पेब किल्ला (विकटगड) | कड्यावरचा गणपती | माथेरान | Peb Fort | Vikatgad | Matheran hills | Raigad | Sahyadri Bhatkanti

थोडक्यात माहिती 

  • किल्ला - पेब किल्ला (विकटगड) 
  • ठिकाण - माथेरान, रायगड
  • डोंगररांग - माथेरान (Matheran Hill Range)
  • उंची (Height) - 2100 फूट 
  • पायथ्याचे गाव / ट्रेक मार्ग (Base village/ Trek routes) - आनंदवाडी गाव (3 तास) आणि माथेरान ट्रेन मार्ग (2 तास)
  • श्रेणी (Grade) - आनंदवाडी गाव - मध्यम आणि माथेरान ट्रेन मार्ग - सोपी 
  • सर्वोत्तम हंगाम - पावसाळा आणि हिवाळा 
  • मुंबई ते माथेरान अंतर - 60 किमी
  • पुणे ते माथेरान अंतर - 120 किमी
  • जवळील रेल्वे स्टेशन - नेरळ 
  • नेरळ ते माथेरान - टॅक्सी 
Peb Fort Vikatgad Matheran

नुकताच पावसाळा सुरू झाला होता. पावसाळ्यातील सह्याद्रीचे रुप नक्कीच अनुभवण्यासारखे आणि वर्णनापलीकडचे. ह्या पावसाळ्यातील माझी पहिलीच भटकंती म्हणजे माथेरान ट्रेन मार्गे पेब किल्ला ट्रेक. पेब किल्ल्याला विकटगड या नावाने देखील ओळखले जाते. 

Peb Fort Matheran

पेब किल्ला ट्रेक हा दोन मार्गे करता येतो. एक म्हणजे आनंदवाडी गावातून ( via Anandwadi Village) आणि दुसरा माथेरान ट्रेन मार्ग (via Matheran Train route). आम्ही ह्यावेळी माथेरान ट्रेन मार्गाने ट्रेक करणार होतोत. दोन वर्षा पूर्वी, 2019 साली देखील मी हा ट्रेक केला होता पण तेव्हा कड्यावरच्या गणपतीला भेट देण्याची राहून गेली होती, ती इच्छा ह्या वेळी पूर्ण झाली. त्याच भटकंतीचा हा ब्लॉग. (यूट्यूब व्हिडियो लिंक शेवटी देण्यात आली आहे.)

मुंबई ते माथेरान प्रवास 

पर्यटकांनी गजबजलेल्या माथेरानला येण्यासाठी जवळील रेल्वे स्टेशन नेरळ (Neral Railway station). नेरळ स्थानकापासून वाहतुकीची सुविधा म्हणजे टॅक्सी उपलब्ध आहेत.

मी सकाळी सात वाजता घाटकोपर, मुंबई पासून बाईक घेऊन निघालो व मुलुंड येथे पवनला भेटलो आणि मुलुंड ऐरोली रोड मार्गे पुढील प्रवासाला लागलो. ठाणे बेलापूर रोडवरून घणसोली जवळ शिळफाटा महापे रोडने शिळफाटा येथे पोहचलो. शिळफाटा पासून कल्याण शिळफाटा मार्गे थोडे पुढे गेले असता माथेरान, बदलापूर, अंबरनाथ यांकडे जाण्यासाठी मार्ग आहे.

मुंबई ते माथेरान प्रवास मी बऱ्याच वेळा केला आहे आणि तो ही बाईकने. ह्या प्रवासातील सर्वात आवडती राईड म्हणजे नेरळ बदलापूर रोडवरील. पावसाळ्यातील येथील वातावरण काही औरच असते.

Neral Badlapur road

माथेरान गेट मधून प्रवेश केल्यानंतर नागमोडी वळणे घेत नेरळ माथेरान रोडमार्गे आजूबाजूच्या दृश्याचा विशेषतः छोट्या छोट्या हंगामी धबधब्याचा आनंद घेत प्रवास सुरू होता. बदलापूर येथे राहणारी पवनची काही मित्र देखील आम्हाला जोडली गेली. 

Matheran waterfall

ह्या रोडमार्गे जाताना बऱ्याच वेळा माथेरान टॉय ट्रेनचे ट्रॅक लागतात व त्यापैकी पाचव्या ट्रॅक पासून पेब किल्ला ट्रेकला सुरूवात आम्ही केली.

Peb Fort Matheran route

तशी एक पाटी देखील येथे लावण्यात आली आहे.

Peb Fort Matheran route

पार्किंग साथीची जेमतेम जागा येथे उपलब्ध आहे.


Peb Fort Matheran

पेब किल्ला ट्रेक - माथेरान ट्रेन मार्गे (Peb Fort trek via Matheran Train route)

पेब किल्ल्याला भेट देण्याचा उत्तम हंगाम हा अर्थातच पावसाळा आहे. पावसाळ्यातील येथील थंड वातावरण, चोहीकडे पसरलेली हिरवळ आणि मार्गातील छोट्या छोट्या हंगामी धबधब्याचा आनंद घेता येतो. पण घसरडी वाट, गडद धुकं यामुळे  तितकीच काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे.

Peb Fort Matheran route

माथेरान डोंगररांगेतील ह्या किल्ल्याची उंची जवळपास 2100 फूट एवढी असून ट्रेक आनंदवाडी गावातून मध्यम तर माथेरान ट्रेन मार्गे सोपा श्रेणीचा समजला जातो. पावसाळ्यात माथेरान येथे दरडी कोसळत असतात म्हणून मान्सून काळात टॉय ट्रेन बंद असते. नुकतीच दरड येथे कोसळली होती. दरडीच्या भिषणतीची प्रचिती फोटो मध्ये दिसेल. दरडीतून मार्ग काढत पुढील प्रवासाला लागलोत.

Peb Fort Matheran route

एका बाजूला कातळकडा तर दुसऱ्या बाजूला नेरळ लोकवस्ती दिसत होती. त्यात लक्ष वेधून घेतले ते नागमोडी वळणे घेत वाहत जाणारी उल्हास नदीने. एका ठिकाणी वळण एवढ वक्राकार होते की भोर येथील नेकलेस पॉइंटची आठवण आली.

Peb Fort Matheran route

पावसाळा जरी असला तर वातावरण मात्र क्षणातच बदलत होते. कधी उन तर कधी पाऊस आणि त्यात आम्हाला आधीच भरपूर उशीर झाला होता. वाटेतील लहान लहान धबधब्याचा आनंद लुटत आमचा ट्रेक सुरु होता.

Peb Fort Matheran route

माथेरान ट्रेन मार्ग पूर्णपणे मार्क आहे त्यामुळे मार्ग चुकण्याचा प्रश्नच नाही. पण तेच आनंदवाडी गावातून येताना थोडा गोंधळ होऊ शकतो. गावात गेल्यावर सुरूवातीचा मार्ग आपल्याला गावकऱ्यांकडून विचारावा लागतो व नंतर टॉवर मार्गे जाताना थोडाफार गोंधळ होण्याची शक्यता आहे.

आपण पाहिली वेळेस जर ह्या किल्ल्यास भेट देत असाल आणि पावसाळा असेल तर नक्कीच हा मार्ग निवडणे अधिक सोयीचे राहील.

Panorama point Matheran

माथेरान ट्रेन मार्गे माथेरान येथील पॅनोरमा पॉइंटला (Panoroma Point, Matheran) वळसा घालून काही अंतरावर उजव्या बाजूला खालच्या दिशेने मार्ग जातो व तशी पाटी देखील येथे लावण्यात आली आहे. येथून थोडे खाली उतरताच उजव्या बाजूला मार्ग जातो किल्ल्याकडे तर डावीकडे मार्ग कड्यावरचा गणपतीकडे. 

Peb Fort Matheran route

आम्ही अगोदर किल्ल्याकडे निघालो व वाटेत एका छोट्या गुहेत श्री शंकर आणि गणपती यांची मूर्ती पाहायला मिळाली.

Peb Fort Matheran route

पर्यटकांच्या सोयीसाठी अवघड चढ असलेल्या ठिकाणी लोखंडी शिड्या लावण्यात आल्या आहेत.

Peb Fort Matheran route

पेब किल्ल्याच्या मागेच म्हणजेच उत्तरेला गडद धुक्यात हरवलेला चंदेरी किल्ला (Chanderi Fort) दिसत होता.

Peb Fort Matheran route

ह्याच डोंगररांगेत पुढे ताहुली (Tahuli Peak) आणि मलंगगड (Malanggad Fort) आहे. कधी उन तर कधी पाऊस आणि त्यात वारा देखील सुसाट सुटला होता. वाऱ्यामुळे गवतावरील लहरींचा खेळ बघायला मिळाला. 

Peb Fort

काही अंतर पुढे चालून आल्यावर माथेरान व किल्ल्याला जोडणाऱ्या खिंडीत आलोत.

Peb Fort

Peb Fort

किल्ल्याच्या शेवटच्या टप्प्यात किल्ल्यावर जाण्यासाठी लोखंडी शिड्या लावण्यात आलेल्या आहेत.

Peb Fort

गडावरील आणि जवळपासची भेट देण्याची ठिकाणे (Places to Visit on Fort and Nearby)

गडावरील भेट देण्यासारखी ठिकाणे म्हणजे सर्वोच्च ठिकाणावरील मंदिर, दक्षिणेकडील बुरूज आणि शिवमंदिर व जवळील पाण्याच्या टाक्या. आनंदवाडी गावातून येताना मार्गात आपल्याला गुहा देखील पाहायला मिळेल.

  • सर्वोच्च ठिकाणावरील मंदिर (Temple at Fort Top)

किल्ल्यावर प्रवेश करताच प्रथम शिवमंदिर कडे जाण्यासाठी मार्ग आहे पण आम्ही आगोदर सर्वोच्च ठिकाणावरून मंदिराकडे निघालो. 

Shiva temple peb Fort

सुरक्षेच्या दृष्टीने मंदिराकडे जाणाऱ्या मार्गाच्या दोन्ही बाजूस रेलिंग लावण्यात आली आहे. मंदिरात दत्तांच्या पादुका, काही मुर्त्या व गजानन महाराज पालखी आहे. 

Temple peb fort

Peb Fort


Peb Fort temple

येथून उत्तरेकडील चंदेरी किल्ला, पूर्वेकडील नेरळ शहर व उल्हास नदी तर दक्षिणेकडील माथेरान व धुक्यात हरवलेले प्रबळगड व कलावंतीण दुर्ग दिसत होता.

Peb Fort

आनंदवाडी गावातून येणारा मार्ग माथेरान मार्गाच्या अगदी विरुद्ध बाजूने थेट मंदिराकडे येतो. 

  • दक्षिणेकडील बुरुज (Bastion towards Matheran side)

मंदिराजवळ काही वेळेची विश्रांती घेऊन आम्ही दक्षिणेकडील बुरुजाकडे निघालो. बुरूज तितकासा सुस्थित नाही पण येथून दिसणारा नजारा मात्र मंत्रमुग्ध करणारा आहे.
Peb Fort bastion

  • शिवमंदिर व तेथील पाण्याच्या टाक्या (Shiva temple and Water tanks)

आता निघालोय ते शिवमंदिर व तेथील पाण्याच्या टाक्या पाहण्यासाठी. मंदिराशेजारी प्रचंड कातळात खोदलेल्या बऱ्याच  पाण्याच्या टाक्या आहेत.

Shiva temple peb Fort

Shiva temple peb Fort

मंदिरात शिवलिंग व भिंतीवर पेब देवीची मूर्ती आहे.

Shiva temple peb Fort

परत माथेरानच्या दिशेने जाताना वारा भरपूर सुसाट वेगाने वाहत होता. अक्षरशः वाऱ्याचा दबाव अंगावर जाणवत होता. पण त्यामुळे गवतावरील लहरींचा खेळ आणखीन रंगत चालला होता.

Peb Fort

वाटेत इंद्रधनुष्य पाहायला मिळाले. मी पहिल्यांदाच असे काही दृश्य पाहत होतो म्हणून फार अप्रूप वाटत होते.

Peb Fort Matheran route

  • कड्यावरचा गणपती (Kadyavarcha Ganpati)

पुन्हा सुरुवातीच्या पाटी जवळ येऊन आता डावीकडे जाणारी वाट पकडून कड्यावरचा गणपती कडे निघालो. 

Kadyavarcha ganpati Matheran

अगदीच पाच मिनिटात आम्ही तिथे पोहचलो. मूर्तीची अवाढव्यता येथे आल्यावरच कळते. 

Kadyavarcha ganpati Matheran

मूर्ती गाभाऱ्यात गणपतीचे छोटे मंदिर आहे. 

Kadyavarcha ganpati Matheran

मंदिर परिसर लहान आणि मूर्तीची उंची जास्त असल्याने एका नजरेत पूर्ण मूर्ती पाहणे तसे कठीणच. म्हणून पूर्ण मूर्ती पाहण्यासाठी आम्ही परत माथेरान ट्रेन मार्गावर आलो.

Kadyavarcha ganpati Matheran

Kadyavarcha ganpati Matheran

आजची आपली भटकंती येथेच संपते.

ह्या भटकंतीचा यूट्यूब व्हिडियो पाहण्यासाठी पेब किल्ला येथे क्लिक करा व रायगड जिल्ह्यातील अन्य भटकंती ब्लॉग वाचण्यासाठी रायगड येथे क्लिक करा.

#pebfort #vikatgad #matheran #matheranhills #kadyavarchaganpati #raigad #maharashtra #forts #sahyadribhatkanti 




Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu