हरीहर किल्ल्याच्या पूर्वेकडील डोंगररांग | Harihar Fort | Trimbakeshwar Range | Nashik | Geotags Bhatkanti | Sahyadri Bhatkanti

Geotags Bhatkanti सिरीज 

(जिओटॅग भटकंती - ठिकाणांचे भौगोलिक टॅगिंग)

पायथ्याच्या निर्गुडपाडा (Nirgudpada) किंवा हर्षेवाडी (Harshewadi) गावातून जवळपास एक तासाच्या ट्रेक नंतर हरीहर किल्ल्याचे प्रमुख आकर्षण असलेल्या कातील कोरीव पायऱ्या पर्यंत आपण पोहचतो व अजुन अर्धा तासात गडावर. गड फिरण्यास अर्धा तास पुरेसा आहे आणि गडाच्या मध्यभागी एक सुळका आहे जे की गडाचे सर्वोच्च ठिकाण आहे व येथून पूर्व कडील दिशेने काढलेला हा फोटो. 

येथून किल्ल्याच्या पूर्व कडील टोकाला असलेली दगडी कोठी व काही पाण्याच्या टाक्या दिसतील. त्यापलीकडे हरीहर किल्ल्याला लागूनच आहे ब्रह्मा डोंगर (Brahma hills) आणि त्याच्या पलीकडे दिसतो ब्रह्मगिरी डोंगर (Brahmagiri hills) जे की  गोदावरी नदीचे उगमस्थान (Origin of Godavari river)आहे. ब्रह्मगिरीचाच भाग असलेला, लागूनच दुर्गभांडार (Durgbhandar Fort) आहे व ह्या दोघांना जोडणारा मार्ग, अखंड कातळात खोदलेल्या पायऱ्या, नैसर्गिक कातळी पुल येथील प्रमुख आकर्षण. ब्रह्मगिरी डोंगर अगोदर कपड्या डोंगर (Kapadya hill) देखील आहे. 

नाशिक जिल्ह्यात असलेल्या सेलबारी डोलबरी डोंगररांग, अजंठा सातमाळ डोंगररांग व त्रिंबकेश्वर डोंगररांग ह्यापैकी त्रिंबकेश्वर डोंगररांगेत हरीहर किल्ला येतो. ह्या डोंगररांगेतील अन्य किल्ले म्हणजे अंजनेरी किल्ला (Anjaneri Fort), भास्करगड किंवा बसगड (Bhaskargad Fort /Basgad Fort), रांजनगिरी किल्ला (Ranjangiri Fort), इत्यादी.

जिओटॅग भटकंती सिरीजमधी अन्य ब्लॉग वाचण्यासाठी Geotags Bhatkanti येथे क्लिक करा.

#hariharfort #nirgudpada #harshewadi #brahmagiri #durgbhandar #nashik #SahyadriBhatkanti

Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu