बिर्ला गणपती मंदिर | Birla Ganpati Temple | धार्मिक भटकंती | Dharmik Bhatkanti | पुणे | Pune | Sahyadri Bhatkanti

धार्मिक भटकंती सिरीज - बिर्ला गणपती मंदिर, पुणे

birla ganpati temple

नैसर्गिक सौंदर्य आणि हिरवाईने वेढलेले पुण्यातील बिर्ला गणपती मंदिर असंख्य भाविकांना आकर्षित करते. ह्याच ठिकाणाची माहिती आपण धार्मिक भटकंती (Dharmik Bhatkanti) ह्या सिरीजमध्ये घेणार आहोत. 

भल्या पहाटेच पुण्यावरून देहू रोडला निघालो आणि तेथून मुंबई पुणे जुन्या महामार्गावर (Mumbai Pune Old Highway) असलेल्या सोमाटणे टोल नाक्याला आलो (Somatne Toll plaza). 

birla ganpati temple
सोमाटणे टोलनाका

पुण्यापासून जवळपास ३० किमी अंतरावर हे ठिकाण आहे. येथून भव्य अशी बाप्पाची मूर्ती दिसेल. हेच बिर्ला गणपती मंदिर. 

birla ganpati temple
टोल नाक्यापासून दिसणारी बाप्पाची मूर्ती

टोलनाका पासून प्रतिशिर्डी शिरगाव (Pratishirdi, Shirgaon) येथे जाणाऱ्या वाटेने निघालो. 

birla ganpati temple
birla ganpati temple
प्रतिशिर्डी, शिरगाव येथे जाणारा मार्ग

ह्या मार्गावर अर्धा किमी पुढे आले की डाव्या बाजूला एक वाट जाते. 

birla ganpati temple
मंदिराकडे जाणारी वाट

दुतर्फा कशीबशी चारचाकी जाईल अशी ही वाट.

birla ganpati temple
मंदिराकडे जाणारी वाट 

मंदिराच्या पायथी पार्किंगची सुविधा आहे. 

birla ganpati temple
मंदिराच्या पायथी असलेली पार्किंग

गेटमधून प्रवेश केल्यानंतर जवळपास १८० पायऱ्या चढून बाप्पाकडे जाता येते. 

birla ganpati temple
बाप्पाकडे जाणारी पायऱ्यांची वाट 

७२ फुटी बाप्पाची भव्य मूर्ती, १८ फूट उंच आणि ५४ फूट लांब चौरंगावर उभारण्यात आली आहे. 

birla ganpati temple
बिर्ला गणपती मंदिर 

१००० टन वजनी मूर्ती बनवण्यासाठी २ वर्ष लागले व मूर्तिकार मातुराम वर्मा आणि नरेश वर्मा यांनी ही मूर्ती घडवली आहे. मूर्तीची स्थापना १७ जानेवारी २००९ रोजी जयश्री चॅरिटी ट्रस्ट तर्फे सरला बिर्ला यांनी केले आहे.

birla ganpati temple
बिर्ला गणपती मंदिर 

पुणे व जवळच्या ठिकाणांहून शेकडो भाविक येथे रोज बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात. 

birla ganpati temple
बिर्ला गणपती मंदिर 

Birla ganpati temple
बाप्पासोबत सेल्फी

वरून दिसणारे दृश्य पर्यटकांना भुरळ पडू शकते व पर्यटक शोधत असलेली मनःशांती नक्कीच येथे भेटेल. 

birla ganpati temple
birla ganpati temple
मंदिरापासून दिसणारे दृश्य 

birla ganpati temple
बिर्ला गणपती मंदिर 

आपण बारमाही येथे येऊ शकता. गणपती मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. 

birla ganpati temple
मंदिरामागे केलेले सुशोभीकरण

जवळील बेगडेवाडी रेल्वे स्टेशन (Begdewadi railway station) पासून आधी घोरावडेश्वर लेणी (Ghoravadeshwar caves) व मग बिर्ला गणपती असा एक छोटा ट्रेक करता येतो. 

Birla ganpati temple
ह्या दिशेला असलेले जवळील बेगडेवाडी रेल्वे स्टेशन 

Birla ganpati temple
घोरावडेश्र्वर लेणी असलेले समोरील डोंगर

आणि वेळ असेलच तर येथून २ किमी अंतरावर असलेले प्रतीशिर्डी शिरगावला देखील भेट देऊ शकता. काही वेळ बाप्पाचे भव्य रूप न्याहाळत बसलो आणि मग परतीच्या प्रवासाला लागलो.

Birla ganpati temple
बिर्ला गणपती मंदिर 

Birla ganpati temple
मुंबई पुणे जुन्या महामार्गावरून दिसणारे बाप्पा

आपल्याला ही धार्मिक भटकंती सिरीज कशी वाटली ते मला कॉमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि ह्या सिरीज मधील अन्य व्हिडिओ पाहण्यासाठी धार्मिक भटकंती इथे क्लिक करा.

ह्याच भटकंतीचा YouTube व्हिडिओ पाहण्यासाठी बिर्ला गणपती मंदिर इथे क्लिक करा.

जय शिवराय

#birla #ganpati #temple #somatane #talegaon #pune #DharmikBhatkanti #SahyadriBhatkanti
Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu