जय शिवराय मित्रांनो,
आज आपण भटकंती करत निघालो आहोत नवीन पनवेल मधील आदई धबधब्याला (Adai waterfall, new panvel).
जर आपल्याला "आदई धबधबा" यूट्यूब vlog पाहायचा असेल तर लिंक शेवटी देण्यात आली आहे
कसे जाल?
घाटकोपर, मुंबई येथून मी मानखुर्द - वाशी - नवी मुंबई - कळंबोली जंक्शन व त्यानंतर पनवेल कडील मार्ग पकडून नवीन पनवेल येथे आलो. जर आपण रेल्वेने येणार असाल तर पनवेल जंक्शन हे जवळील रेल्वे स्थानक आहे व तेथून अगदी ४ किमी अंतरावर हा धबधबा आहे.
पाहण्याची ठिकाणे / पूर्ण माहिती / अनुभव
नवीन पनवेल येथे पोहचल्यावर सर्वात आधी मी नवीन पनवेल तलावाला (new panvel lake) भेट दिली
तलाव शेजारी डावीकडील मार्ग आपल्याला आदई पुल (मुंबई पुणे महामार्ग वरील पुल) वरून आदई गावात (Adai village) घेऊन जाईल
पुल ओलांडल्यावर माझी नजर गेली ती जवळील काही सुळक्यावर आणि येथून मला इर्षाळगड (irshalgad), कलावंतीण दुर्ग (Kalavantin Durg) व प्रबळगड (Prabalgad) सहज नजरेस पडत होते.
आदई गावातील तलावाला देखील मी भेट दिली
गावातून धबधबा कडे जाणारा मार्ग शोधायला जरा वेळ लागला पण थोडी विचारपूस केली असता मार्ग मिळाला.
शहरांच्या गर्दी पासून मुक्त होऊन एक दिवसीय भटकंतीसाठी मुंबई, नवी मुंबई शहराजवळील आदई धबधबा हे उत्तम ठिकाण आहे. गाव ओलांडून जेव्हा समोर आदई टेकड्या दिसत होत्या तेव्हा खरंच ते दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे होते. एरवी सह्याद्री म्हणजे आपल्या डोळ्यासमोर उभा राहते ते रौद्र भीषण असे कातळकडे. परंतु पावसाळ्यात मात्र हिरवा शालू नेसलेला सह्याद्री आणि त्याच्या खुशीतून वाहणारे धबधबे ह्यांचे दृश्य मनात साठवण्यासारखे असते.
गावात बाईक उभी करून अगदीच १० मिनिट चालत मी धबधब्याच्या पायथी पोहचलो. येथून पुढे आपण आपल्या सोयीनुसार वर पर्यंत जाऊ शकता. पायथी येथे येण्यासाठी धबधब्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूने असे दोन मार्ग आहेत.
कौटुंबिक कामामुळे मी नवीन पनवेल येथे आलो होतो आणि २-३ तासाचा अवधी मिळाला म्हणून आदई धबधब्याला येण्याचे ठरवले. पूर्णपणे अनियोजित भटकंती असली तरी येथे येऊन जे पाहायला, अनुभवायला मिळाले त्यामुळे मनाला वेगळीच शांतता मिळत होती.
हिरव्या हिरव्या गवताचा गालिचा, पालवी फुटलेल्या रोपट्यांची चोहीकडे पसरलेली हिरवळ, पाण्याचा खळखळ आवाज आणि पक्ष्यांची किलबिल ह्या दृश्यामुळे व मधुर सुरांमुळे मंत्रमुग्ध व्हायला झाले.
मी सुरुवातीला धबधबा मार्गेच पाण्यातून वर जात होतो आणि त्यात माझ्या पायात चप्पल असल्यामुळे बरच जपून जावे लागतं होते. पण थोड्या वेळाने कळाले की धबधब्याच्या उजव्या बाजूला उंच उंच गवता मध्ये मार्ग आहे जो आपल्याला वर पर्यंत घेऊन जाईल.
वर पोहचल्यावर समोर आपल्याला कर्नाळा किल्ल्याचा अंघुट्या सारखा सुळका आपल्या लगेच नजरेस पडेल. खरंच सुंदर दृश्य नेहमी चढाई नंतरच येत असतात.
अश्या ठिकाणी येऊन धबधब्यामध्ये भिजण्यापासून स्वतःला थांबविणे खरंच अशक्य होते.
सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या अनेक धबधब्यांपैकी हा एक धबधबा आहे आणि आपण जर मुंबई, नवी मुंबई येथे राहत असाल तर नक्की भेट द्या.
आजच्या साठी एवढेच, पुन्हा भेटूया एका नवीन भटकंती ब्लॉग सोबत. ह्याच ब्लॉगचा यूट्यूब व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा व आपल्या "Sahyadri Bhatkanti" यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा
आमच्या नियमित पोस्टसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल
https://t.me/sahyadribhatkanti
किंवा
फॉलो करा आम्हाला
फेसबुक- https://www.facebook.com/sahyadribhatkanti
इंस्टाग्राम- https://www.instagram.com/sahyadribhatkanti
ट्विटर- https://twitter.com/sahyabhatkanti
जय शिवराय 🙏
#adai #waterfall #panvel #raigad #marathivlogs #sahyadribhatkanti #travelvlog #trekvlog #trekking #vlogging #travelvlogs #maharashtratourism #maharashtraforts #sahyadri
#marathivlogger #bhatkanti
0 Comments