वरळी किल्ला | वरळी कोळीवाडा | मुंबई | Worli Fort | Worli Koliwada | Mumbai | Sahyadri Bhatkanti

आधुनिक मुंबईच्या उतुंग इमारतीच्या रांगेत काही इतिहासिक आजही आपल्याला मुंबईच्या इतिहास काळाची आठवण करून देतात. त्यापैकीच एक म्हणजे वरळी किल्ला (Worli Fort, Mumbai).

Worli fort Mumbai

ह्या भटकंतीचा यूट्यूब व्हिडियो पाहण्यासाठी शेवटी लिंक देण्यात आली आहे.

वरळी किल्ला, मुंबई मधील वरळी कोळीवाडा (Worli Koliwada, Mumbai) येथे स्थित असून सह्याद्री प्रतिष्ठान मुंबई विभागाची मीटिंग किल्ल्यावर ठेवण्यात आली होती. सह्याद्री प्रतिष्ठान मुंबई विभागाचा मी सदस्य असल्याने किल्ल्याकडे निघालो. माझ्या घरापासून (घाटकोपर) जवळपास 20 किमी अंतरावर किल्ला आहे.

Eastern express Highway

Eastern express Highway पकडून दादर स्टेशन जवळ आलो व तेथून मग वरळी कोळीवाडा पर्यंत पोहचलो. येथून पुढील मार्ग अगदीच अरुंद आहे. पण बाईक सहज जाईल. मी बाईक थेट किल्ल्यापाशी घेऊन आलो.

Worli fort Mumbai

किल्ल्यामधे जाण्यासाठी एकच प्रवेशद्वार असून दगडी जिना चालून किल्ल्यात प्रवेश केला.

Worli fort Mumbai

Worli fort Mumbai

किल्ल्याच्या मधोमध हनुमानाचे मंदिर असून शेजारीच गोड्या पाण्याची विहीर आहे. वरळी कोळीवाडा मार्फत येथे जिमखाना देखील चालवला जातो.

Worli fort Mumbai

Worli fort Mumbai

सह्याद्री प्रतिष्ठान, मुंबई विभागाची मीटिंग सुरू झाली. काही दुर्ग सेवकांनी त्यांचा दुर्ग संवर्धन कार्यातील अनुभव सांगितला.

Worli fort Mumbai

त्यात सर्वात लक्षवेधी राहिला तो गणेश रघुवीर सरांचे अनुभव, किल्ल्याकडे संवर्धनाच्या हेतूने पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन आणि ही दुर्ग संवर्धन चळवळ आणखीन बळकट करण्यासाठीचे त्यांचे मार्गदर्शन नक्कीच प्रेरणादायी होते.

Worli fort Mumbai

येथील स्थानिक व जिमखाना सोबतच किल्ल्याची देखभाल करणारे डॅनी यांनी त्यांच्या जिमखाना आणि किल्ल्याच्या काही आठवणीने उजाळा दिला.

Worli fort Mumbai

एकावेळी मुंबई फक्त बेटांचा समूह होती तेव्हा माहीम, शिवडी, वरळी, शिव इत्यादी काही ठिकाणी किल्ले बांधण्यात आले.

Worli fort Mumbai

मुंबई बेटांना मुख्य भुमिपासून वेगळी करणारी महिकावर्ती उर्फ महिमची खाडी अतंत्य महत्त्वाची.

Worli fort Mumbai

या खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी तीन महत्वाचे किल्ले म्हणजे बांद्रा किल्ला (Bandra Fort), माहीम किल्ला (Mahim Fort) आणि वरळी किल्ला.

Worli fort Mumbai

आज जरी हे किल्ले कालबाह्य होण्याच्या दिशेने वाटचाल करत असेल तरी ज्या काळात त्यांची गरज होती तेव्हा त्यांनी चोख भूमिका पार पाडली हे मात्र विसरता कामा नये.

Worli fort Mumbai

वरळी किल्ल्याला भक्कम आणि रुंद तटबंदी असून या गस्तीमार्गावर एक मीटर उंचीचा कठडा आहे. या कठड्याला बऱ्याच ठिकाणी खाचा पासून तोफा ठेवण्यासाठी जागा केलेली आहे तर मधल्या भागात दिवे ठेवण्यासाठी कोनाड्याची सोय देखील करण्यात आली आहे.

Worli fort Mumbai

किल्ल्याच्या एका बाजूला त्रिकोनाकृती बुरूज असून बुरुजावर घंटा बांधण्यासाठी दगडी मनोरा बांधण्यात आला आहे. ज्यास बेल टॉवर असे म्हणतात व याचा उपयोग धोक्याची सूचना देण्यासाठी झाला असावा.

Worli fort Mumbai

Worli fort Mumbai

किल्ल्यावरून अरबी समुद्र, माहीम खाडी व बांद्रा वरळी सी लिंक (Bandra Worli sea link) यांचा नजारा पाहायला मिळतो. विशेषतः बांद्रा वरळी सी लिंक बांधनीनंतर वरळी गाव व किल्ल्याकडे लोकांचे लक्ष वेधले गेले.

Worli fort Mumbai

किल्ला बाहेरून पाहिला असता आपल्या लक्षात येईल की किल्ल्याला खाली प्रचंड मोठा पायाचा आधार असून त्यावर मुख्य तटबंदी आहे.

Worli fort Mumbai

भविष्याकडे जलद गतीने वाटचाल करणाऱ्या ह्या मुंबा नगरीत काही क्षणांसाठी पुन्हा इतिहास काळात घेऊन जाणाऱ्या ह्या वरळी किल्ल्याला आपण नक्की भेट द्या.

Worli fort Mumbai

मुंबईला आज फक्त अर्थ कारणांसाठी पाहिले जाते पण तसे नाही आहे. मुंबई मध्ये देखील अशी पुष्कळ पर्यटन स्थळे आहेत ज्यांना आपण भेट देऊ शकता, ती पाहू शकता. लोकांनी त्या दृष्टीने पहावे त्यासाठीचा हा एक प्रयत्न.

Worli fort Mumbai

आपल्याला आमचा हा प्रयत्न कसा वाटला ते मला नक्की कळवा व ह्याच भटकंतीचा यूट्यूब व्हिडियो पाहण्यासाठी वरळी किल्ला येथे क्लिक करा.

मुंबईतील अन्य भटकंती ब्लॉग वाचण्यासाठी मुंबई येथे क्लिक करा.

जय शिवराय

#worlifort #koliwada #worli #mumbai #fortsinmumbai #fortsofmumbai #sahyadribhatkanti


Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu