शिवडी किल्ला | मुंबई | Sewree Fort | Mumbai | संपूर्ण माहिती

 जय शिवराय मित्रांनो,

आज आपण भटकंती करत निघालो आहोत, मुंबईच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या व अजूनही चांगल्या अवस्थेत असलेल्या शिवडी किल्ल्याला (Sewree Fort).

sewree fort
.

शिवडी किल्ल्याचा यूट्यूब व्हिडिओ पाहण्यासाठी शेवटी लिंक देण्यात आली आहे

किल्ल्याला कसे पोहचाल!

येथे येण्यासाठी आपण स्वतःची गाडी घेऊन येऊ शकता किंवा जवळील शिवडी रेल्वे स्थानकापासून अगदीच १०-१५ मिनिटे चालत देखील किल्ल्यापाशी पोहचाल.

किल्ल्याची माहिती 

हा किल्ला सध्या महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालये विभाग याअंतर्गत संरक्षित स्मारक असून काही वर्षांपूर्वी पुरातत्व खात्यामार्फत किल्ल्याचे नूतनीकरण झाले आहे.

शिवडी किल्ला Sewri fort

किल्ल्याकडे जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. या मार्गावरून पुढे सरळ गेले असता आपल्याला दर्गा दिसेल व डावीकडील प्रवेश मार्गातून आपण किल्ल्यात प्रवेश करतो. 

शिवडी किल्ला Sewri fort

किल्ल्याला बाहेरच्या बाजूस एक तटबंदी व आत आणखी एक भक्कम तटबंदीयुक्त वास्तुसमुह असे या किल्ल्याचे स्वरूप आहे.

शिवडी किल्ला Sewri fort

बाहेरील तटबंदीच्या दक्षिणाभिमुख दरवाज्यातून आत गेल्यानंतर काही फुटावरच मुख्य भागाच्या तटबंदीतील पूर्वाभिमुख प्रवेशद्वारातून आत शिरून उजवी कडे वळून आपण किल्ल्याच्या मध्यभागी पोहचतो.

शिवडी किल्ला Sewri fort

किल्ल्यामध्ये अर्धवर्तुळाकार छताच्या दोन लांबलचक इमारती आहेत व आत प्रकाश येण्यासाठी खिडकीची सोय देखील करण्यात आलेली आहे. याच इमारतीचा वापर तुरुंग व त्यानंतर गोदाम म्हणून करण्यात आला.

शिवडी किल्ला Sewri fort

किल्ल्याच्या चारी बाजुंना असणारी आतील तटबंदी अजून शाबूत आहे व त्याव्यतिरिक्त त्रिकोणाकृती बुरुज देखील आपल्याला येथे पाहायला मिळतील.

शिवडी किल्ला Sewri fort

किल्ल्याच्या उत्तरेकडील भागातील इमारत जे एकेकाळी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे कार्यालय होते, तेथे एक खोली आहे व तेथून डावीकडील जिन्याने पुढे गेले असता मार्ग संपतो. येथे त्याकाळी लाकडी जिन्याने वर जायची सोय असावी.

शिवडी किल्ला Sewri fort


विजयादशमी निमित्त सह्याद्री प्रतिष्ठान, मुंबई विभागामार्फत येथे दुर्गपुजन व दुर्गदर्शन मोहीम आयोजित करण्यात आली होती. त्याचे काही क्षण आपल्यासोबत शेअर करत आहे.

शिवडी किल्ला Sewri fort

किल्ल्यामध्ये एका बाजूला अर्धवर्तुळाकार प्रशस्त असे गोदाम तर दुसऱ्या बाजूला पहाऱ्याकरांच्या राहण्याच्या सोयीसाठीची जागा देखील आपल्याला पाहायला मिळेल. 

शिवडी किल्ला Sewri fort

आता आपण निघालो आहोत किल्ल्याच्या दक्षिण भागात, जेथे आपल्याला घुमटाकार भाग व आणखी एक त्रिकोणाकृती बुरुज पाहायला मिळेल. येथे खाडीचे विहंगम दृश्य आपल्याला दिसेल. 

शिवडी किल्ला Sewri fort

किल्ल्याच्या उत्तरेला अजून एक दरवाजा असून येथील बाहेरील तटबंदीचा काही भाग ढासळला आहे.

शिवडी किल्ला Sewri fort


किल्ल्याचा इतिहास

१६७२ साली जंजिऱ्याच्या सिद्धीकडून मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर इंग्रजांनी खाडीच्या सरंक्षणाच्या दृष्टीने बांधलेल्या ह्या चौकीचे नूतनीकरण व मजबुतीकरण करून किल्ल्यात रूपांतर केले. हे काम १६८० मध्ये पूर्ण झाले. 

शिवडी किल्ला Sewri fort

१८१८ नंतर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाल्यावर या किल्ल्याची उपयुक्तता संपुष्टात आली व किल्ल्याचा उपयोग तुरुंग म्हणून करण्यात आला. त्यानंतर पुढे मुंबई पोर्ट ट्रस्टचे हे गोदाम देखील होते.

शिवडी किल्ला Sewri fort

मित्रांनो, शिवडी किल्ला आपल्या ऐतिहासिक वारसा सोबतच शिवडीच्या दलदलीत हिवाळ्यात येणाऱ्या फ्लॅमिंगो (Flamingo) म्हणजेच रोहित पक्ष्यामुळेही पक्षीतज्ञ व पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असते.

शिवडी किल्ला Sewri fort

तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढेच, पुन्हा भेटूया एका नवीन भटकंती ब्लॉग सोबत. ह्याच माहितीचा यूट्यूब व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा व "Sahyadri Bhatkanti" ह्या आपल्या यूट्यूब चॅनेलला subscribe देखील करा.

https://youtu.be/0hXffR74N7o

आपल्याला हा ब्लॉग कसा वाटलं ते खाली कंमेंट्स करून कळवा व आवडला असल्यास नक्कीच लाईक आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर देखील करा.

आमच्या नियमित पोस्टसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल
https://t.me/sahyadribhatkanti

किंवा

फॉलो करा आम्हाला

फेसबुक-  https://www.facebook.com/sahyadribhatkanti

इंस्टाग्राम-  https://www.instagram.com/sahyadribhatkanti

ट्विटर-  https://twitter.com/sahyabhatkanti

जय शिवराय 🙏

#sewrifort #mumbai #marathivlogs #sahyadribhatkanti #travelvlog #trekvlog #trekking #vlogging #travelvlogs #maharashtratourism #maharashtraforts #sahyadri

#marathivlogger #bhatkanti

Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu