#mahitibhatkanti सिरीज
(माहिती भटकंती - ठिकाणांची थोडक्यात माहिती)
तांदुळवाडी किल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती शेअर करत आहे. पालघर जिल्ह्यात हा किल्ला असून शेजारी शेजारी असलेली तांदुळवाडी आणि लालथाणे या गावातून गडावर जाण्यासाठी मार्ग आहे. जवळील रेल्वे स्थानक सफाळे आहे व तेथून पूर्वेला येऊन एसटीने आपण ७ किमी दूर असलेल्या तांदुळवाडी किंवा त्याच्या पुढेच असलेल्या लालथाणे ह्या गावी येऊ शकता. गडाची उंची १५२४ फूट एवढी असून सोप्या श्रेणीत तर मध्यम सहनशक्ती मध्ये हा किल्ला येतो. पायथा ते गडमाथा पोहचण्यास जवळपास २ तास लागतात. दोन्ही गावातून मार्ग एक छोट्या पठारावर येऊन मिळतो. येथून पुढे गडाच्या उत्तर किंवा दक्षिण मार्गे आपण गडावर जाऊ शकता. उत्तरे कडील मार्ग बराच झाडीतून, सोपा असून पायऱ्यांचा आहे तर दक्षिणेकडील मार्ग थोडासा अवघड, उंच चढ व येथून परत उतरणे देखील तसे कठीणच. सर्वात चांगला पर्याय म्हणजे तांदुळवाडी गावातून शाळे शेजारून गाव ओलांडून ट्रेक चालू करावा आणि दक्षिण मार्गे गडावर जाऊन उत्तरेकडील मार्गाने खाली लालथाने गावात उतरावे. ह्या गावाजवळ एक हंगामी धबधबा देखील आहे. सर्वोत्तम हंगाम हा पावसाळी किंवा पावसाळा नुकताच संपला असेल तेव्हाचा.
गडावर पाहण्याच्या ठिकाणांचा विचार करता गडावर पाण्याच्या टाक्या, शिवरायांची मूर्ती, भग्न अवस्थेत असलेले गडाचे प्रवेशद्वार असे काही पाहायला मिळेल. गडाच्या पूर्वेला सूर्या आणि वैतरणा नदी यांचा संगम, टकमक किल्ला व कोहोज किल्ला दिसेल तर उत्तरेला आहे काळदुर्ग किल्ला आहे.
मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात राहणाऱ्या लोकांसाठी एक दिवसीय भटकंती साठी हे उत्तम ठिकाण.
पूर्ण ट्रेक ब्लॉग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
#tandulwadifort #tandulwadi #lalthane #saphale #palghar #sahyadribhatkanti
0 Comments