नागफणी ट्रेक | Dukes Nose trek | कूरवंडे | Monsoon trek | Kurvande | लोणावळा | Lonavala lake | Sahyadri Bhatkanti

जिल्हा - पुणे
पायथ्याचे गाव  (Base village)- कूरवंडे 
उंची (Height of the peak) - ३२०० फूट 
वेळ - १ तास
श्रेणी (Grade) - सोपी
सहनशक्ती (Endurance level) - कमी 
जवळील रेल्वे स्टेशन (Nearest railway station) - लोणावळा
मुंबई ते कूरवंडे - ९० किमी
पुणे ते कूरवंडे - ८० किमी
दिनांक - २४ जुलै २०२२

dukes nose trek
नागफणी / Dukes nose ट्रेक 

मुंबई पुणे प्रवासात घाटातून एक डोंगर नागासारखा फणा काढून उभा असल्यासारखा आपण नक्कीच पहिला असेल. हाच नागफणी डोंगर (Nagphani) व ह्यास ड्यूक्स नोज (Dukes Nose) ह्या नावाने देखील ओळखले जाते. 

dukes nose trek
घाटातून नागफणी डोंगर

माझ्या प्रत्येक मुंबई पुणे प्रवासात मी घाटात थांबण्याचे महत्त्वाचे कारण. कधी हा गडद धुके आणि ढगांमध्ये गुडूप असायचा तर कधी धुक्यांमधून हळूच बाहेर येऊन दर्शन द्यायचा. 

dukes nose trek
खंडाळा घाट (ऑक्टोबर 2020)

dukes nose trek
खंडाळा घाट (जून 2021)

गेली दोन वर्ष घाटातूनच नागफणीला न्याहाळत होतो. पण कधी त्याच्या माथ्यावर जाण्याचा योग आला नाही. २०२२ च्या पावसाळ्यात मात्र कूरवंडे मी हा ट्रेक केला. त्याच भटकंतीचा हा ब्लॉग. मुंबई पुण्यावरून एक दिवसीय सहलीसाठी लोणावळा हे सर्वांच्याच आवडीचे आणि लोणावळा भागात ट्रेकिंगसाठी नागफणी प्रसिद्ध आहे.

सोपा श्रेणीचा ट्रेक असल्याने नवखे ट्रेकर तर येथे येतातच, पण रॅपेलिंग (Rappeling), रॉक क्लाइंबिंग (Rock climbing), कॅम्पिंग (Camping), स्लॅक लाईन (Slackline) आणि व्हॅली क्रॉसिंग (Valley crossing) इत्यादी धाडसी उपक्रम देखील येथे होत असल्याने महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरून गिर्यारोहक येथे आवर्जून येतात.

पुणे ते कूरवंडे गाव प्रवास (How to reach base village Kurvande!)

सकाळी ६ वाजता खराडी, पुणे येथून देहू रोड मार्गे येऊन मुंबई पुणे जुन्या महामार्गावरून लोणावळाकडे निघालो. येथून मी सध्या एकटाच बाईकने येत होतो. लोणावळा येथे मुंबईवरून माझे दोन ट्रेकर मित्र येणार होते. खराडी - खडकी - देहू रोड - कामशेत - कार्ला असा जवळपास ८० किमीचा प्रवास करत लोणावळा गाठला. ८ वाजता आम्ही लोणावळा येथे मिळालो. बस डेपो येथे नाश्ता केला आणि बाजार मार्गापासून कूरवंडे गावाकडे निघालो.

Dukes nose trek
लोणावळा पासून कुरवंडे गावाकडे जाताना

लोणावळा ते कूरवंडे गाव जेथून ट्रेक सुरु होतो हे जवळपास ६ किमीचे अंतर. लोणावळा तलावापासून भुशी धरणाकडील मार्गाकडे न जाता उजवीकडील मार्गाने कूरवंडे गावाकडे निघालो.

dukes nose trek
कुरवंडे गावाकडे जाताना

प्रवासात डाव्या बाजूला लोणावळा तलाव दिसत होता. लोणावळा पासून कूरवंडे गावाला येण्यासाठी ऑटो रिक्षा भेटेल पण बहुतांश ट्रेकर स्वतःची गाडी घेऊन किंवा ६ किमीचे अंतर चालून येतात.

dukes nose trek
लोणावळा तलाव

dukes nose trek
कुरवंडे गावात पोहचल्यावर ट्रेकर मंडळी सोबत सेल्फी

गावात पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे. 

dukes nose trek
कुरवंडे होळीमाळ

ट्रेकला सुरुवात

दाट धुके असल्याने सुरुवातीचा मार्ग गावकऱ्यांना विचारून ट्रेकला सुरुवात केली. लीला विला मागूनच नागफणीला जाण्यासाठी मार्ग असल्याने हे एक महत्त्वाचे चेकपॉइंट म्हणून लक्षात ठेवू शकता.

dukes nose trek
लीला विलाकडे जाताना

dukes nose trek
लीला विला

ट्रेक मार्ग मोठा असल्याने ओळखू येतो त्यामुळे मार्ग चुकण्याची किंवा विसरण्याची शक्यता कमी. त्यात नागफणीचा डोंगर समोर दिसत असेल तर चांगलेच. पण पावसाळ्यात मात्र दाट धुके आणि ढगाळ वातावरण ह्यामुळे नागफणी डोंगर दिसेनासा होतो आणि काही अंतरावरचेच दिसत नाही. 

dukes nose trek
ट्रेकला सुरुवात 

dukes nose trek
पूर्ण धुक्यात ट्रेक मार्ग

मार्गात बऱ्याच लहान लहान मार्ग भेटत होते पण आम्ही जी सर्वात मोठी वाट होतीच त्यावरूनच पुढे चालत राहिलो.

dukes nose trek
ट्रेक मार्ग 

पंधरा मिनिटांनी काही अंतर पुढे आल्यावर आम्ही उजवीकडील मार्गाने वरच्या दिशेने चढाई सुरू केली.

dukes nose trek
उजवीकडील मार्गाने वरच्या दिशेने चढाई

धुके इतके जास्त होते की आम्हालाही कल्पना नव्हती की नक्की नागफणीच्या डोंगरावर आम्ही चढत आहोत की नागफणीच्या शेजारील डोंगरावर. जर आपण ग्रुप मध्ये येणार असाल तर सर्वांनी सोबतच राहावे. नागफणीच्या डोंगरावरून चढाई थोडी तीव्र आणि पावसाळ्यात धोकादायक असल्याने आमची योजना नागफणीच्या शेजारील डोंगरावर चढून नंतर नागफणीच्या माथ्यावर जायची होती. थोडे वर चढून आलोत आणि धुके थोडे कमी झाल्यावर नागफणी डोंगर दिसायला लागला तेव्हा कळले की आम्ही योजनेप्रमाणे शेजारील डोंगरावरूनच चढाई केली आहे.

dukes nose trek
नागफणी डोंगर

dukes nose trek
नागफणीच्या शेजारील डोंगरावरुन चढाई

चढाई करताना जेव्हा जेव्हा मागे वळून पाहत होतो तेव्हा धुके, ढगांचा खेळ पाहायला मिळत होता. त्यात अधून मधून पाऊस येत होताच. 

dukes nose trek
धुके आणि ढगांचा खेळ

वर चढून आल्यावर डाव्या बाजूने वाट नागफणीच्या माथ्यावर जाते तर सरळ गेले असता नागफणीच्या शेजारील डोंगराच्या कड्याकडे जाता येते. आम्ही कड्याकडे निघालो.

dukes nose trek
कड्याकडे जाताना

नागफणी (ड्युक्स नोज) भटकंती

कड्याकडे जाणारी वाट अगदीच लहान, त्यात पाऊस आणि वारा. हे ठिकाण जेवढे आकर्षक तेवढेच धोकादायक देखील. थोडीशीही चूक जीवावर बेतू शकते.

dukes nose trek
कडा

एकमेकांपासून काही फूट अंतरावर असलेल्या ह्या दोन डोंगरदरम्यानची दरी पाहिली की काळजात धस्स होते. या दोन डोंगरादरम्यान व्हॅली क्रॉसिंगचा थरारही अधेमधे येथे रंगत असतो.

dukes nose trek
कड्याजवळ सेल्फी

dukes nose trek
कड्यावरून दिसणारा नागफणी डोंगर

आता आम्ही नागफणीकडे निघालो. 

dukes nose trek
कड्यापासून परतताना

थोडीशी आणखीन चढाई केली की काही मिनिटातच नागफणीच्या माथ्यावर असलेल्या शिवमंदिराला आम्ही पोहचलो. 

dukes nose trek
नागफणीकडे जाताना

dukes nose trek
नागफणी डोंगरावर चढाई

सुरक्षेच्या दृष्टीने येथे रेलिंग लावण्यात आली आहे. कुरवंडे गावातून नागफणीच्या माथ्यावर पोहोचायला सुमारे एक तास लागला.

dukes nose shiva temple
dukes nose shiva temple
dukes nose shiva temple
नागफणीच्या माथ्यावरील शिवमंदिर

"साहसी, निर्भय, निसर्गप्रेमी व्हा आणि गिरीभ्रमणाचा आनंद लुटा" असा संदेश देणारे एच. ए. ट्रेकिंग क्लबमधील काही ट्रेकर मंडळीशी आमची ओळख झाली. 

dukes nose trek
dukes nose trek
ट्रेकर मंडळी सोबत सेल्फी आणि जेवण

गप्पागोष्टी करत सोबत जेवण केले आणि माथ्यावरून घाट आणि आजूबाजूच्या सह्य शिखरांची दृश्ये पाहायला मिळावी म्हणून उन्हाची प्रतीक्षा करत काही वेळ वाट पाहिली.

dukes nose trek
उन्हाची प्रतीक्षा करताना

नागफणी ते कुरवंडे गाव

पण धुके काही कमी होईना. शेवटी पुन्हा एकदा मंदिराला भेट देऊन परतीच्या मार्गाला लागलो. दाट धुके, सोसाट्याचा वारा आणि पाऊस अश्या वातावरणात आम्ही अर्धा तासात पुन्हा कूरवंडे गावात आलो.

dukes nose trek`
dukes nose trek
पुन्हा कुरवंडे गावात

"लोणावळा स्टेशनला आपल्याला आमची गाडीने सोडू" असा आग्रह धरून देखील आम्हाला भेटलेल्या एच. ए. ट्रेकिंग क्लबमधील मंडळीने स्टेशन पर्यंतचे ६ किमीचे अंतर चालत जाणे पसंत केले.

dukes nose trek
एच. ए. ट्रेकिंग क्लबमधील मंडळी लोणावळाकडे जाताना 

पुन्हा कधी तरी अश्याच कुठल्या तरी भटकंतीत त्यांची भेट होईलच. 

लोणावळा तलाव

पुन्हा लोणावळा स्टेशनकडे जाताना लोणावळा तलावाला काही वेळ घालवला.

lonavala lake
लोणावळा तलावाकडे जाताना

lonavala lake
lonavala lake
लोणावळा तलाव येथे काही वेळ घालवला 

परतीचा प्रवास

पुन्हा लोणावळा येथे आलोत आणि थोडा वेळ चहा नाश्ता केला. बाजार मधून चिक्की घेतली आणि माझे मित्र मुंबईकडे तर मी पुणेच्या दिशेने मार्गी लागलो. पुन्हा मुंबई पुणे जुन्या महामार्गाने लोणावळा - कार्ला - कामशेत - देहू रोड - खडकी असा प्रवास करत २ तासांनी खराडी येथे पोहचलो.

आमची भटकंती येथेच संपते. ह्याच भटकंतीचा YouTube व्हिडिओ पाहण्यासाठी नागफणी क्लिक करा. 

पुणे जिल्ह्यातील अन्य ट्रेक ब्लॉग वाचण्यासाठी पुणे येथे क्लिक करा.

जय शिवराय

#nagphani #dukesnose #monsoontrek #kurvande #lonavala #pune #sahyadribhatkanti 
Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu