टेबल लँड, पाचगणी | Table Land, Paachgani | Mahabaleshwar Tour | Satara | Sahyadri Bhatkanti

जय शिवराय,

लग्नानंतर बायकोसोबतची पहिली भटकंती म्हणजे आमची महाबळेश्वर ट्रीप. तब्बल चार दिवस आम्ही तेथे होतो ज्यात आम्ही वेण्णा तलाव येथे boating आणि horse riding, किल्ले प्रतापगड दर्शन, तापोळा येथे boating, पाचगणी येथे horse ride, श्री महाबळेश्वर आणि पंचगंगा मंदिर दर्शन, स्ट्रॉबेरी गार्डन आणि काही पॉइंट्स यांना भेट दिली होती. ह्याच भटकंतीचा ब्लॉग दिवसांप्रमाणे आपल्या सोबत शेअर करत आहे.

दिवस तिसरा - टेबल लँड, पाचगणी | Table Land, Paachgani | Mahabaleshwar Tour

Table land paachgani

सकाळी तापोळा फिरून झाल्यावर निवासस्थानी जाऊन न्याहरी करून संध्याकाळी पाचगणी महाबळेश्वर रोड मार्गे पाचगणीला निघालो व वाटेत महाबळेश्वर पासून जवळपास १५ किमी अंतरावर असलेल्या पारसी पॉइंट येथे भेट दिली. 

Parsi point paachgani

येथून कमळगड किल्ला, कृष्णा नदी, धोम धरण व त्याचा जलाशय आणि शेजारीच असलेल्या सिडनी पॉइंट व टेबल लँड यांचे सुंदर दृश्य पाहायला मिळाले. 

Parsi point paachgani

पारसी पॉइंट पासून काही किमी अंतरावर असलेल्या टेबल लँड येथे आम्ही पोहचलो. पार्किंगची सुविधा येथे उपलब्ध आहे. 

Table land paachgani

पार्किंग पासून टेबल लँड पर्यंतची फ्री horse ride आम्हाला मिळाली व तेथून पुढे घोडा हवा की नको व त्याचा दर निश्चित करून टेबल लँड फिरण्यास आम्ही सुरूवात केली. घोड्यांचा प्रत्येकी दर तसा जास्तच होता पण जर आपण पहिल्यांदा आला असाल तर घोड्यावरून फिरून टेबल लँड वरील पॉइंट फिरण्याचा अनुभव नक्कीच घ्या. जर आपण कुटुंब सोबत आला असाल तर घोडा गाडीची व्यवस्था देखील येथे आहे.

Table land paachgani

पाचगणी हे महाबळेश्वर पासून जवळच असलेले आणखी एक थंड हवेचे ठिकाण. पाचगणीच्या सभोवतालच्या भागात पाच ज्वालामुखीय पठार आहेत व त्यामुळेच ह्या ठिकाणाला पाचगणी किंवा पंचगणी हे नाव पडल्याचे सांगितले जाते. टेबल लँड हे पठार तिबेट नंतर आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे पठार असून त्याला टेबल लँड हे का बोलले जाते ह्याची प्रचिती आपल्याला येथे आल्यावरच कळते. तब्बल सहा किमीचे हे पठार असून जवळपास ४५५० फूट उंचीवर असलेले हे पाचगणीचे सर्वोच्च ठिकाण आहे. 

Table land paachgani

टेबल लँड वरील सर्वात पहिले पॉइंट पाहिले ते पाच पांडवांच्या पायाचे ठसे मानली जाणारी जागा. 
Pandava footprints table land

येथे बरेच शूटिंग स्पॉट आहेत व अनेक बॉलिवूड चित्रपटाचे शूट येथे करण्यात आलेले आहे. 
Table land paachgani

टेबल लँड सीमेच्या सर्व बाजूला डोंगर दऱ्यांचे दर्शन होते त्यामुळे आपण कुटल्याही दिशेने गेलात तर नक्कीच काही ना काही पाहण्यासारखे दिसतेच. विशेष म्हणजे उत्तर बाजूस असलेले कमळगड किल्ला, कृष्णा नदी, धोम धरण व त्याचा जलाशय, नदीकाठावरील खेडी व शेते यांचे दृश्य मनात घर करून राहते. 
Table land paachgani

आता आम्ही ह्याच पठारावर असलेल्या तलावाकडे निघालो. येथे थोडी फोटोग्राफी देखील केली. 

Table land paachgani lake

ह्या पठारावर दोन गुहा देखील आहेत. त्यापैकी पाहिले tiger cave कडे निघालो. पठारावरून खालच्या दिशेने काही पायऱ्यांच्या मार्गाने तेथे जाता येते. 
Tiger cave table land

गुहा पाहण्यासाठी शुल्लक दर येथे आकारला जातो. गुहेतील किर्र अंधार आणि थंड हवा नक्कीच अनुभवण्यासारखे आहे. 

Tiger cave table land

येेेथे एक कॅफे देखील होता व काही मातीच्या वस्तू येथे विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत. 
Cafe tiger cave table land

Tiger cave table land

सूर्यास्ताची वेळ आणि त्याचा गुहेतून दिसणारा सुंदर नजारा पाहत काही वेळ आम्ही येथे थांबलोत. 

Tiger cave Table land

येथून जवळच आणखी एक गुहा आहे व येथे जाण्यासाठी देखील पठारावरून खालच्या दिशेने पायऱ्यांचा मार्ग आहे. 

Cave table land

 गुहेच्या आत शंकराची मूर्ती आहे.

Cave table land

Cave table land

टेबल लँड व्यातिरिक्त पाचगणी हे स्ट्रॉबेरी लागवड, पूर्ण सोयी सुविधा यांनी भरपूर अश्या पब्लिक स्कूल, mapro garden आणि राजपुरी गुहा यासाठी देखील प्रसिद्ध आहे. 

Horse ride table land

खरं तर table land पाहून झाल्यावर mapro garden येथे जाण्याचा आमचा प्लॅन होता पण येथील सूर्यास्ताचे विहंगम दृष्य आणि वातावरण ह्यामुळे येथून पाय निघेनाच. ही भटकंती, हा प्रवास संपूच नये असे वाटत होते. 

मित्रांनो, आपण कितीही प्रयत्न केलात, किती ही नियोजन केले तरी काही ना काही, कधी ना कधी राहणारच, सुटणारच. महत्वाचे हेच आहे की आताचं क्षण, हा moment आपल्याला जगायला, अनुभवायला शिकलं पाहिजे. तरच ती भटकंती परिपूर्ण ठरते.

आमचा महाबळेश्वर ट्रिपमधील तिसऱ्या दिवशी केलेले पाचगणी भटकंती येथे संपते. ह्याच माहितीचा यूट्यूब व्हिडियो पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

महाबळेश्वर येथील चौथ्या दिवशी केलेले श्री क्षेत्र महाबळेश्वर आणि पंचगंगा मंदिर दर्शन याचा ब्लॉग लवकरच येईल.

Panchganga temple

Mahabaleshwar temple


पुन्हा भेटूया एका नवीन भटकंती ब्लॉग सोबत

जय शिवराय

Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu