View of Matheran hills from Peb fort | Prabalgad | Geotags Bhatkanti | Raigad | Sahyadri Bhatkanti

 #GeotagsBhatkanti सिरीज

(जियोटॅग भटकंती - ठिकाणांचे भौगोलिक टॅगिंग)

View of Matheran hills from Peb Fort

जवळपास दीड तासाच्या माथेरान ट्रेन मार्गाने (Peb fort via Matheran train route) ट्रेक नंतर पेब किल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणावर असलेल्या दत्त मंदिराकडे पोहचलो. सुरक्षेच्या दृष्टीने येथे रेलिंग लावण्यात आली आहे. तेथून माथेरानच्या दिशेने हा फोटो घेण्यात आला आहे. फोटोत गडावरील एकमेव दक्षिणेकडील बुरूज दिसेल व त्यापलीकडे माथेरान आहे. पेब किल्ला माथेरान ट्रेन मार्गाने करताना कड्यावरचा गणपती (Kadyavarcha Ganpati) देखील पाहता येतो जे ह्या बाजूने ट्रेकचे आकर्षण बनले आहे तर आनंदवाडी गावातून येताना गुहा पाहायला मिळतात. 

किल्ल्यावरून माथेरान मधील काही पॉइंट देखील नजरेस पडतात त्यातील काही फोटोत मार्क केलेले आहेत ते म्हणजे पॅनोरोमा पॉइंट (Panorama Point) व त्यामागे दिसतोय तो माउंट बॅरी (Mount Barry), हार्ट पॉइंट (Heart Point), मंकी पॉइंट (Monkey Point), माळदुंगा पॉइंट (Maldunga Point), मॅलेट स्प्रिंग पॉइंट (Malet Spring Point) आणि सनसेट पॉईंट म्हणजेच पॉर्कुपाइन पॉइंट (Sunset/Porcupine Point). सनसेट पॉईंट मागे एकामागे एक असे चेनोय पॉइंट (Chenoy Point), रुस्तुमजे पॉइंट (Rustomje Point), कोरोनेशन पॉइंट (Coronation Point), मलंग पॉइंट (Malang Point) व लुइसा पॉइंट (Louisa Point) आहेत जे येथून नजरेस येत नाहीत. उजवीकडे दाट धुक्यात लपलेले प्रबळगड (Prabalgad Fort) आणि कलावंतीण दुर्ग (Kalavanting Durg) दिसून येत आहेत पण पुढेच असलेला इरशाळगड मात्र येथून नजरेस पडत नाही. 

#pebfort #vikatgad #matheran #raigad #sahyadribhatkanti

Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu