वेण्णा तलाव | महाबळेश्वर | Day 1 | Mahabaleshwar | Venna Lake | Boating | Horse Riding

 जय शिवराय,

लग्नानंतर बायकोसोबतची पहिली भटकंती म्हणजे आमची महाबळेश्वर ट्रीप. तब्बल चार दिवस आम्ही तेथे होतो ज्यात आम्ही वेण्णा तलाव येथे boating आणि horse riding, किल्ले प्रतापगड दर्शन, तापोळा येथे boating, पाचगणी येथे horse ride, श्री महाबळेश्वर आणि पंचगंगा मंदिर दर्शन, स्ट्रॉबेरी गार्डन आणि काही पॉइंट्स यांना भेट दिली होती. ह्याच भटकंतीचा ब्लॉग दिवसांप्रमाणे आपल्या सोबत शेअर करत आहे.

Venna lake Mahabaleshwar

दिवस पहिला - वेण्णा तलाव (Boating, Horse Riding)

ह्या भटकंतीचा यूट्यूब व्हिडिओ पाहण्यासाठी शेवटी लिंक देण्यात आली आहे.

मुंबई ते महाबळेश्वर पुणे मार्गे असा रात्रीचा प्रवास करून आम्ही सकाळी आठच्या दरम्यान महाबळेश्वर बस डेपो येथे पोहचलो. येथून २ किमी लांब गणेश नगर, शिंदे निवास येथे आम्ही राहण्याची बुकिंग केली होती. 

Mahabaleshwar bus depot

टॅक्सीचे रेट येथे ठरलेले आहेत. आपण टूर सिलेक्ट करा आणि टॅक्सी वाला बरोबर वेळेत आपल्याला टूर पूर्ण करून आणेन. तरीही वेळ नियोजनाची गरज भासतेच.

Mahabaleshwar taxi fare

अतंत्य परवडणाऱ्या दरात आमची राहण्याची आणि खाण्याची सोय शिंदे निवास येथे झाली होती. चारही दिवस हवे ते उत्कृष्ट जेवण येथे आम्हाला मिळाले. 

Mahabaleshwar shinde niwas

आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा, जोडपे आणि कुटुंब यासाठी योग्य रूम्स, स्वच्छ आणि शांत परिसर ही काही या निवासाची वैशिष्ट्ये. त्यात त्यांच्या स्वयंपाक घराचे आणि जेवणाचे विशेष कौतुक.

Mahabaleshwar shinde niwas

Mahabaleshwar shinde niwas

प्रवासाचा थकवा दूर करण्यासाठी दुपारी काही वेळेची विश्रांती घेतली आणि निवास पासून ३ किमी दूर असलेल्या वेण्णा तलाव (Venna lake) येथे सायंकाळच्या वेळी आम्ही गेलो. 

Venna Lake Mahabaleshwar

तलाव बराच मोठा असल्याने paddle बोटने कडीकडीने जरी तलावाला राऊंड मारायचा झाल्यास एक तास तर सहज लागेल. वेण्णा तलाव हे महाबळेश्वर येथील प्रमुख आकर्षणांपैकी एक असून बोटिंग सोबत जवळच horse ride आणि gaming देखील येथे होते.

Venna Lake Mahabaleshwar

चहू बाजूंनी उंच झाडे आणि हिरवळीने हा तलाव वेढलेला आहे. येथे बोटिंगचा गर्दीचा टाईम म्हणजे संध्याकाळचे चार आणि आम्ही नेमके त्याच वेळी येथे गेलो होतोत. 

Venna Lake Mahabaleshwar

तलावाकाठी हनुमान मंदिर देखील दिसले.

Venna Lake Mahabaleshwar hanuman temple

बोटीवर बसून सूर्य मावळताना पाहणे हा संध्याकाळ घालविण्याचा उत्तम मार्ग.

Venna Lake Mahabaleshwar

तलावशेजारी छोटीशी couple horse ride आम्ही केली पण एकट्याने घोडा स्वारी करण्याचा अनुभव खरंच खूप भन्नाट होता.

Venna Lake Mahabaleshwar horse ride

Venna Lake Mahabaleshwar horse ride

रात्रीच्या चविष्ट जेवणाने आम्ही आमच्या महाबळेश्वर मधील पहिल्या दिवसाची सांगता केली

Mahabaleshwar shinde niwas

आणि दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच उटून जवळच असलेल्या विल्सन पॉईंट येथे सूर्योदय पाहिला व किल्ले प्रतापगड यास भेट दिली. 

Wilson point Mahabaleshwar

Pratapgad fort

 

ह्याच भटकंतीचा यूट्यूब व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://youtu.be/B-s6iQw8vmg 


किल्ले प्रतापगड | महाबळेश्वर | Day 2 | Pratapgad Fort | Mahabaleshwar | Sahyadri Bhatkanti

https://www.sahyadribhatkanti.com/2021/04/day-2-pratapgad-fort-mahabaleshwar.html


जय शिवराय

निवास तपशील शिंदे निवास (Deluxe Family and Couple Rooms available) पत्ता - १९, शिंदे निवास, गणेश नगर सोसायटी, ससून रोड, महाबळेश्वर संपर्क - प्रवीण शिंदे ९४२३०३३८८७ / मधुरा शिंदे ९४२३८६८४४७

टेलिग्राम चॅनेल 

फेसबुक

इंस्टाग्राम

ट्विटर

#vennalake #boating #sahyadribhatkanti #horseriding #Mahabaleshwar #satara #marathivlogs #travelvlog #trekvlog #trekking #vlogging #travelvlogs #maharashtratourism #maharashtraforts #sahyadri #marathivlogger #bhatkanti





Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu