क्षेत्र महाबळेश्वर | पंचगंगा मंदिर | Panchganga Temple | Day 4 | Strawberry Garden | Mahabaleshwar

जय शिवराय,

लग्नानंतर बायकोसोबतची पहिली भटकंती म्हणजे आमची महाबळेश्वर ट्रीप. तब्बल चार दिवस आम्ही तेथे होतो ज्यात आम्ही वेण्णा तलाव येथे boating आणि horse riding, किल्ले प्रतापगड दर्शन, तापोळा येथे boating, पाचगणी येथे horse ride, श्री महाबळेश्वर आणि पंचगंगा मंदिर दर्शन, स्ट्रॉबेरी गार्डन आणि काही पॉइंट्स यांना भेट दिली होती. ह्याच भटकंतीचा ब्लॉग दिवसांप्रमाणे आपल्या सोबत शेअर करत आहे.

दिवस चौथा - क्षेत्र महाबळेश्वर | पंचगंगा मंदिर | Panchganga Temple | Day 4 | Strawberry Garden | Mahabaleshwar

Mahabaleshwar temple

ह्याच भटकंतीचा यूट्यूब व्हिडियो पाहायचा असेल तर शेवटी लिंक देण्यात आली आहे.

Mahabaleshwar temple

क्षेत्र महाबळेश्वर व्यतिरिक्त आम्ही काही पॉइंट्स व स्ट्रॉबेरी गार्डनला देखील भेट दिली होती. सर्वप्रथम नीडल्स होल व्ह्यू पॉइंट (Needles Hole view point) येथे आलोत. येथे जवळच पाण्याचा झरा असलेले ठिकाण आहे ज्यास वल्चर्स वॉटर (Vultures Water) असे बोलले जाते व येथून हत्तीचा माथा (Elephant Head point), नीडल होल (Needle Hole) पाहता येतो. नैसर्गिकरित्या तयार झालेला हा हत्तीचा माथा आणि तेथील छिद्र नक्कीच आश्चर्यजनक वाटते. 

Needle hole view point

Needle hole view point

Elephant head point

जवळच केटस पॉइंट (Kates Point) आहे व हे नाव तेव्हाचे ब्रिटिश गव्हर्नर सर जॉन मल्कम् यांच्या मुलीच्या नावावरूनच ठेवण्यात आले आहे. शिवाजी महाराजांच्या काळात या ठिकाणाला नाके खिंड (Nake Khind) असे बोलले जाई. 

Kates Point

Kates Point

या पॉइंट वरून बलकवडी धरण (Balkavdi Dam), कमळगड किल्ला (Kamalgad Fort), कृष्णा नदी खोरे, धोम धरण (Dhom Dam) व नदीकाठच्या गावाचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. 

Kates Point

येथील तिसरे पॉइंट म्हणजे इको पॉइंटला (Echo Point) भेट देऊन आम्ही जवळच ओल्ड महाबळेश्वर रोडवरच असलेल्या एका स्ट्रॉबेरी गार्डनला भेट दिली.

Echo point

महाबळेश्वर येथे केली जाणारी स्ट्रॉबेरी लागवड, त्याच्या वेगवेगळ्या पद्धती, अनुकूल वातावरण, पिकाची घ्यावयाची काळजी इत्यादी बद्दल बरीच माहिती येथे मिळाली.

Strawberry garden

Strawberry garden

Strawberry garden

Strawberry garden


आठवणीसाठी काही फोटोज् व येथील प्रसिद्ध असलेले स्ट्रॉबेरी आईस्क्रीमचा आस्वाद देखील आम्ही घेतला.


आता पोहचलो ते ओल्ड महाबळेश्वर (Old Mahabaleshwar) येथे जे महाबळेश्वर बस डेपो पासून ५ किमी अंतरावर आहे. पर्यटनासोबतच महाबळेश्वरला धार्मिक महत्त्व देखील आहे. 

महाबळेश्वर हे नाव भगवान महादेव महाबली यांच्या नावावरून प्राप्त झाले आहे व ओल्ड महाबळेश्वर येथे बरीच हेमाडपंत शैलीची प्राचीन मंदिरे आहेत. या ठिकाणाला क्षेत्र महाबळेश्वर म्हणून देखील ओळखले जाते.

सर्वप्रथम येथील कमळजामाता मंदिराला (Kamaljamata Temple) आम्ही भेट दिली. मंदिरात शिवलिंग आणि काही प्राचीन मुर्त्या आहेत. 

Kamaljamata Temple

Kamaljamata Temple

या मंदिराच्या जवळच अतीबळेश्वर मंदिर (Atibaleshwar Temple) आहे. गाभाऱ्यात शिवलिंग आहे व शेजारी आणखी एक छोटे शिवमंदिर आहे. 

Atibaleshwar Temple

Atibaleshwar Temple

आता निघालोय ते महाबळेश्वर मंदिराकडे (Mahabaleshwar Temple). येथील मंदिर परिसर स्वच्छ आणि शांत आहेत. महाबळेश्वर मंदिर गाभाऱ्यात रुद्राक्ष रुपी शिवलिंग आहे जे क्वचितच दुसरीकडे कुठे आपण पाहिले असावे. हे मंदिर ८०० वर्ष जुने तर शिवलिंग ५००० वर्ष जुने असल्याचे सांगितले जाते. 

Mahabaleshwar temple

Mahabaleshwar temple

श्री महाबळेश्वरचे दर्शन घेऊन तेथून जवळच असलेल्या पंचगंगा मंदिराकडे (Panchganga Temple) आलोत. नावावरून आपल्या लक्षात येईलच की पाच नद्यांचा येथे उगम होत असल्याने या ठिकाणाला पंचगंगा हे नाव पडले आहे. त्या नद्या म्हणजे कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायित्री. या पाच नद्यांचे पाणी एकत्र येऊन गोमुखातून एक कुंडात पडते. भक्त हे पाणी प्राशन करतात व आपली मनातील इच्छा सांगत कुंडात पैसे टाकतात. 

Panchganga Temple

या नद्यांव्यतिरिक्त सरस्वती आणि भागिरथी ह्या गुप्त नद्या अनुक्रमे १२ व ६० वर्षांनी कृष्णा नदीस भेटायला येतात. 

Panchganga Temple

पंचगंगा मंदिर हे ४५०० वर्ष जुने असल्याचे सांगितले जाते.

Panchganga Temple

मंदिराच्या मागील बाजूस दत्त मंदिर आणि हनुमान मंदिराकडे जाण्यासाठी मार्ग आहे. 

Datta Mandir

Hanuman temple mahabaleshwar

पंचगंगा मंदिर शेजारीच आणखी एक भगवान शिवाचे शिवलिंग असलेले मंदिर आहे. 

Koteshwar temple mahabaleshwar

Koteshwar temple mahabaleshwar

येथील बहुतांश मंदिराचे आम्ही दर्शन घेतले, फक्त राहून गेले ते काही अंतरावर जवळच असलेले प्राचीन कृष्णा देवी मंदिर (Krushna Devi Temple). आपण ह्या मंदिराला नक्की भेट द्या.

Krishna devi temple mahabaleshwar

क्षेत्र महाबळेश्वर पाहून झाल्यावर आम्ही सूर्यास्त पाहण्यासाठी बॉम्बे पॉइंट (Bombay Point) येथे जाणार होतो पण उशीर झाल्याने क्षेत्र महाबळेश्वर पासून जवळच असलेले कॅनॉट पीक पॉइंट (Cannaught Peak Point) येथे सूर्यास्त पाहण्यासाठी आलोत.

Cannaught Peak Point mahabaleshwar

अगदीच आडवाटेला, घनदाट झाडीतून मार्ग व तितकासा प्रसिद्ध नसल्याने पर्यटकांची येथे गर्दी नसते. 

Cannaught Peak Point mahabaleshwar

उद्या परतीच्या प्रवासाला मुंबईला जायचे असल्याने आमच्या महाबळेश्वर ट्रीप मधील चौथ्या दिवसाची सांगता आम्ही महाबळेश्वर मार्केट येथे काही खरेदी करून केली. आणि येथेच आमची महाबळेश्वर भटकंतीची सिरीज देखील संपते. ह्या सिरीज मधील अन्य ब्लॉग वाचण्यासाठी Mahabaleshwar Tour येथे क्लिक करा. 

ह्या भटकंतीचा यूट्यूब व्हिडियो पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://youtu.be/QEv2JzL54hY 

जय शिवराय

#mahabaleshwar #temples #panchgangatemple #elephanthead #katespoint #strawberrygarden #Atibaleshwartemple #krushnadevitemple #sahyadribhatkanti 

Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu