Geotags bhatkanti सिरीज
(ठिकाणांचे भौगोलिक टॅगिंग)
माथेरान येथील लुईस पॉइंट वरून उत्तर, दक्षिण आणि पश्चिम दिशेला टिपलेले दृश्य आपल्या सोबत शेअर करत आहे. लुईस पॉइंट येथून उत्तरेला चंदेरी किल्ला व म्हैसमाळ डोंगर दिसेल तर त्याआधी पायथी गाढेश्र्वर तलाव आहे. उत्तरेला पेब किल्ला उर्फ विकटगड देखील आहे पण थोडा उत्तर पूर्वेला असल्याने फोटोत दिसत नाही. पॉइंट पासून दक्षिणेला पाहिले असता माथेरान येथील पश्चिमेकडील अन्य काही पॉइंट्स तर अथांग असा मोरबे धरण दिसेल व शेजारीच इरशाळगडाचा सुळका आपला लक्ष वेधेल. पॉइंट पासून पश्चिमेला पाहिले असता आपल्या विशिष्ट आकारामुळे, कलावंतीण दुर्ग आणि शेजारीच असलेला प्रबळगड लगेच ओळखता येतो.
वरील नमूद केलेल्या किल्ल्यांपैकी सर्वच किल्ले सोपे ते मध्यम (चंदेरी किल्ला - गुहे पर्यंत) ट्रेक श्रेणीत येत असून एक दिवसीय भटकंतीसाठी उत्तम ठिकाणे आहेत, विशेषतः मुंबई, ठाणे, रायगड व पुणे येथील भटकंती प्रेमींसाठी.
#geotagsbhatkanti
#matheran #chanderifort #kalavantingdurg #prabalgad #irshalgad #raigad #sahyadribhatkanti
0 Comments