गोरखगड | Gorakhgad | मुरबाड | ठाणे | Thane | Sahyadri Bhatkanti

Gorakhgad

 जय शिवराय मित्रांनो,
आज आपण भटकंती करत निघालो आहोत मुरबाड तालुका, ठाणे जिल्ह्यातील "गोरखगड" (Gorakhgad Fort) किल्ल्याला. (ह्याच माहितीचा यूट्यूब व्हिडिओ पाहण्यासाठी शेवटी लिंक देण्यात आली आहे)

घाटकोपर, मुंबई येथून सकाळी ५:३० वाजता दरम्यान मी एकटाच निघालो व ठाणे जवळ आणखीन ३ ट्रेकर मित्र मला मिळाले. मुंबई पासून जवळपास ९० किमी अंतरावर मुरबाड तालुक्यात देहरी हे गाव आहे जे की गडाच्या पायथी आहे. आम्ही ठाणे नंतर कल्याण - भिवंडी मार्गे कल्याणला आलोत व तेथून अहमदनगर - कल्याण मार्गे मुरबाड मधील नढई या गावाजवळून उजवीकडे वळलोत. पूर्ण मार्ग चांगला होता व सकाळचे रम्य वातावरण यामुळे प्रवास खूप सोईस्कर झाला.

Gorakhgad fort

जसजसे आम्ही देहरी गावाजवळ जात होतोत तसतसे समोरील सह्याद्री रांगेतील बरीच सह्यशिखरे नजरेस पडत होती. गावाजवळ पोहचताच दोन सुळके लक्ष वेधून घेतात. त्यातील लहान सुळका म्हणजे मच्छिंद्रगड आणि मोठा सुळका म्हणजे गोरखगड.

Gorakhgad Fort dehri

अगदीच रस्त्याला लागून गोरखगड प्रवेशद्वार आहे व पार्किंग साठी पुरेशी जागा देखील उपलब्ध आहे. 
Gorakhgad fort entry gate

प्रवेशद्वार शेजारी बाईक पार्क करून आम्ही पायथी असलेल्या गोरक्षनाथ मंदिराला भेट देऊन ट्रेकला सुरूवात केली. मंदिरात विठ्ठल रुखमाईची सुंदर मूर्ती आहे.
Gorakshanath temple

 मंदिराच्या मागून ट्रेक मार्ग जातो. सकाळी ९ वाजता दरम्यान आम्ही ट्रेक चालू केला.
Gorakhgad Fort trek

मुंबईतून देहरी या गावी जर सार्वजनिक वाहतूकीने यायचे असेल तर कल्याण हे जवळील रेल्वे स्टेशन. तेथून मुरबाड साठी बस पकडावी व मुरबाड स्थानकापासून देहरी गावासाठी बस मिळेल. किंवा आपण मुरबाड पासून शेअर टमटमने आधी म्हसा ह्या गावी व तेथून देहरी गावी असे देखील येऊ शकता.

गोरखगड ट्रेक हा मध्यम ते अवघड येत असून गडमाथा गाठण्यास सुमारे तीन तासाचा अवधी लागतो. गडाची उंची २१३५ फूट एवढी असून कातीळकोरीव पायऱ्यांचा भाग सोडला तर पूर्ण मार्ग दाट जंगलातून जातो.

आपल्या विशिष्ट आकारामुळे लक्ष वेधून घेणाऱ्या मुरबाड तालुक्यातील गोरखगड आणि मच्छिंद्रगड या किल्ल्यांना गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ या गुरुशिष्यांची नावे लाभली आहेत.
Gorakhgad machchindragad fort

गडाचा उपयोग हा प्रामुख्याने टेहळणी साठी होत असावा. अजस्त्र अश्या सुळक्यामुळे हे ठिकाण गिर्यारोहकांसाठी नेहमीच आकर्षण राहिले आहे. गुहा, शिल्पकृती, खडकात खोदलेल्या पायऱ्या व पाण्याच्या टाक्या, आव्हानात्मक ट्रेक आणि रॉक क्लाइंबिंग इत्यादी कारणांमुळे इतिहासाची आवड, साहस व जिद्द यांची भूक भागवण्यासाठी हे एक अप्रतिम ठिकाण आहे.

मार्ग पूर्णपणे मार्क असल्याने वाट चुकण्याचा प्रश्नच येत नाही व तसेही गोरखगड सुळका नेहमीच आपल्या नजरेसमोर राहील. तरीही सोयीसाठी जागोजागी मार्ग दर्शिवणाऱ्या पाठ्या लावण्यात आल्या आहेत.

जवळपास दीड तासाच्या ट्रेक नंतर आम्ही एका लहान पठारावर आलोत व समोर आहुपे घाट व सिद्धगड नजरेस पडला.
Gorakhgad fort ahupe ghat sidhgad fort

आहुपे घाट उजवीकडे आणि गोरखगड डावीकडे ठेवत आम्ही पुढील प्रवासास लागलोत. काही अंतरावरच आणखी एक मंदिर आहे व येथून डावीकडे वरच्या दिशेने गडाकडे मार्ग जातो तर सरळ गेले असता खाली उतरल्यावर उजवीकडे मार्ग जातो आई डेरमाता मंदिर व डावीकडे मार्ग जातो तो खोपिवली या गावाकडे जे देहरी गावापासून जवळच आहे.

Gorakhgad Fort trek

Gorakhgad Fort trek

कातीळकोरीव पायऱ्या लागण्या अगोदर डावीकडे एक प्रशस्त अशी कातळात कोरलेली गुहा आहे.
Gorakhgad Fort cave

पायऱ्या पासून ट्रेक अवघड होत जातो. आम्ही तो प्रामुख्याने तीन टप्प्यांमध्ये विभागला.

पाहिला टप्पा म्हणजे जेथून पायऱ्या चालू होतात तेथून ते गडाचे प्रवेशद्वार पर्यंत. हा टप्पा अतिशय सोपा व सोयीसाठी एका ठिकाणी रोप देखील लावण्यात आले आहे.

Gorakhgad Fort trek

दुसरा टप्पा म्हणजे गडाचे प्रवेशद्वार ते गडावरील सर्वात मोठ्या गुहे पर्यंतच ट्रेक. पण त्या अगोदर उजवीकडे एक वाट जाताना दिसली जी पुढे जाऊन पाण्याच्या टाक्या जवळ संपते व समोर दिसतो तो किल्ले मच्छिंद्रगड.

Gorakhgad Fort machchindragad water tanks

दुसरा टप्पा चालू करताना दगडात कोरलेला एक शिलालेख देखील दिसला.
Gorakhgad Fort शिलालेख rock carving

 ह्या पायऱ्या चढून वर गेल्यावर उजवीकडे सुखलेली एक पाण्याच्या टाकी व सरळ मार्ग गुहेकडे जातो. येथील माकडा पासून थोडी सावधानता बाळगावी. आपल्या हातात कुठलीही खाद्य पदार्थ नसावे.
Gorakhgad Fort cave

गुहे बाहेर बऱ्याच पाण्याच्या टाक्या आहेत. गड जरी लहान असला तरी राहण्याची आणि पाण्याची मुबलक सोय येथ आहे.

आता ट्रेकचा तिसरा टप्पा म्हणजे गुहे पासून गडमाथा पर्यंतचा ट्रेक. बहुतांश लोक गुहे पर्यंतच ट्रेक संपवतात. गुहे पासून उजवीकडे गडाच्या मागे जाण्यासाठी वाट आहे व ह्या वाटेवर बऱ्याच पाण्याच्या टाक्या आहेत.

Gorakhgad Fort water tanks

येथे सुरुवातीला एक शिडी आहे व त्यानंतर ८० ते ९० डिग्री मध्ये पायऱ्या आहेत.

गडमाथ्यावर जाण्याअगोदर आम्ही गडाच्या मागील बाजूस आलोत. येथे एक पाण्याची टाकी व थोड्या उंचीवर खोदलेल्या २ गुहा दिसल्या.

Gorakhgad Fort cave water tanks

शेवटचा टप्पा चढताना योग्य ती खबरदारी घ्यावी व खोबण्यांचा पुरेपूर उपयोग करावा.

Gorakhgad Fort trek

Gorakhgad Fort trek

गडमाथा बराच लहान व निमुळता आहे आणि येथे एक भगवान शिवाचे मंदिर आहे. त्यामुळे येथे महाशिवरात्री मध्ये बरीच गर्दी असते.

Gorakhgad Fort top shiva temple

वातावरण स्वच्छ असल्यास गडमाथ्यावरून दक्षिणेला असलेल्या डोंगररांगेतील आहुपे घाट व सिद्धगड व्यतिरिक्त ढाकोबा किल्ला, जीवधन किल्ला व नाणेघाट देखील पाहता येतो.

Gorakhgad Fort top

गडमाथ्यावरून दक्षिणेला खाली उतरण्यासाठी एक वाट आहे व तेथे एक पाण्याची टाकी दिसत होती पण वाट अवघड असल्याने आम्ही तिथे न जाण्याचे ठरवले.

Gorakhgad Fort top

सकाळी ९ वाजता ट्रेक चालू करून दुपारी १२ वाजता आम्ही गडमाथ्यावर पोहचलोत. काही वेळ विश्रांती घेऊन, नाश्ता करून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलोत.

गड उतरण्याची उत्तम पद्धत म्हणजे जसे चढताना आपण कातळकडे तोंड करून खोबण्यांच्या साहाय्याने वर चढतो तसेच खाली उतरावे.

Gorakhgad Fort top

जवळपास दीड तासाने आम्ही गडाच्या पायथी, मंदिराजवळ आम्ही पोहचलो.

ह्याच माहितीचा यूट्यूब vlog पाहायचा असेल तर खालील लिंकवर क्लिक करा

आमच्या नियमित पोस्टसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल


किंवा

फॉलो करा आम्हाला


इंस्टाग्राम- https://www.instagram.com/sahyadribhatkanti


पुन्हा भेटूया एका नवीन भटकंती सोबत, जय शिवराय

#gorakhgad #machchindragad #forts #dehri #murbad #thane  #marathivlogs #sahyadribhatkanti #travelvlog #trekvlog #trekking #vlogging #travelvlogs #maharashtratourism #maharashtraforts #sahyadri
#marathivlogger #bhatkanti

Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu