूट असून पायथा ते किल्ला जाण्यासाठी दोन तासाचा वेळ लागेल. ट्रेक मध्यम श्रेणी व सहनशक्ती पातळीमध्ये येतो. 

गडाचे वैशिष्टय म्हणजे नेढे म्हणजेच खडकातील निसर्गनिर्मित छिद्र. आपण नेढे पर्यंत सहज जाऊ शकता पण गडाचे सर्वोच्च ठिकाण म्हणजे इर्शाळगड सुळका सर करण्यासाठी गिर्यारोहण कौशल्याची गरज आहे. 

गडाच्या उत्तरेस कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगड आहे तर ईशान्येस माथेरान आहे. गडावरून पश्चिमेकडे मोरबे धरणाचे छान दृश्य आपल्याला दिसेल व त्यापलीकडे आहे सोंडाई किल्ला.

गडाला भेट देण्यासाठी सर्वोत्तम हंगाम हा पावसाळा संपल्या नंतरचा पण पावसाळ्यातही आपण जाऊ शकता (योग्य ती काळजी घ्यावी)

नवख्या ट्रेकर पासून (नेढे कडे जाणारा शेवटचा चढ वगळता) ते नियमित ट्रेकर (नेढे पर्यंत) ते सुळका पर्यंत (गिर्यारोहण कौशल्य), असा हा सर्वांनी नक्की भेट द्यावा.

#irshalgad #panvel #raigad #MahitiBhatkanti #sahyadribhatkanti 

Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu