तीन महिन्यांनंतर नवीन भटकंतीसाठी सज्ज झालो पण प्रवास ह्यावेळी फार लांबचा होता आणि सह्याद्री पासून लांब जात होतो. विमानात बसलो आणि निघालो. विमानाने भरारी घेतली आणि लखनौच्या दिशेनं निघालो. नेहमीप्रमाणे खिडकीतून बाहेर पाहण्याची सवय. पण अस काही पाहायला मिळेल ह्याची थोडी ही कल्पना नव्हती. एक सुळका दिसला आणि क्षणार्धात ओळखले का हा मलंगगड आहे. दुसऱ्या क्षणी डोळे आजूबाजूची सह्य शिखरे, किल्ले शोधायला लागले. आणि पाहता पाहता त्या भागातील पूर्ण किल्ल्यांची, शिखरांची शृंखला पाहता आली. डोळ्याने जे पाहिले ते कुठलाच कॅमेरा जश्याच तसे टिपू शकणार नाही तरी ही एक फोटो आपल्या सोबत शेअर करत आहे. ह्यात मलंगगड, गणेश कार्तिक शिखर, ताहुली शिखर, म्हैसमाळ, चंदेरी किल्ला, पेब किल्ला, माथेरान, प्रबळगड आणि इरशाळगड ह्यांची स्थान दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
Drone कॅमेराने ह्या सह्याद्रीच रूप दाखवणारे बरेच व्हिडिओ पाहिले पण हे स्वतः असे डोळ्याने पाहता आले हे खरंच माझे भाग्यच.
#malanggad #chanderifort #prabalgad #matheran #raigad #sahyadribhatkanti
0 Comments