#GeotagsBhatkanti सिरीज
वडप गावातून भिवगड/भीमगड ट्रेक (Bhivgad Trek, Karjat) करून मुंबईच्या दिशेने चौक कर्जत मुरबाड मार्गाने परत येताना वावर्ले गावाजवळ (Wavarle village) हा फोटो घेण्यात आला आहे. फोटोमध्ये वावर्ले गावाचे प्रवेशद्वार देखील दिसेल आणि सोंडेवाडी (Sondewadi village) व्यतिरिक्त ह्या गावातून देखील सोप्या श्रेणीचा ट्रेक करून सोंडाई किल्ल्याला (Sondai Fort) जाता येते. पण सोंडेवाडी पेक्षा जास्तीचा वेळ वावर्ले गावातून लागतो.
सोंडाई किल्ला, माथेरान, प्रबळगड आणि इरशाळगड येथून नजरेस पडतात. ह्या मार्गावर मुंबईच्या दिशेने जाताना मोरबे धरणाच्या काठाकाठाने एक मार्ग सोंडेवाडी गावाकडे जातो तर पुढे कर्जत फाटा पासून चौक जवळ मार्ग आहे इरशाळगडाला (Irshalgad Fort) जाण्यासाठी. आणखीन काही किमी पुढे मुंबईच्या दिशेने आले असता पनवेल मधील अजिवली गावापासून मार्ग जातो प्रबळगड व कलावंतीण दुर्गसाठी (Prabalgad and Kalavantin durg) तर माथेरानला (Matheran) जाण्यासाठी वावर्ले गावापासून कर्जतकडे जाऊन कर्जत नेरळ मार्गाने नेरळ येथून रस्ता आहे व वाटेत लागणाऱ्या दिकसाल गावातून (Diksal village) धोम तलावाच्या (Dhom lake) बाजूने माथेरान मधील गार्बेट पॉइंट (Garbett Point, Matheran) येथे ट्रेक करता येतो.
#sondaifort #matheran #prabalgad #irshalgad #raigad #sahyadribhatkanti
0 Comments