मृगगड किल्ला | Mrugagad Fort | भेलिवचा किल्ला | Bheliv Fort | सुधागड | रायगड | Sudhagad | Raigad | Sahyadri Bhatkanti

जिल्हा - रायगड 
पायथ्याचे गाव (Base village) - भेलीव गाव
उंची (Height of the fort) - १७५० फूट 
वेळ - १ तास
श्रेणी (Grade) - सोपी
सहनशक्ती (Endurance level) - कमी 
जवळील रेल्वे स्टेशन (Nearest railway station) - खोपोली
मुंबई ते भेलीव गाव ० किमी
पुणे ते भेलीव गाव  - ११ किमी
दिनांक - २९ ऑगस्ट २०२१

mruggad fort trek

रायगड जिल्हा, सुधागड तालुक्यातील (Sudhagad Taluka) भेलीव ह्या छोट्याश्या गावा शेजारी असलेला एक सुंदर किल्ला "मृगगड". गडावर घेऊन जाणाऱ्या कातीळकोरिव पायऱ्या (Rock cut steps), प्रचंड कातळात खोदलेल्या पाण्याच्या टाक्या (Water tank), गडाच्या माथ्यावरुन दिसणारे विहंगम दृश्य आणि गडावरील गुहेकडे (Cave at Mrugagad fort) जातानाचा थरार हे मृगगड किल्ला ट्रेकचे वैशिष्ट. पायथ्याच्या भेलीव गावामध्ये किल्ल्याला "भेलिवचा किल्ला" (Bheliv Fort) म्हणून देखील ओळखले जाते.

मुंबई ते भेलीव गाव प्रवास (How to reach the Bheliv village)

आम्ही भल्या पहाटेच मुंबईवरून कळंबोली जंक्शन आलो व त्यापुढे मुंबई पुणे जुन्या महामार्गावरून खालापुरच्या दिशेने निघालो. पनवेल जवळ कोण ह्या गावी (Kon village) मी नेहमी थांबतो. ह्यावेळेस दृश्य काही वेगळेच होते. प्रबळगडाच्या मागून होणारा सूर्योदय, सूर्यकिरणांनी भगवेमय झालेलं आकाश आणि समोर कलावंतीण दुर्ग (Kalavantin durg), प्रबळगड (Prabalgad) आणि इरशाळगड (Irshalgad) किल्ला. 

mruggad fort trek
कोण गावातून दिसणारे किल्ले

खालापूर (Khalapur) येथे पोहचल्यावर उजवीकडील मार्गाने पालीच्या दिशेने पुढील प्रवास सुरू झाला. 

mruggad fort trek
खालापूर पासून पालीकडे जाताना

खोपोली पाली मार्गाने (Khopoli - Pali road) परळी हे गाव (Parli village) ओलांडले की जांभूळपाडा (Jambulpada village) येथील नदीवरील ब्रीज जवळून डावीकडील मार्गाने भेलीव गावाला येता येते. 

mruggad fort trek
खोपोली पाली रोड

mruggad fort trek
जांभुळपाडा येथील नदीवरील पुल

mruggad fort trek
जांभूळपाडा गाव

गावाजवळ येताच किल्ला नजरेस पडतो. 

mruggad fort trek
भेलीव गावाकडे जाताना

mruggad fort trek
गावातून दिसणारा किल्ला

गावात पार्किंगची सुविधा आहे.

mruggad fort trek
गावातील पार्किंगची जागा

भेलीव गावाला येण्यासाठी खोपोली हे जवळील रेल्वे स्टेशन. तेथून सार्वजनिक वाहतुकीची सुविधा आहे. खोपोली पासून बसने परळी गावी यावे किंवा शेअरिंगने आधी खोपोली फाटा (Khopoli Phata) आणि नंतर परळी गाव गाठावे. येथून माणगावसाठी (Mangaon village) शेअरिंग भेटेल. माणगाव पासून २ किमी चालून भेलीव गावाला येता येते. मुंबई पुण्यापासून भेलीव गाव जवळपास १०० किमी अंतरावर आहे. गावात राहण्या-खाण्याची सोय आहे. 

ट्रेकला सुरुवात

गावातील भवानी मातेच्या मंदिरापासून (Goddess Bhavani temple) मृगगड किल्ला ट्रेक सुरू होतो. 

mruggad fort trek
भवानी माता मंदिर

mruggad fort trek
भेलीव गाव

सुरुवातीला थोडी चढाई केली की मार्ग पठारावरून जातो. किल्ला समोरच आणि ट्रेक मार्ग ओळखू येईल असा असल्याने मार्ग चुकण्याची शक्यता नाही. 

mruggad fort trek
मृगगड किल्ला

mruggad fort trek
ट्रेकर मंडळी सोबत सेल्फी 

पठारावरून जाताना आजूबाजूच्या परिसराचा आनंद घेत आम्ही घनदाट जंगलात शिरलो. किल्ला बराचसा अपरिचित असल्याने फार कमी लोक येथे येतात. पण त्यामुळे येथील नैसर्गिक सौंदर्य अजूनही अबाधित आहे.

mruggad fort trek
mruggad fort trek
पठारावरून ट्रेक मार्ग

mruggad fort trek
जंगलातून ट्रेक मार्ग

हळूहळू चढ वाढत होता. अर्धा तासाने आम्ही किल्ला आणि शेजारील डोंगरामध्ये असलेल्या खिंडीत आलो. 

mruggad fort trek
जंगलातून ट्रेक मार्ग 

mruggad fort trek
mruggad fort trek
हळूहळू चढ वाढत किल्ल्याकडे

खिंड इतकी लहान आहे की एका वेळी फक्त एकच व्यक्ती जाईल. 

mruggad fort trek
mruggad fort trek
खिंडीतून किल्ल्याकडे जाताना

खिंडीतून चालून वर आल्यावर डाव्या बाजूकडील वाट किल्ल्यावर जाते. 

mruggad fort trek
खिंडीतून वर आल्यावर किल्ल्याकडे

थोड पुढे आल्यावर उजवीकडील वाट गुहेकडे जाते तर सरळ जाता प्रचंड कातळात खोदलेल्या पायऱ्या आपल्याला किल्ल्यावर घेऊन जातील. 

mruggad fort trek
पायऱ्या चढून किल्ल्याकडे

आम्ही आधी गडमाथ्यावर जाण्याचे ठरवले. 

mruggad fort trek
कातीळकोरीव पायऱ्या

वाटेत एक कातळशिल्प (Rock carved sculpture) देखील होते. पावसाळ्यात ह्या पायऱ्या चढताना काळजी घेणे आवश्यक. 

mruggad fort trek
कातळशिल्प 

प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकत आम्ही किल्ल्यावर पोहचलो. 

mruggad fort trek
किल्ल्यावर प्रवेश करताना

किल्ल्यावर येताच देवीचे एक मंदिर (Goddess Mahishasurmardini temple) लागते. देवीचा आशीर्वाद घेऊन किल्ल्याच्या पश्चिमेला आम्ही निघालो. 

mruggad fort temple
महिषसुरमर्दिनी मंदिर

जवळच काही पाण्याच्या टाक्या व वाड्याचे अवशेष (Ruins of the castle) दिसले. 

mruggad fort water tank
mruggad fort trek
पाण्याच्या टाक्या 

mruggad fort trek
mruggad fort trek
वाड्याचे अवशेष 

किल्ला भेटीला येणाऱ्यांची संख्या कमी असल्याने वाट तितकी मळलेली नव्हती, त्यात दाट आणि उंच गवत. 

mruggad fort trek
उंच गवतातून मार्ग

कसेबसे मार्ग काढत आम्ही किल्ल्याच्या पश्चिमेकडील टोकाला आलो. येथे देखील काही पाण्याच्या टाक्या आहेत. 

mruggad fort trek
mruggad fort trek
पाण्याच्या टाक्या 

पश्चिमेकडील टोकावरून आजूबाजूच्या डोंगराचा, गाव व नदीचा सुंदर नजारा पाहायला मिळाला. पावसाळ्यात येथील नैसर्गिक सौंदर्यात आणखीन भर पडते. 

mruggad fort trek
गडमाथा

mruggad fort trek
mruggad fort trek
किल्ल्याच्या पश्चिमेकडून दृश्य

काही वेळ येथे आराम करून आम्ही पुन्हा किल्ल्याच्या पूर्वेला निघालो. 

mruggad fort trek
पुन्हा किल्ल्याच्या पूर्वेला जाताना

पायऱ्या उतरून खाली आल्यावर गुहेकडे निघालो. गुहेकडे जाण्यासाठी कातळात काही पायऱ्या खोदलेल्या (rock cut steps to Cave) आहेत. पण एका बाजूला उभा कातळकडा आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी त्यात लहान पायऱ्या त्यामुळे गुहेकडे जाताना काळजी घ्यावी. 

mruggad fort cave
गुहेकडे जाताना

mruggad fort cave
गुहा

गुहेपाशी आम्ही पोहचलो, तितक्यात पावसाच्या सरी यायला लागल्या आणि जोराचा वारा देखील. आम्ही लगोलग परत निघालो. 

mruggad fort cave
गुहा

mruggad fort cave
mruggad fort cave
गुहेपासून परतताना

पुन्हा भेलीव गावात येऊन एका गावकऱ्याच्या घरी अस्सल जेवणाचा आनंद घेतला. 

mruggad fort trek
पुन्हा भेलीव गावात जाताना

mruggad fort trek
गावकऱ्याच्या घरी जेवण करताना

वाटेत नदीत काही वेळ पोहलो आणि परतीच्या मार्गाला लागलो.

परतीचा प्रवास

भेलीव - माणगाव - जांभूळपाडा - परळी - खोपोली फाटा - खालापूर - चौक - पनवेल - कळंबोली असा प्रवास करत मुंबईत आलो. परत घरी जायला आम्हाला तीन तास लागले.

रायगड जिल्ह्यातील अन्य ट्रेक ब्लॉग वाचण्यासाठी रायगड येथे क्लिक करा. 

ह्याच भटकंतीचा जर आपल्याला YouTube व्हिडिओ पाहायचा असेल तर मृगगड किल्ला येथे क्लिक करा. 

जय शिवराय 

#mrugagad #fort #bheliv #sudhagad #raigad #sahyadribhatkanti
Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu