इरशाळगड | Irshalgad Fort trek | Raigad | Monsoon trek | रायगड | Sahyadri Bhatkanti

जिल्हा - रायगड
पायथ्याचे गाव (Base village) - नानिवली
उंची (Height of the fort) - ३७०० फूट
श्रेणी (Grade) - मध्यम (नेढे)
सहनशक्ती पातळी (Endurance level) - मध्यम
वेळ (पायथा ते नेढे) - २ ते अडीच तास
जवळील रेल्वे स्टेशन (Nearest railway station) - पनवेल / कर्जत
मुंबई ते नानिवली - ८० किमी
पुणे ते नानिवली - १०० किमी
दिनांक - ११ जुलै २०२१

irshalgad for trek
इरशाळगड - पावसाळी ट्रेक

२०२१ च्या पावसाळ्यात बरीच ट्रेक केली. त्यापैकी एक इरशाळगड ट्रेक. माथेरान शेजारी असलेल्या ह्या किल्ल्याने आपल्या विशिष्ट आकारामुळे, विशेषतः येथील नेढे यामुळे ट्रेकर साठी हे नेहमीच आकर्षण राहिले आहे. हा ट्रेक तसा तीन टप्प्यात केला जातो. पहिला टप्पा म्हणजे नानिवली गावातून पहिले इरशाळवाडी व तेथून पुढे नेढे जवळील निमुळत्या पठारापर्यंत सोपा ट्रेक. दुसरा टप्पा म्हणजे पठारापासून नेढे पर्यंत थोडा अवघड आणि उभा चढ असलेला मध्यम श्रेणीचा ट्रेक. तिसरा टप्पा म्हणजे नेढे (Nedhe - Naturally formed hole in the mountain) पासून किल्ल्याच्या सुळक्यावर जाणे ज्यासाठी प्रस्तररोहन कौशल्य आवश्यक आहे. त्यामुळे नवख्या ट्रेकर पासून ते प्रस्तररोहक येथे येत असतात. बहुतांश लोक पठारापर्यंत ट्रेक करतात तर काही नेढे पर्यंत. नेढेच्या वर चढून सुळक्याच्या पायथ्याशी असलेल्या पाण्याच्या टाकीपर्यंत जाता येते पण ह्या चढाई दरम्यान काळजी घेणे आवश्यक आहे विशेषतः पावसाळ्यात. आम्ही नेढे पर्यंत ट्रेक करणार होतो आणि जमलेच तर पाण्याच्या टाकी पर्यंत व नेढे जवळील छोट्या सुळक्यावर जाण्याचा विचार होता. मी हा ट्रेक २ वर्ष आधी उन्हाळ्यात केला होता. पावसाळ्यात पहिल्यांदाच मी येथे येणार होता. एकच किल्ला वेगवेगळया गावातून किंवा एका गावातून पण वेगवेगळ्या हंगामात करणे ही माझ्यासाठी सर्वात आवडती भटकंती. त्या दृष्टीने हे टाकलेले पहिले पाऊल म्हणता येईल.

irshalgad fort trek
इरशाळगड

मुंबई ते नानिवली गाव प्रवास (How to reach base village from Mumbai)

माझ्या घरापासून जवळपास ८० किमी अंतरावर नानिवली गाव आहे. आम्ही भल्या पहाटे मुंबईतून कळंबोली कडे निघालो. कळंबोली जंक्शन पासून पनवेलकडे जाणारा मार्ग म्हणजेच मुंबई पुणे जुन्या महामार्गाने पुढील प्रवासाला लागलो. 
kalamboli junction
कळंबोली जंक्शन

ह्या मार्गाने जाताना पनवेल जवळील कोण गावात मी नेहमी थांबतो. वातावरण स्वच्छ असेल तर येथून इरशाळगड (Irshalgad), प्रबळगड (Prabalgad), कलावंतीण दुर्ग (Kalavantin durg), माथेरान (Matheran), पेब किल्ला (Peb fort), चंदेरी किल्ला (Chanderi fort), म्हैसमाळ नजरेस पडतात. ह्याच रांगेत पुढे ताहुली (Tahuli peak) आणि मलंगगड (Malanggad) आहे. ढगाळ वातावरण आणि दाट धुक्यामुळे ह्यावेळी फक्त कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगड पाहायला मिळाले. 

kalavantin durg and prabalgad
कोण गाव येथून कलावंतीण दुर्ग व प्रबळगड

ट्रेकर मंडळी 

काही वेळ थांबून पुन्हा प्रवासास लागलो. पनवेल नंतर काही किमी अंतरावर चौक हे गाव आहे. तेथून थोडे पुढे ह्याच मार्गावर मोरबे धरणकडे (Morbe Dam) जाण्यासाठी मार्ग आहे आणि तशी पाटी येते दिसेल. 

morbe dam
नानिवली गावाकडे जाणारा मार्ग

नानिवली गावाकडे (Nanivali village) जाणारा हाच मार्ग. जवळच चौक रेल्वे स्टेशन (Chouk railway station) आहे.
 
chowk railway station
चौक रेल्वे स्टेशन

एका बाजूला धुके व ढगात गुडूप झालेली डोंगरे आणि दुसऱ्या बाजूला मोरबे धरण आणि त्यात रस्ताही चांगला. 

nanivali village irshalgad trek
नानिवली गावाकडे जाणारा मार्ग

असा हा नानिवली गावापर्यंतचा प्रवास. गावाच्या शेवटी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. 

nanivali village irshalgad fort trek
नानिवली गाव - पार्किंग

चौक गावाकडे येण्यासाठी पनवेल आणि कर्जत ही जवळील रेल्वे स्टेशन. दोन्ही स्टेशनपासून चौककडे येण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध आहे. मुंबई पासून चौक हे ८० किमी तर पुणे पासून १०० किमी अंतरावर आहे.

ट्रेकला सुरुवात

पार्किंग पासूनच ट्रेकला सुरुवात होते. येथून किल्ला समोरच दिसतो आणि नेढे देखील नजरेस पडते. 

irshalgad fort trek
ट्रेक मार्ग

irshalgad fort trek
पायथ्यावरून दिसणारा किल्ला

irshalgad fort trek
नानिवली - सूचना फलक

ट्रेक मार्ग पूर्णपणे ओळखू येईल असा आणि त्यात धुके हटले की किल्ला समोरच दिसत असल्याने वाट चुकण्याची कुठलीच शक्यता नाही. 

irshalgad fort trek
ट्रेक मार्ग

समोर लक्ष वेधून घेणारा इरशाळगडाचा सुळका आणि मागे वळून पाहिले की मोरबे धरणाचा विस्तीर्ण जलाशय. 

irshalgad fort trek
ट्रेक मार्ग आणि समोर दिसणारा किल्ला 

irshalgad fort trek morbe dam
मोरबे धरण जलाशय

त्यात धुके इतके की त्यामुळे ट्रेकची थकवा जाणवलाच नाही. वाटेत का गडप्रेमीशी आमची ओळख झाली. वयाने जरी आमच्या पेक्षा तिप्पट असेल तरी त्यांची किल्ल्यांची आवड आणि त्यासाठीची जिद्द आमच्यापेक्षा अनेक पटीने जास्त होती. 

irshalgad fort trek
वाटेत भेटलेले आजोबा

ते राहणार तसे बुलढाणा जिल्ह्यातील आणि ह्या ट्रेकसाठी ते नेरळ वरून पनवेलला आले होते. त्यांच्यासोबत आणखीन बरेच जण होते आणि सर्वात पुढे ते. पनवेल शेजारील बरेच ट्रेक त्यांनी केले होते. इरशाळगडला ते पहिल्यांदाच आले होते. वय वर्ष ६७ असताना देखील जोश मात्र १७ वयातील मुलाचा. अश्या काही व्यक्तींना भेटले की वाटते वय हा फक्त आकडा आहे, जिद्द असेल तर सारे काही शक्य आहे. थोडा वेळ त्यांच्याशी गप्पा मारून पुन्हा एका नवीन ऊर्जेने ट्रेकला सुरुवात केली. 

irshalgad fort trek
गडद धुक्यामधून ट्रेक मार्ग 

धुके इतके होते की काही अंतरावरच दिसेना. पर्यटक तसे भरपूर आले होते पण धुक्यांमध्ये गुडूप होत होते. 

irshalgad fort trek
धुक्यामध्ये गुडूप 

जवळपास दीड तासाने आम्ही इरशाळवाडीला पोहचलो. खाण्यापिण्याची सोय असलेले ट्रेक दरम्यानचे हे एक उत्तम ठिकाण. 

irshalgad fort trek irshalwadi
इरशाळवाडी 

ट्रेक मार्ग गावातूनच जातो. 

irshalgad fort trek irshalwadi
गावातून जाणारा ट्रेक मार्ग

गाव ओलांडून पुढे आले की पुन्हा दाट जंगल आणि धुक्यात ट्रेक सुरु झाला. 

irshalgad fort trek
गाव ओलांडून पुन्हा जंगलं आणि दाट धुक्यातून मार्ग

काही मिनिटांनी इरशाळ देवीच्या मंदिराला (Goddess Irshal Devi temple) आम्ही पोहचलो. 

irshal devi temple
इरशाळ देवी मंदिर

मंदिराच्या डाव्या बाजूने गडाकडे जाण्यासाठी मार्ग आहे. मंदिरापासून थोडे पुढे येताच एक मार्ग सरळ पुढे जातो आणि एक मार्ग उजव्या हाताला वरच्या दिशेने गडाकडे जातो. 

irshalgad fort trek
गडाकडे जाणारी वाट 

आता चढाई सुरू झाली होती. वर आल्यावर मागे वळून पाहिले असता असे काही दृश्य नजरेस पडले ज्याचा विचार मी कधी केला नव्हता आणि ना या आधी असे काही पाहिले होते. जर आनंद मोजण्याचे कुठले यंत्र असते तर माझ्या आनंदाने ह्या क्षणी उच्चांक गाठला असता. 

irshalgad fort trek

irshalgad fort trek

irshalgad fort trek

irshalgad fort trek
गडावरून आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य 

स्वतःला खूप नशीबवान समजत होतो की माझा ह्या महाराष्ट्रात जन्म झाला आणि ह्या आपल्या सह्याद्रीत मला थोडे भटकता, वावरता आले. असे काही दृश्य पाहिले की गोविंदाग्रज यांचे लिखाण आठवले

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा

किल्ल्यावर पाहण्याची ठिकाणे (Places to visit on the fort)

ट्रेकच्या पहिल्या टप्प्यात, निमुळत्या पठाराला आम्ही पोहचलो. 

irshalgad fort trek
इरशाळगड - निमुळते पठार

येथून पुढे ट्रेक थोडा अवघड, उभ्या चढाचा आणि पावसाळयात थरारक होतो. 

irshalgad fort trek
नेढेकडे जाणारा मार्ग 

थोडे पुढे आल्यानंतर सरळ पुढे गुहा असल्याची पाटी दिसली पण आधी आम्ही नेढेकडे चढाई सुरु केली. 

irshalgad fort trek
गुहेकडे जाणारा मार्ग 

irshalgad fort trek
नेढेकडे जाताना

अवघड चढाईच्या ठिकाणी राशी आणि लोखंडी शिडी लावण्यात आली आहे. येथे एक पाण्याची टाकी देखील आहे. पावसाळ्यात ह्या चढाई दरम्यान अतिदक्षता गरजेची. 

irshalgad fort trek
पाण्याची टाकी आणि नेढेकडे चढाई

प्रत्येक पाऊल सावधानतेने आणि काळजीपूर्वक टाकत आणि नेढेला पोहचलो. महाराष्ट्रात निवडक ठिकाणीच अश्या प्रकारचे नेढे (नैसर्गिकरित्या खडकात तयार झालेले छिद्र) आपल्याला पाहायला मिळेल. 

irshalgad fort nedhe
नेढे

आता नेढेच्या वर चढून सुळक्याच्या पायथ्याशी असलेल्या पाण्याच्या टाकी पर्यंत जायचे होते. 

irshalgad fort nedhe
नेढेच्या वर चढाई

irshalgad fort nedhe
नेढेच्या वरील भगवा

ट्रेकच्या सुरुवातीला भेटलेल्या आजोबांशी नेढेच्या वर पुन्हा एकदा भेट झाली. 

irshalgad fort nedhe
नेढेच्या वर पुन्हा आजोबांशी भेट

आधी सुळक्याच्या उजव्या बाजूला गेलो, पुढे रस्ता नव्हता म्हणून पुन्हा मागे फिरून डाव्या बाजूने पुढे आलो. 

irshalgad fort trek
इरशाळगड सुळका

irshalgad fort trek
सुळक्याच्या उजवीकडे गेले असता 

येथे एक पाण्याची टाकी (Water tank) आहे. 

irshalgad fort water tank
सुळक्याच्या डावीकडे गेले असता दिसलेले पाण्याची टाकी 

नेढे जवळ येऊन आम्ही नेढे जवळ असलेल्या छोट्या सुळक्यावर चढाई सुरु केली. आपल्याला अश्या चढाईचा अनुभव असेल तरच आपण येथे जावे अन्यथा नेढे पर्यंत ट्रेक संपवावा. 

irshalgad fort trek
नेढेच्या जवळील छोट्या सुळक्यावर चढाई 

आम्ही वर आलो. सरकती व निमुळती वाट, वारा आणि पाऊसाने धरलेल्या जोरामुळे आम्ही लगोलग परतलो. 

irshalgad fort trek

irshalgad fort trek
छोट्या सुळक्यावरून दृश्य 

नेढे जवळ थोडे खाली एक देवीचे मंदिर आहे. 

irshal devi temple
इरशाळ देवी मंदिर

आता आम्ही गुहेकडे निघालो (Cave at Irshalgad fort). आम्हाला ह्या गुहे बद्दल माहिती नव्हते.
 
irshalgad fort trek
नेढेपासून खाली उतरताना

irshalgad fort cave
गुहेकडे मार्गस्थ

काही अंतर पुढे चालून आल्यावर गुहे सारखे कुठलेच अवशेष आम्हाला दिसले नाही. 

irshalgad fort trek
गुहेचा शोध घेताना

त्यात पाऊसाने खूप जोर धरला, त्यामुळे आम्ही आमचा ट्रेक येथेच संपवला आणि परतीच्या प्रवासाला लागलो.

परतीचा प्रवास

लगोलग परत निघालो तेव्हा निमुळत्या पठाराजवळ लोकांची गर्दी पाहायला मिळाली आणि ही गर्दी वाढतच होती. पावसाळ्यात येथे येणाऱ्यांची संख्या वाढते आणि त्यातले काही नेढेला जात होते तर काही नेढे जवळील चढाई पाहून पुन्हा माघारी वळू लागले. वातावरण स्वच्छ असते तर किल्ल्यावरून माथेरान, प्रबळगड, सोंडाई हे सहज नजरेस पडतात. पावसामुळे थोडे अवघड जरी झाले असले तरी सुळक्याच्या पायथ्याशी जाता आले ह्याच आनंद होता. त्यात गुहा पहायची राहिली ही खंत देखील होतीच. पण पुन्हा येईन असे स्वतःला सांगत दीड तासात आम्ही पुन्हा नानिवली गावात उतरलो. आलो त्याच मार्गाने चौक - पनवेल - कळंबोली असा प्रवास करत मुंबईत गाठली.

ह्याच भटकंतीचा यूट्यूब व्हिडिओ पाहण्यासाठी इरशाळगड येथे क्लिक करा. 

रायगड जिल्ह्यातील अन्य ट्रेक ब्लॉग वाचण्यासाठी रायगड येथे क्लिक करा.

जय शिवराय

#irshalgad #irshalgadfort #monsoontrek #irshalwadi #nanivali #morbedam #chowk #panvel #raigad #maharashtra #sahyadribhatkanti
Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu