कोरीगड किल्ला। पावसाळी भटकंती। Korigad Fort Trek। Peth Shahapur। Monsoon Trek। Mulshi। Pune। Sahyadri Bhatkanti

जिल्हा - पुणे
पायथ्याचे गाव (Base village) - पेठ शहापूर (Peth Shahapur)
उंची (Height of the Korigad fort) - ३०२८ फूट 
वेळ - १ तास
श्रेणी (Trek grade) - सोपी
सहनशक्ती (Endurance level) - मध्यम
जवळील रेल्वे स्टेशन (Nearest railway station) - लोणावळा (Lonavala)
मुंबई ते पेठ शहापूर - ११० किमी
पुणे ते पेठ शहापूर - ९० किमी
दिनांक - ३१ जुलै २०२२

लोणावळ्याच्या दक्षिणेकडील डोंगररांगेत काही किलोमीटर अंतराने अनेक गडकिल्ले आहेत. त्यापैकीच एक सुंदर डोंगरी किल्ला. ज्याने निजामशाही, आदिलशाही, स्वराज्य आणि ब्रिटिश राजसत्ता फार जवळून पाहिल्या, ज्याची तटबंदी आजही तटस्थ उभी आहे आणि ज्या किल्ल्याला पावसाळ्यात भेट देणे हे प्रत्येक भटकंती प्रेमीचे स्वप्न. असा किल्ले कोरीगड.

पुणे ते पेठ शहापूर प्रवास (How to reach Peth Shahapur village!)

मुंबई - पुणे जुन्या महामार्गाने लोणावळा येथे पोहोचलो व तेथून २० किमी अंतरावर, कोरीगडाच्या पायथ्याशी असलेल्या पेठ शहापूर गावाला निघालो. लोणावळ्यापासून पेठ शहापूरसाठी सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध आहे. 

korigad fort trek
लोणावळा

लोणावळ्यातील रायवुड पोलीस मदत केंद्रापासून उजवीकडील मार्ग नागफणी म्हणजेच ड्युक्स नोज (Dukes Nose) जातो तर डावीकडील मार्ग कोरीगडाकडे. 

korigad fort trek
रायवुड पोलीस मदत केंद्र

जवळच लोणावळा तलाव (Lonavala lake) परिसर आहे. 

korigad fort trek
लोणावळा तलाव

भुशी गाव (Bhushi village) ओलांडले आणि कुरवंडे गावाजवळ (Kurvande village) असलेल्या काही पॉईंट्सना भेट द्यायची होती. पण अचानक सुरू झालेला पाऊस व दाट धुक्यामुळे पॉईंट्सना परत येताना भेट देऊ, असे ठरवून थेट पेठ शहापूरकडे निघालो. 

korigad fort trek
दाट धुके आणि पाऊस

पाऊस थांबला, तेव्हा कुरवंडे गावापुढील एका ठिकाणावरून पवना तलाव (Pavna lake) धुक्याआड पाहायला मिळाला. 

korigad fort trek
पवना तलाव

घुसळखांब गावापासून (Ghusalkhamb village) डावीकडील मार्ग मोरगिरी (Morgiri Fort) व तुंग किल्ल्याकडे (Tung Fort) जातो, तर उजवीकडील मार्ग कोरीगडाकडे. 

korigad fort trek
घुसळखांब गाव

पेठ शहापूर गावात पोहोचलो आणि धुक्याने वेढलेला कोरीगड समोर दिसत होता. याच गावाच्या नावावरून किल्ल्याला शहागड या नावाने देखील ओळखले जाते. गावात पार्किंगची सुविधा आहे. 

korigad fort trek
पेठ शहापूर गावातून दिसणारा धुक्याने वेढलेला कोरीगड 

ट्रेकला सुरुवात

गावात बाईक पार्क केल्या आणि ट्रेकला सुरुवात झाली. 

korigad fort trek
ट्रेकला सुरुवात

ट्रेक मार्ग पूर्णपणे ओळखू येईल असा असल्याने वाट चुकण्याची कुठलीही शक्यता नाही. त्यात पूर्ण ट्रेक दरम्यान किल्ला डोळ्यासमोरच असतो. 

korigad fort trek
ट्रेक मार्ग

किल्ल्याच्या उत्तर बाजूकडून आम्ही हळूहळू पूर्वेला आलो व त्यानंतर किल्ल्याच्या दिशेने अगदीच पायथी निघालो.

korigad fort trek
ट्रेक मार्गावरून दिसणारा कोरीगड

korigad fort trek
किल्ल्याच्या पायथ्याशी  जाताना

येथून पुढे पायऱ्यांचा मार्ग आहे. आंबी व्हॅली (Aamby valley) मधून डांबरी मार्ग इथपर्यंत येतो. 

korigad fort trek
आंबी व्हॅली मधून येणार डांबरी मार्ग

धुके काहीसे कमी झाल्याने गडाची तटबंदी व प्रवेशद्वार येथून दिसत होते. 

korigad fort trek
गडाचे प्रवेशद्वार व तटबंदी

korigad fort trek
ट्रेक्कर मंडळी सोबत सेल्फी

पायऱ्यांच्या मार्गाने किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे निघालो. वाटेत श्री गणेशाचे मंदिर (Lord Ganesha temple) व गुहा (Cave) आहे.

korigad fort trek
पायऱ्यांचा मार्ग

korigad fort trek
श्री गणेश मंदिर व गुहा

सुरक्षेच्या दृष्टीने पायऱ्यांशेजारी रेलिंग लावण्यात आली आहे. 

korigad fort trek
पायऱ्यांचा मार्ग

वाटेत एका लहान गुहेत पाण्याचे टाके (Water tank) होते. आणखीन एक प्रचंड कातळात खोदलेली गुहा जवळच आहे.

korigad fort trek
लहान गुहा व तेथील पाण्याचं टाक

korigad fort trek
गुहा

कोरीगड भटकंती

मुख्य प्रवेशद्वार गणेश दरवाजापाशी (Ganesh Darwaja) पोहोचलो. 

korigad fort trek
गणेश दरवाजा

korigad fort trek
आतील बाजूने गणेश दरवाजा

पेठ शहापूर ते गडमाथा गाठण्यास आम्हाला एक तास लागला. कोरीगडाचा गडमाथा सपाट व दक्षिण उत्तर पसरलेला आहे.

korigad fort trek
कोरीगड

प्रवेशद्वारा जवळ शिव मंदिर आहे व परिसरात काही तोफा ठेवण्यात आले आहेत. 

korigad fort trek
शिवमंदिर व तोफा

मंदिरामागे दोन तळे देखील आहेत. 

korigad fort trek
गडावरील दोन तळे

गडावरून आंबी व्हॅली व वातावरण स्वच्छ असल्यास जवळील सह्य शिखरांचा, किल्ल्यांचा सुंदर नजर पाहायला मिळतो. 

korigad fort trek
आंबी व्हॅली सिटी

किल्ल्याच्या उत्तर व दक्षिण बाजूस भव्य बुरुज आहेत. आम्ही तटबंदीच्या मार्गे पहिले उत्तरेकडील बुरुजाकडे निघालो. कोरीगडाची तटबंदी हे येथील प्रमुख आकर्षण. तटबंदीच्या वाटेने पूर्णगड फिरताना, आजूबाजूचा प्रदेश न्याहाळत गडावरील मंदिरे, बुरुज, तलाव, गुहा आणि काही वाड्याचे अवशेष यांना भेट देत, दीड ते दोन तास सहज लागतात.

korigad fort trek
गडमाथा

korigad fort trek
तटबंदीच्या वाटेने बुरुजाकडे जाताना

उत्तरेकडील बुरुजावर भगवा लावण्यात आला आहे. येथून पेठ शहापूर गाव व तेथून गडाकडे येणारा मार्ग दिसतो. 

korigad fort trek
उत्तरेकडील बुरुज

korigad fort trek
पेठ शहापूर गाव

गडाचे हे सर्वोच्च ठिकाण. येथून गडाची पूर्ण तटबंदी दिसत होती. जेव्हा कधीही कोरीगड आठवतो तेव्हा हेच दृश्य डोळ्यासमोर येते. 

korigad fort trek
कोरीगडाची तटबंदी

जवळच प्रचंड कातळात खोदलेल्या गुहा (Caves) आहेत. बाहेरून पाहून या गुहांच्या अवाढव्यतेचा अंदाज लागतच नाही. पूर्वीच्या काळी यांचा कोठार म्हणून उपयोग केला जात असावा. 

korigad fort trek
कोठार (गुहा)

येथे अतिरिक्त पाणी साचू नये म्हणून सोय केलेली दिसून येते. तटबंदीच्या मार्गाने तळ्याकडे निघालो. तळ्याशेजारीच आणखी एक मंदिर आहे. मंदिरात शिवलिंग व अन्य काही मूर्ती आहेत. 

korigad fort trek
तळे

korigad fort trek
तळ्याशेजारील मंदिर

वातावरण स्वच्छ झाले होते. पुन्हा तटबंदी मार्गे गडाच्या दक्षिणेकडे निघालो. आंबी व्हॅली मध्ये एक लहान रनवे  (Aamby valley city runway) देखील आहे. 

korigad fort trek
तटबंदी मार्गे दक्षिणेकडे जाताना

korigad fort trek
आंबी व्हॅली मधील रनवे

जवळच एक मोठी तोफ पाहायला मिळाली. वातावरण स्वच्छ होऊन काहीच वेळ झाला होता तेवढ्यात पुन्हा धुक्याचे सावट येऊ लागले.

korigad fort trek
तोफ

korigad fort trek
धुक्याचे सावट येताना

धुक्यांचा किल्ल्याशी झालेला टकराव आणि त्यामुळे पाहता आलेले विहंगम दृश्य, म्हणून काही वेळ तेथेच थांबलो. 

korigad fort trek
धुक्यांचा किल्ल्याशी झालेला टकराव

कोरीगडाला कोराईगड (Koraigad Fort)असे देखील म्हटले जाते. हे नाव पडले ते किल्ल्यावरील कोराई मातेच्या मंदिरामुळे (Korai Mata temple). मंदिर परिसरात दीपमाळ देखील आहे. 

korigad fort trek
कोराई माता मंदिर

लख्ख अंधारात एका छोट्या दिव्याच्या प्रकाशात मातेची मूर्ती फार तेजस्वी दिसत होती. 

korigad fort trek
कोराई माता

कोराई मातेच्या मंदिरापासून वाट थोडी खाली उतरून गडाच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराकडे जाते. आंबवणे गावातून येणारा मार्ग ह्याच प्रवेशद्वाराकडे घेऊन येतो. 

korigad fort trek
गडाचे दुसरे प्रवेशद्वार

जवळच आणखी एक मोठी तोफ आहे. 

korigad fort trek
तोफ

आता दक्षिणेकडील बुरुज खुणावत होता. या बुरुजाला दुहेरी तट आहे. खाली जाण्यासाठी मार्गाचा शोध घेत होतो पण सापडेना. 

korigad fort trek
दक्षिणेकडील बुरुज

korigad fort trek
बुरुजाचा दुहेरी तट

तितक्यात पावसाने जोर धरला. पुन्हा किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे आम्ही निघालो. 

korigad fort trek
दक्षिणेकडील बुरुज

korigad fort trek
तटबंदी मार्गे पुन्हा गणेश दरवाजाकडे जाताना

किल्ल्यावर वाड्याचे अवशेष जागोजागी पाहायला मिळतील. 

korigad fort trek
वाड्याचे अवशेष

गणेश दरवाजा जवळच न्याहारी केली व काही वेळ थांबून गड उतरण्यास सुरुवात केली. 

korigad fort trek
गणेश दरवाजा


कोरीगड ते पेठ शहापूर

पायऱ्यांच्या मार्गावरच असलेली एक गुहा पाहायची राहिली होती, ती पाहायला निघालो. सध्या तिथे पाणी साचलेले होते. 

korigad fort trek
गड उतरताना

korigad fort trek
गुहा

तेथून पुढे आणखी एक वाट झाडीत लपलेली दिसत होती. म्हणून थोडे पुढे जाऊन पाहिले तर आणखी एक प्रचंड कातळात खोदलेली गुहा पाहायला मिळाली. 

korigad fort trek
गुहेकडे जाणारी वाट

korigad fort trek
गुहा

अवघड वाट असल्याने फार तुरळ पर्यटक येथे जात असावेत. अर्ध्या तासातच पुन्हा पेठ शहापूर गावात आलोत. वातावरण स्वच्छ झाल्याने जवळच असलेला मोरगिरी किल्ला (Morgiri Fort) आता स्पष्ट दिसत होता. 

korigad fort trek
मोरगिरी किल्ला

लोणावळा पॉईंट्स (Lonavala Points)

परतीच्या प्रवासात कुरवंडे गावाजवळ शिवलिंग (Shivling Point), टायगर (Tiger Point), लायन्स (Lions Point) अशा काही नावाच्या पॉईंट्सना भेट दिली. शिवलिंग पॉईंट पासून नागफणीचा डोंगर (Nagfani/Dukes Nose), मोराडीचा सुळका (Moradi Pinnacle), मृगगड किल्ला (Mrugagad Fort) पाहायला मिळाला. 

korigad fort trek
शिवलिंग पॉईंट

टायगर पॉईंट पासून दहा किलोमीटर लांब असलेला कोरीगड देखील स्पष्ट दिसत होता. 

korigad fort trek
टायगर पॉईंट

korigad fort trek
लायन्स पॉईंट

परतीचा प्रवास

पुन्हा लोणावळा येथे  येऊन चहा घेतला व पुणेच्या दिशेने मुंबई पुणे जुना महामार्गाने परतीच्या प्रवासास लागलो. मळवली - कामशेत - तळेगाव दाभाडे - देहू रोड - खडकी - येरवडा असा प्रवास करत खराडीला आलो.

याच भटकंतीचा जर यूट्यूब व्हिडिओ पाहायचा असेल तर कोरीगड येथे क्लिक करा. 

पुणे जिल्ह्यातील अन्य ब्लॉग वाचण्यासाठी पुणे येथे क्लिक करा.

जय शिवराय

#korigad #monsoontrek #pethshahapur #mulshi #pune #SahyadriBhatkanti
Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu