थोडक्यात माहिती
आज आधुनिकतेचा चेहरा लाभलेल्या मुंबईला फक्त अर्थ कारणासाठी पाहिले जाते परंतु काही ऐतिहासिक, सांस्कृतिक किंवा धार्मिक पार्श्वभूमी असलेल्या वास्तू आपले पुरातन नावलौकिक अजूनही सांभाळून आहेत. त्यापैकी बाणगंगा तलाव (Banganga Tank) आणि वाळकेश्र्वर मंदिर संकुल (Walkeshwar Temple Complex, Malbar hills) हे म्हणजे पर्यटक, अभ्यासक आणि भाविकांना नेहमीच खुणावत असते.
मुंबई विमानतळाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारकाला भेट देऊन आम्ही आज निघालो दक्षिण मुंबईतील बाणगंगा (Banganga, Walkshwar, Malbar hill) येथे. ह्याच ब्लॉगचा यूट्यूब व्हिडिओ पाहण्यासाठी खाली लिंक देण्यात आली आहे.
बाणगंगा येथे कसे याल! (how to reach Banganga tank?)
आपण येथे स्वतःची गाडी घेऊन येऊ शकता किंवा चर्नी रोड आणि ग्रँट रोड या पश्चिम रेल्वेवरील स्थानकापासून टॅक्सी करून देखील बाणगंगा येथे येऊ शकता.
बाणगंगा तलाव ही आयताकृती पाण्याची टाकी असून तलाव परिसरात पुष्कळ मंदिरे आहेत. तलावाच्या आत उतरण्यासाठी चहू बाजूंनी दगडी पायऱ्या आहेत. तलावाकडे येण्यासाठी बरेच प्रवेश मार्ग असून आत दिवे लावता येतील असे बरेच खांब (pillars) देखील आहेत. तलाव हा एका झऱ्या मार्फत भरला जात असून तलावात मासे देखील आहेत.
त्याचबरोबर पुष्कळ बदकही आपल्याला येथे पाहायला मिळतील.
तलावाच्या दक्षिण बाजूस काही दगडी वास्तू, कोरीव मूर्ती यांचे अवशेष देखील आहेत.
बाणगंगेची उत्पत्ती, पौराणिक महत्त्व, इतिहास आणि काही व वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी (Origin of Banganga, Mythological significance, History and some special features )
बाणगंगा उत्पतीचा थेट रामायण काळाशी संबंध सांगितला जातो. प्रभू श्रीराम सीता मातेच्या शोधात असताना येथे आले होते व त्यांनी जमिनीवर बाण मारून भूमिगत गंगेच्या पाण्याचा झरा येथे निर्माण केला आणि म्हणूनच हे ठिकाण बाणगंगा म्हणून प्रसिद्ध झाले. ज्या ठिकाणी बाण सोडला ते ठिकाण टाकीच्या मध्यभागी एका खांबाद्वारे चिन्हांकित केलेले आहे.
परिसरातील वाळुकेश्र्वर मंदिरातील शिवलिंग प्रभू श्रीराम यांनी वाळू पासून बनवले असून त्यामुळे वाळुकेश्र्वर हे नाव पडल्याचे देखील सांगितले जाते. काळाच्या ओघात वाळुकेश्र्वर हे नाव वाळकेश्र्वर झाले असावे.
बाणगंगा तलाव हे वाळकेश्र्वर मंदिर संकुलाचे वैशिष्टय आहे जे ११२७ मध्ये सिल्हारा राजवंशाने बनवले होते व त्यानंतर परिसराचे नुतनीकरण १७१५ मध्ये झाले.
बाणगंगा बद्दल एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे काही अंतरावरच समुद्र असून देखील तलावात गोडे पाणी आहे.
बाणगंगा महाआरती व तलाव परिसर (Banganga Festival)
बाणगंगा व वाळकेश्र्वर मंदिर संकुलाची देखरेख हे GSB (गौड सारस्वत ब्राह्मण) मंदिर ट्रस्ट करत असून ट्रस्ट कडून बऱ्याच वर्षांपासून येथे दीपोत्सव साजरा केला जातो. २०१६ पासून ट्रस्ट येथे बाणगंगा महाआरती आयोजित करते जी आपल्याला वाराणसी येथे होणाऱ्या गंगा पूजेचा अनुभव देईल. म्हणूनच ह्या ठिकाणाला लहान वाराणसी (mini varanasi) देखील बोलले जाते.
तलाव परिसरात परशुराम मंदिर, श्रीराम मंदिर, सिध्देश्वर मंदिर, हनुमान मंदिर, काशी मठ, विठोबा रखुमाई मंदिर, वाळूकेश्र्वर मंदिर, लक्ष्मी नारायण मंदिर, गणपती मंदिर, रामेश्वर मंदिर अशी बरीच मंदिरे आहेत.
पौराणिक महत्त्व, धार्मिक स्थळ, पितृ पक्ष, श्राद्ध इत्यादी कारणांमुळे पर्यटक, भाविक , अभ्यासक ह्या तलावाला रोज भेट असतात. विशेष म्हणजे सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय भगतसिंह कोश्यारी यांनी देखील २०१९ मध्ये बाणगंगा तलाव परिसराला भेट दिली होती.
ध्वनी प्रदूषणामुळे ग्रासलेल्या मुंबई शहरात दुर्मिळ शांतता व प्रसन्नता आपल्याला येथे अनुभवायला मिळेल.
महाराष्ट्रातील धार्मिक पर्यटनाला चालना देणाऱ्या या ठिकाणाला आपण नक्की भेट द्या
बाणगंगा येथे भेट दिल्यानंतर आम्ही थोडे चालून समुद्र किनारी आलो. येथून अथांग असा अरबी समुद्र आणि राजभवन आपल्याला पाहायला मिळेल. येथे येताना थोडी सावधानता बाळगावी.
त्याचबरोबर जवळच असलेल्या हँगिंग गार्डन (hanging garden), कमला नेहरू पार्क (Kamla nehru park) व प्रियदर्शिनी पार्क (priyadarshini park) यांना देखील आपण भेट देऊ शकता.
ह्याच माहितीचा आपल्या यूट्यूब व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
मुंबई मधील अन्य पर्यटन स्थळांचा ब्लॉग वाचण्यासाठी मुंबई येथे क्लिक करा.
#banganga #walkeshwar #marathivlogs #sahyadribhatkanti #travelvlog #trekvlog #trekking #vlogging #travelvlogs #maharashtratourism #maharashtraforts #sahyadri #marathivlogger #bhatkanti
जय शिवराय 🚩
0 Comments