भिवगड | भिमगड | Bhivgad fort | Vadap waterfall | Karjat | Raigad | Sahyadri Bhatkanti

जिल्हा - रायगड
पायथ्याचे गाव - वडप/गौरकामात (Vadap/Gaurkamat)
उंची (Height of the fort) - ८५० फूट
श्रेणी (Grade) - सोपी
सहनशक्ती पातळी (Endurance level) - कमी
वेळ (पायथा ते किल्ला) - अर्धा ते पाऊण तास
जवळील रेल्वे स्टेशन (Nearest railway station)) - कर्जत
मुंबई ते वडप - ७० किमी
पुणे ते वडप - १०० किमी
दिनांक - ८ ऑगस्ट २०२१

Bhivgad fort trek karjat
भिवगड - पावसाळी ट्रेक 
कर्जत तालुक्यात सोपी ते मध्यम ते अवघड श्रेणी असलेले बरेच ट्रेक आहेत. पावसाळा आला होता म्हणून आम्ही छोटासा ट्रेक करण्याचा प्लॅन केला. कारण, पावसाळ्यात सोपे ट्रेक देखील चिखल, सरडती वाट आणि हवामान अनिश्चितता यामुळे अवघड वाटायला लागतात. कर्जत तालुक्यातील बरेच ट्रेक मी केले आहेत पण काही अजूनही राहिले होते. त्यात सोपा, एकदिवसीय ट्रेक होता भिवगड. ह्या किल्ल्यास भिमगड (Bhimgad fort) या नावाने देखील ओळखले जाते. 

ह्या किल्ल्याचा ट्रेक दोन गावातून करता येतो. पहिले गाव म्हणजे वडप (Vadap village), जेथून अर्धा पाऊण तासाचा सोप्या श्रेणीचा ट्रेक करत आपण किल्ल्याच्या दक्षिणेकडील बाजूने थेट बालेकिल्ल्यावर प्रवेश करता येतो. दुसरे गाव म्हणजे गौरकामत (Gaurkamat village), जेथून देखील अर्धा पाऊण तासाचा ट्रेक करत आपण किल्ल्याच्या उत्तरेकडील बाजूने किल्ल्यावर प्रवेश करता. गौरकामात गावातून येणारा मार्ग जास्त सोपा आणि काही ठिकाणी पायऱ्यांचा आहे. 

मुंबई ते वडप गाव प्रवास

मुंबई ते वडप गाव हे अंतर जवळपास ७० किमी तर पुणे ते वडप हे अंतर जवळपास १०० किमी. मी बाईकने जाणार होतो आणि बदलापूर येथे मला वैयक्तिक काम होते. मी आणि माझा मित्र पवन, अशे दोघेच भल्या पहाटे उठून घणसोली - शिळफाटा - बदलापूर - माथेरान - कर्जत असा प्रवास करत वडप गावी आलोत. सर्वात सोपा आणि जवळचा मार्ग म्हटलं तर मुंबई - कळंबोली - पनवेल - चौक - कर्जत आणि मग वडप गाव. माझ्या ह्या प्रवासात सर्वात आवडता क्षण म्हणजे बदलापूर ओलांडून पुढे माथेरान कडे जातानाचा प्रवास, नेरळ कर्जत मार्गाने.

neral badlapur road
नेरळ बदलापूर मार्ग
पावसाळी रम्य वातावरण आणि उजव्या बाजूला साद घालत होती माथेरान डोंगररांग (Matheran mountain range) ज्यात मलंगगड (Malanggad fort), ताहूली (Tahuli peak), चंदेरी किल्ला (Chanderi fort), पेब किल्ला (Peb fort), माथेरान (Matheran), सोंडाई किल्ला (Sondai fort), इरशाळगड (Irshalgad fort), प्रबळगड (Prabalgad fort) असे बरेच ट्रेकसाठीची उत्तम पर्याय.
matheran mountain range
माथेरान डोंगररांग
नेरळ बदलापूर मार्गाने माथेरान प्रवेशद्वार पर्यंत आलोत.
matheran entrance gate
माथेरान प्रवेशद्वार
व तेथून पुढे नेरळ कर्जत मार्गाने कर्जत रेल्वे स्टेशनला आलो. 
neral karjat road
नेरळ कर्जत मार्ग
karjat station
कर्जत स्टेशन जवळ
कर्जत स्टेशन पासून ७ किमी अंतरावर वडप हे गाव आहे. येथून डावीकडे वळून आम्ही गावाकडे निघालो. वडप गावात येताच किल्ला समोर दिसत होता.
vadap village
वडप गाव
तशी एक पाठी आपल्याला वडप गावात पाहायला मिळेल. गाव ओलांडून किल्ल्याची दिशेने पुढे आले की ट्रेकला सुरुवात होते.
vadap village
वडप गावाच्या पायथी असलेली किल्ल्याची पाटी

ट्रेकला सुरुवात

पायथी गौरमाता देवीचे मंदिर (Gaurmata devi temple) आहे. पण आम्ही तिथे गेलो तेव्हा मंदिर बंद होते.

vadap village
गौरमाता मंदिर, वडप
त्यामुळे अगोदर किल्ला आणि मग धबधबा भेट देऊन देवीच्या दर्शनास येऊ असे ठरवले. समोर एका बाजूला किल्ला किल्ला तर लागूनच वडप धबधबा (Vadap waterfall) आहे. 
vadap village waterfall
वडप धबधबा (Vadap waterfall)
bhivgad fort karjat
भिवगड
ट्रेकची पहिला टप्पा म्हणजे पायथा ते खिंडीपर्यंतचा सोपा ट्रेक. ट्रेक मार्ग पूर्णपणे ओळखू येईल असा आणि ट्रेक दरम्यान किल्ल्या डोळ्यासमोरच असल्याने वाट चुकण्याची शक्यता नाही. 
bhivgad fort trek
ट्रेकला सुरुवात
संथ गतीने वाट किल्ल्याकडे आणि उंचीवर जात होती. नागमोडी वळणे घेत, कधी झाडांच्या सावलीत तर कधी गवतांनी झाकलेल्या डोंगर मार्गाने खिंडीकडे आम्ही निघालो. 
bhivgad fort trek
खिंडी पर्यंतचा सोपा ट्रेक मार्ग
शेजारील धबधब्याचा आवाज ऐकू येत होता. ट्रेक करून आल्यानंतर आम्ही तिकडे जाणार होतो. पावसाळी वातावरण असल्याने उन्हाचा तडाखा जाणवला नाही. 
bhivgad fort trek
ट्रेक मार्ग
जवळपास अर्धा तासानंतर आम्ही खिंडीत पोहोचलो. 
खिंड
येथून उजवीकडील मार्ग ढाक बहिरी (Dhak Bahiri trek) ट्रेकसाठी जातो.

bhivgad fort trek
ढाक बहिरी ट्रेकसाठी मार्ग
तर डावीकडील मार्ग भिवगड किल्ल्याकडे. 
bhivgad fort trek
खिंडीतून किल्ल्याकडे जाणारा मार्ग
कर्जत तालुक्यात रेंज ट्रेक करायचा असेल तर हे एक उत्तम ठिकाण आहे. आम्ही डावीकडे वळून किल्ल्याकडे निघालो. 
bhivgad fort trek
गडमाथ्याकडे जाणारी वाट
येथून ट्रेकचा दुसरा टप्पा सुरू होतो. आता थोडा चढ सुरु झालं होता पण वातावरण एवढे आल्हाददायक होते की काही थकवा जाणावलाच नाही. अगदीच १० मिनिटांनी आम्ही गडमाथ्यावर आलो. 
bhivgad fort trek
गडमाथ्याकडे जाणारी वाट

किल्ल्यावर पाहण्याची ठिकाणे (Places to visit on the Bhivgad fort)

गडमाथ्यावर पोहचताच काही बांधकामाचे अवशेष दिसले. असा हा किल्ला कमी लोकांना ज्ञात पण ह्यावेळी लोकांची बरीच गर्दी येथे पाहायला मिळाली.

bhivgad fort trek
बालेकिल्ला 
सोप्या श्रेणीचा एक दिवसीय ट्रेक, येथील पावसाळ्यातील रमणीय वातावरण आणि शेजारील धबधबा आणि त्यात कोरोना निर्बंधांमळे प्रसिद्ध किल्ले/ट्रेक बंद असल्याने पावसाळ्यात हफ्ता अखेरीस येथे लोकांची बरीच गर्दी होती. काही ट्रेकिंग ग्रुप १००-१५० लोकांना घेऊन आलेले होते. 

बालेकिल्ल्यावर काही पाण्याची टाक्या (Water tanks) पाहायला मिळाली. 

water tanks at bhivgad fort trek
water tanks at bhivgad fort trek
water tanks at bhivgad fort trek

बालेकिल्ल्यावरील पाण्याच्या टाक्या

बहुतांश लोक येथेच थांबून आजूबाजूच्या परिसराचा आनंद घेत होते. आम्ही काही वेळेने किल्ल्याच्या उत्तरेकडील टोकाकडे निघालो. थोडे पुढे चालून खाली आल्यावर सरळ न जाता एका डावीकडील मार्गाने आत शिरलोत. 
water tanks at bhivgad fort trek
पाण्याच्या टाकीकडे जाणारी आडवाट
ही वाट कुठे जाते ते जाणून घ्यायचे होते. थोड्याच अंतरावर वाट संपते. येथे एक पाण्याची टाकी आणि वडप, शेजारील गावाचा सुंदर नजारा पाहायला मिळाला.
vadap village
वडप गाव
water tanks at bhivgad fort trek
पाण्याची टाकी
पुन्हा मुख्य मार्गावर येऊन उत्तरेकडे निघालो आणि मार्ग देखील हळू हळू खाली उतरत होता. 
bhivgad fort trek
किल्ल्याच्या उत्तरेकडे जाणारी वाट
पुढे सरळ उत्तरेकडील टोक आता दिसू लागले आणि त्याअगोदर उजव्या बाजूला एक मार्ग खाली उतरत होता. आम्ही पाहिले उत्तरेकडील टोकाला आलोत. येथे एक भगवा लावण्यात आला आहे. 
bhivgad fort trek
उत्तरेकडील टोक
पावसाळी रम्य वातावरण, आल्हाददायक हवा सुरू होती आणि समोर आजूबाजूच्या परिसराचा सुंदर नजारा पाहायला मिळाला.
bhivgad fort trek
उत्तरेकडील टोक येथून दिसणारा नजारा
येथून गौरकामत गाव (Gaurkamat village) आणि तेथून गडाकडे येणारा मार्ग नजरेस पडला. 
gaurkamat village
गौरकामत गाव आणि तेथून गडाकडे येणारी वाट
थोडा वेळ येथे आराम करून पुन्हा थोडे मागे येताना उजव्या बाजूला असलेल्या मार्गाकडे गेलो. येथे सुरुवातीलाच प्रशस्त असे खांबटाके आहे.
water tank at bhivgad fort
पाण्याचे खांबटाके
येथून खालच्या दिशेने एक मार्ग उतरतो, तोच हा गौरकामत गावातून येणारा मार्ग. मार्ग सोपा आणि काही ठिकाणी पायऱ्यांचा आहे. 
bhivgad fort trek
गौरकामत गावातून येणारी पायऱ्यांचा मार्ग
पुढे प्रचंड अश्या कातळात खोदलेल्या पायऱ्या पाहायला मिळाल्या. 
rock cut steps at bhivgad fort trek
प्रचंड कातळात खोदलेल्या पायऱ्या
तेथून थोडे पुढे येताच डाव्या बाजूला थोड्या उंचीवर दोन गुहा आहेत. पण तेथे जाणे सध्या जोखमीच्या वाटत असल्याने आम्ही आणखीन खाली उतरत गेलो.
caves at bhivgad fort trek
गुहा (Caves) 
बऱ्याच लोकांचा किलबिलाट ऐकू येत होता. तेव्हा थोड खाली उतरल्यावर कळले की येथे दुर्गजागर प्रतिष्ठान मार्फत दुर्ग संवर्धनाचे कार्य सुरू आहे. 
bhivgad fort trek
दुर्ग जागर संस्थेचे संवर्धन कार्य
दुर्ग संवर्धन ही काळाची गरज आहे आणि ह्या कार्यात अविरत काम करणाऱ्या सर्व संस्थांना आमचा सलाम. पुन्हा गडमाथ्यावर आलोत आणि गडाच्या दक्षिणेकडील बाजूने खाली उतरायला सुरुवात केली. 
bhivgad fort trek
पुन्हा खिंडीकडे जाताना
खाली उतरत असताना बालेकिल्ल्यावरून डाव्या बाजूला थोडे खाली एक पाण्याच्या टाकी दिसली होती. 
bhivgad fort trek
दक्षिणेकडील पाण्याची टाकी
आम्ही तिथे गेलो. मातीत गाडली गेलेली तटबंदी आम्हाला इथे दिसली आणि पाण्याची टाकी देखील आहे. 
bhivgad fort trek
गडाची मातीत गाडली गेलेली तटबंदी
water tank at bhivgad fort trek
पाण्याची टाकी

धबधबा, गौरमाता मंदिर आणि परतीचा प्रवास

पुन्हा खिंडीत येऊन खाली उतरत अगदीच १५ मिनिटात आम्ही पायथ्याशी पोहोचलो. आता धबधब्याकडे जायचे होते. 

vadap village waterfall
वडप धबधबा
धबधब्याकडे जाताना निखळ पाण्याचा खळखळ आवाज ऐकू येत होता. धबधब्याच्या मार्गात खालीच बऱ्याच ठिकाणी पर्यटक पाण्यात भिजण्याच आनंद घेत होते. 
vadap village waterfall
vadap village waterfall
धबधब्याचा आनंद घेताना पर्यटक
आम्ही धबधब्या शेजारील मार्गाने वर न जाता, पाण्याच्या प्रवाहातूनच पुढे जात होतो. जागोजागी लोकांना अशा निसर्गरम्य ठिकाणी भिजण्याचा आनंद लुटताना पाहून आम्हाला देखील राहवले नाही. हा आनंद आम्ही देखील अनुभवला आणि क्षणात सर्व थकवा नाहीसा झाला. 
vadap village waterfall
vadap village waterfall
धबधब्याचा आनंद घेताना
पुन्हा खाली येऊन गौरमाता देवीच्या मंदिराकडे निघालो. तेव्हा देखील मंदिर बंदच होते. बाहेरूनच देवीचे दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.
gaurmata devi temple
गौरमाता देवीचे मंदिर
कर्जत चौक मार्गाने आधी चौक आणि तेथून मुंबई पुणे जुन्या महामार्गावर पनवेल - कळंबोली प्रवास करत मुंबईला निघालो.

आमची भटकंती येथेच संपते. ह्याच भटकंतीचा यूट्यूब व्हिडिओ पाहण्यासाठी भिवगड येथे क्लिक करा.

रायगड जिल्ह्यातील इतर ट्रेक ब्लॉग वाचण्यासाठी रायगड येथे क्लिक करा. 

जय शिवराय

#bhivgad #bhimgad #vadap #waterfall #gaurkamat #karjat #raigad #maharashtra #sahyadribhatkanti

Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu