मामा भांजा हिल्स | Mama Bhanja Hills | ठाणे | Thane | Highest Peak of Thane City | Sahyadri Bhatkanti

माझ्यासारख्या शहरी भागात राहणाऱ्या भटकंती प्रेमींना ट्रेक किंवा कुठे फिरायला जायचं म्हटलं की शहराच्या गर्दीपासून दूर जावे लागते. पण ह्याच शहरामध्ये काही ठिकाणे आपला नैसर्गिक ठेवा जपत आजही आपल्याला निसर्गाशी एकरूप होण्याची संधी देतात. असेच एक ठिकाण जे की ठाणे शहराचे सर्वोच्च ठिकाण (Highest Peak of Thane City) मानले जाते, ते म्हणजे मामा भांजा हिल्स (Mama Bhanja Hills, Thane).

Mama Bhanja Hills thane

बायको सोबतचा हा माझा पहिलाच ट्रेक, त्याच भटकंतीचा हा ब्लॉग. ह्याच भटकंतीचा यूट्यूब व्हिडियो पाहण्यासाठी शेवटी लिंक देण्यात आली आहे.

ट्रेकची सुरूवात मामा भांजा हिल्सच्या पायथी असलेल्या लोकमान्य नगर (Lokmanya Nagar, Thane) येथील पार्किंगच्या जागेपासून होते.

Mama Bhanja Hills thane

माझ्या घरापासून अगदी 17 किमी अंतरावर हे ठिकाण आहे. पार्किंगमध्ये बाईक उभी केली आणि ट्रेकला सुरूवात झाली.

Mama Bhanja Hills thane

काही मिनिटे चाललोत की लगेच मार्ग डावीकडे वळला. तेवढ्यात पावसाच्या सरी देखील यायला लागल्या.

Mama Bhanja Hills thane

पावसाळ्यात ह्या मार्गावर बऱ्याच ठिकाणी छोटे छोटे पाण्याचे झरे लागतात.

Mama Bhanja Hills thane

अगदीच पाच मिनिटात ट्रेकच्या पहिल्या चेकपॉइंट जवळ आम्ही पोहचलो. 

Mama Bhanja Hills thane

ह्या बोर्ड पासून पुढील मार्ग पूर्णपणे दगडी पायऱ्याचा आहे त्यामुळे मार्ग चुकण्याची कुठलीच शक्यता नाही.

Mama Bhanja Hills thane

येथे जर स्वतःची गाडी घेऊन येणार असाल तर Google maps च्या साहाय्याने आधी लोकमान्य नगर, ठाणे येथे येऊन स्थानिकांकडून पार्किंगच्या जागेबद्दल विचारावे जेथून हा ट्रेक सुरु होतो. जर सार्वजनिक वाहतुकीने यायचे असेल तर ठाणे हे जवळील रेल्वे स्टेशन आणि तेथून अगदीच 5 किमी अंतरावर लोकमान्य नगर आहे ज्यासाठी बस किंवा रिक्षा आपल्याला सहज मिळेल.

पूर्ण मार्ग घनदाट जंगलातून असल्याने कुठल्याही हंगामात येथे आपण येऊ शकता. पावसाळा आणि हिवाळा हे मामा भांजा हिल्स भेटीचे उत्तम हंगाम मानले जातात. विशेषतः पावसाळ्यात हफ्ता अखेरीस येथे लोकांची बरीच गर्दी असते.

वीस पंचवीस मिनिटांनी आम्ही ट्रेकच्या दुसऱ्या चेकपॉइंट जवळ पोहचलो ते म्हणजे मस्तान दरबार (Mastan Darbar). 

Mama Bhanja Hills thane

खाण्यापिण्याच्या सोय असलेले हे एक महत्त्वाचे ठिकाण.

Mama Bhanja Hills thane

काही वेळेचा आराम करून आम्ही पुढील प्रवासास लागलो.

Mama Bhanja Hills thane

संध्याकाळ पाच वाजण्या अगोदर डोंगरावरून खाली उतरणे बंधनकारक असून संध्याकाळी पाच नंतर डोंगर चढण्यास किंवा डोंगरावर मुक्काम करण्यास मनाई आहे. त्यामुळे ट्रेकचे वेळेत नियोजन करणे गरजेचे.

Mama Bhanja Hills thane

डोंगरावरून ठाणे शहराचे दृश्य (View of Thane City) पाहायचे होते पण धुके इतके होते की काही अंतरावरच दिसेना.

Mama Bhanja Hills thane

जवळपास पाऊण तासांनी आम्ही तिसऱ्या चेकपॉइंटला पोहचलो जेथून डावीकडे डावीकडील मार्ग जातो भांजा दर्गाकडे तर उजवीकडील मार्ग जातो मामा दर्गाकडे.

Mama Bhanja Hills thane

Mama Bhanja Hills thane

Mama Bhanja Hills thane

आम्ही अगोदर मामा दर्गाकडे निघालो. अगदीच टेकडीवर असलेली हीच दर्गा ठाणे शहराचे सर्वोच्च ठिकाण मानले जाते.

Mama Bhanja Hills thane

दर्जाच्या पायथी काही घरे आहेत व येथील लोकच ह्या परिसराची देखभाल करतात. 

Mama Bhanja Hills thane

त्यांच्या मते शनिवारी, रविवारी येथे होणारी गर्दी ही दर्शनासाठी नव्हे तर फक्त मनोरंजन, फोटो/व्हिडियो काढण्यासाठी आणि काही लोक तर धूम्रपान व अमली पदार्थांचे सेवन देखील करतात. त्यात मामा दर्गा कडे जाणारी वाट अवघड आणि टेकडीवरून अपघात होण्याची शक्यता असल्याने गर्दीच्या वेळी मामा दर्गा कडे जायला ते मनाई करतात.

Mama Bhanja Hills thane

त्यांच्या चिंतेचा मान राखत खालूनच दर्शन घेऊन आम्ही परत फिरलो. 

Mama Bhanja Hills thane

Mama Bhanja Hills thane

घरांच्या मागून एक वाट डोंगराच्या मागील बाजूस जाते ह्याबद्दल तेथील स्थानिकाने सांगितले. 

Mama Bhanja Hills thane

ह्या मार्गाबद्दल कुठलीच कल्पना आम्हाला नव्हती. घनदाट झाडीतून हा मार्ग पुढे असे काही दृश्य दाखवेल याचा विचार देखील आम्ही केला नव्हता.

कुठलीच पूर्वकल्पना नसताना जेव्हा एखादा सुखद प्रसंग आपल्यासोबत घडतो आणि तेव्हा जो आनंद होतो, तेव्हा जसे मन भारावून जातेना, तसेच काही आमच्यासोबत घडले.

समोर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (Sanjay Gandhi National Park, Boriwali) व तुळशी तलाव (Tulsi Lake) नजरेस पडतो.


Mama Bhanja Hills thane

Mama Bhanja Hills thane

Mama Bhanja Hills thane

पावसाने पुन्हा एकदा जोर धरला, त्यामुळे थोडा वेळ थांबून नाश्ता केला.

आता भांजा दर्गा खुणावत होता. महिलांना लांबून दर्शनास येथे मुभा आहे.

Mama Bhanja Hills thane

Mama Bhanja Hills thane

Mama Bhanja Hills thane

Mama Bhanja Hills thane

मामा दर्गाला पुन्हा नक्की येऊन असा विश्वास स्वतःला देत ही भटकंती येथेच संपवली आणि परतीच्या प्रवासास लागलोत.

Mama Bhanja Hills thane

ठाणे जिल्ह्यातील अन्य ब्लॉग वाचण्यासाठी Thane येथे क्लिक करा.

ह्याच भटकंतीचा यूट्यूब व्हिडियो पाहण्यासाठी Mama Bhanja Hills येथे क्लिक करा.

#mamabhanjahills #lokmanya_nagar #thane #highest_peak_of_thane_city #sahyadribhatkanti

Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu