आज आपण भटकंती करत निघालो आहोत, गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार असलेला ठाणे जिल्ह्यातील घोडबंदर किल्ला.
घोडबंदर किल्ल्याला (Ghodbunder fort) सुमारे ५०० वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. पोर्तुगिज, मराठा व ब्रिटिश असे तिन्ही सत्ता पाहिलेला असा हा किल्ला. ह्या ब्लॉग मध्ये आपल्याला किल्ल्याची बरीच माहिती मिळणार आहे ज्यात किल्ल्याला कसे जायचे, किल्ल्यातील पाहण्याची ठिकाणे, संवर्धनाचे काम, किल्ल्याचा इतिहास, जवळील ठिकाणे यांना समाविष्ट केले आहे.
घोडबंदर किल्ल्याचा यूट्यूब व्हिडिओ पाहायला आवडत असेल त्याची लिंक शेवटी देण्यात आली आहे.
आम्ही Western Express Highway म्हणजेच पश्चिम द्रुतगती महामार्गाने मीरा भाईंदर येथे पोहचून, घोडबंदर रोडमार्गे अगदीच दोन किलोमीटर नंतर घोडबंदर गावात पोहचलोत. येथून डावीकडे मार्ग आपल्याला काही मीटर अंतरावरच किल्ल्यापर्यंत घेऊन जाईल.
सध्या किल्ल्याचे संवर्धनाचे काम चालू असून त्याचे संकल्पचित्र येथे लावण्यात आले आहे.
घोडबंदर किल्ल्याला सुमारे पाचशे वर्षाचा ऐतिहासिक वारसा आहे. सध्या हा किल्ला राज्य संरक्षित किल्ला म्हणून महाराष्ट्र्र वैभव राज्य संरक्षित स्मारक या योजनेअंतर्गत संगोपनार्थ दत्तक घेतलेला आहे. या किल्ल्याचे संवर्धन, संरक्षण आणि सुशोभीकरण मीरा भाईंदर महानगरपालिका करीत आहे.
आशा आहे कि काम लवकरच संपेल व आता पर्यंत दुर्लक्षित राहिलेला हा किल्ला पर्यटनाचे एक आकर्षण बनेल.
ऐतिहासिक दृष्ट्या पाहता, सागरावर आपली सत्ता राहावी या कारणाने पोर्तुगीजांनी बांधलेल्या किल्ल्यांपैकी हा एक व वसई खाडीच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाचा असा हा किल्ला. पोर्तुगीजाकडून १७३७ साली मराठ्यांनी तो जिंकला व १८१८ मध्ये तो इंग्रजांच्या ताब्यात गेला. ब्रिटिश राजवटीत ह्याच किल्ल्यातून ठाणे जिल्ह्याचे प्रशासकीय कामकाज चालत असत.
त्याकाळी येथे घोड्याचा व्यापार चालत असल्याने कारणाने किल्ल्याचे नाव घोडबंदर पडले असावे असे सांगितले जाते.
किल्ल्यावर पाहण्याच्या ठिकाणांमध्ये कमानी, बांधकामाचे काही अवशेष, तटबंदीचे अवशेष, बुरुज व पाण्याची टाकी ह्यांचा समावेश होतो.
पण दुर्लक्ष व वनस्पतीमुळे किल्ल्याची बरीच पडझड झाली आहे.
किल्ल्याच्या एकमेव बुरुजावर जाताना आपल्याला बुरुजाच्या प्रवेशद्वारात फट दिसेल जेथे लोखंडी किंवा लाकडी दार सहज सरकवले जाऊ शकते जेणेकरून बुरुजावर प्रवेश बंद होईल. आपण पहिले असेल कि बहुतेक किल्ल्याच्या बुरुजावर जाण्यासाठी बाहेरून जिने असतात परंतु येथे आतून जिने आहेत. जिन्यावरून बुरुजावर जात असताना उजव्या बाजूला एक खोली आहे जिचा वापर शक्यतो अन्नधान्य किंवा दारुगोळा साठा यासाठी होत असावा.
बुरुज माथा हे गडाचे सर्वोच्च ठिकाण असून येथून वसई खाडी नजरेस पडते व मुख्यतः खाडीवर नजर ठेवण्यासाठीच हा किल्ला बांधण्यात आला.
बुरुजावरून किल्ल्याच्या उत्तरेला असलेल्या वसई खाडीचे विहंगम दृश्य आपल्याला दिसेल, तर पूर्वेला जवळच पोर्तुगीज कालीन चर्च आणि दक्षिण व पश्चिमेला मीरा भाईंदर शहर आहे.
किल्ल्याच्या मध्यातून बुरुजाच्या विरुद्ध बाजूस गेले असता दुर्लक्ष व वनस्पतींमुळे पडझड होत असलेली तटबंदी आपण पाहू शकाल.
घोडबंदर किल्ल्याचा यूट्यूब व्हिडिओ पाहायला आवडत असेल खालील लिंक वर क्लिक करा व "सह्याद्री भटकंती" ह्या आपल्या चॅनेलला subscribe देखील करा.
व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट्स आणि शेयर करा.
आमच्या नियमित पोस्टसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल
https://t.me/sahyadribhatkanti
किंवा
फॉलो करा आम्हाला
फेसबुक- https://www.facebook.com/sahyadribhatkanti
इंस्टाग्राम- https://www.instagram.com/sahyadribhatkanti
ट्विटर- https://twitter.com/sahyabhatkanti
#ghodbunderfort #ghodbunder #thane #marathivlogs #sahyadribhatkanti #travelvlog #trekvlog #trekking #vlogging #travelvlogs #maharashtratourism #maharashtraforts #sahyadri #marathivlogger #bhatkanti
जय शिवराय 🚩🙏🏻
0 Comments