North west view from Songiri Fort | Karjat | Geotags Bhatkanti | सोनगीरी किल्ला | कर्जत | Sahyadri Bhatkanti

 #GeotagsBhatkanti सिरीज

काही दिवसापूर्वी कर्जत मधील तसा बराचसा अपरिचित असा सोनगीरी किल्ला ट्रेक (Songiri Fort trek) केला आणि हा आयुष्यातील एक अविस्मरणीय ट्रेक बनला. ह्या किल्ल्यावरून 12 पेक्षा जास्त किल्ले, सह्य सुळके, प्रसिद्ध ठिकाणे मला पाहता आले आणि त्यातील जवळपास सर्व ट्रेक मी केलेले असल्याने स्वतःला कनेक्ट करू शकलो. सोनगिरी किल्ल्यावरून उत्तर - पश्चिमेला दिसणारे दृश्य ह्या फोटो मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सर्वात जवळ आहे तो सोंडाई किल्ला (Sondai Fort)  आणि कर्जत चौक मार्गावर लागणाऱ्या वावर्ले गावातून हा ट्रेक करता येतो. त्यामागे आहे पर्यटकांच्या गर्दीने गजबजलेले माथेरान (Matheran) व त्याच्या मागे आहे पेब किल्ला किंवा विकटगड (Peb Fort/Vikatgad). पेब किल्ला ट्रेक आनंदवाडी गाव किंवा माथेरान ट्रेन मार्गे करता येतो. त्यानंतर माथेरान मागे पसरलेला पठार म्हणजे प्रबळगड (Prabalgad) व अगदीच त्याला लागून कलावंतीण दुर्ग (Kalavantin Durg) आहे पण फोटो मध्ये तो सुळका दिसत नाही. शेजारी आपल्या विशिष्ट आकारामुळे दुरूनही ओळखला जाणार इरशाळगड (Irshalgad) दिसतोय. मुंबई पुणे जुना महामार्गावर चौक जवळ मोरबे धरणाच्या जवळ असलेल्या मनिवली गावातून ट्रेक करता येतो. 

#songirifort #matheran #prabalgad #pebfort #raigad #sahyadribhatkanti

Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu