भूगोल भटकंती सिरीज
कुंडमळा - निसर्गाचा भौगोलिक चमत्कार
जिल्हा - पुणे
जवळील गाव (nearby village) - इंदुरी (Induri village)
वेळ (बेगडेवाडी रेल्वे स्टेशन ते कुंडमळा)- २० मिनिटे
जवळील रेल्वे स्टेशन (Nearest railway station) - बेगडेवाडी (Begdewadi)
बेगडेवाडी ते कुंडमळा - २ किमी
मुंबई ते कुंडमळा - १३० किमी
पुणे ते कुंडमळा - ३० किमी
दिनांक - २१ ऑगस्ट २०२२
महाराष्ट्राला जेवढे ऐतिहासिक, तेवढेच भौगोलिक महत्त्व देखील लाभलेले आहे. नगर जिल्ह्यातील निघोज (Nighoj Potholes) येथील कुकडी नदीपात्रातील (Kukadi river) जगप्रसिद्ध रांजणखळगे (Potholes) आपल्याला माहीत असतीलच. पण अशाच प्रकारची निसर्गाची कलाकृती पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीपात्रात (Indrayani river) देखील पाहायला मिळते. ते ठिकाण म्हणजे कुंडमळा. याच ठिकाणावरील निसर्गाच्या अद्भुत भौगोलिक चमत्काराची माहिती आपण आज "भूगोल भटकंती" या सिरीज मध्ये घेणार आहोत.
कुंडमळा येथे कसे पोहचाल! (How to reach Kundmala!)
मुंबई - पुणे जुने महामार्गावर तळेगाव दाभाडे जवळील घोरावडेश्वर डोंगराच्या (Ghoravadeshwar hill) अगदी समोरील मार्गाने आम्ही कुंडमळाकडे निघालो.
|
मुंबई पुणे जुन्या महामार्गावरून कुंडमळ्याकडे
|
जवळच बेगडेवाडी रेल्वे स्टेशन आहे. येथून अगदीच दोन किमी अंतरावर कुंडमळा आहे.
|
बेगडेवाडी रेल्वे स्टेशन |
त्यामुळे बहुतांश पर्यटक बेगडेवाडी रेल्वे स्टेशन पासून चालतच कुंडमळाकडे येतात. तसेच सहकुटुंब स्वतःची गाडी घेऊन देखील बरेच पर्यटक येथे येतात. पुणे ते कुंडमळा जवळपास ३० किलोमीटरचे अंतर. हफ्ता अखेरीस कुंडमळाजवळ गाड्याच्या रांगाच आपल्याला पाहायला मिळतील.
|
कुंडमळाजवळ गाड्याच्या रांगा |
कुंडमळा रांजणखळगे (Kundmala Potholes)
कुंडमळा येथे पोहोचलो आणि इंद्रायणी नदीपात्रातील ही निसर्गाची शिल्पकला पाहून हरवून गेलो.
|
कुंडमळा परिसर |
झुळझुळणारे पाणी आणि छोट्या छोट्या धबधब्याचा उच्छल प्रवाह गोंधळलेल्या मनाला वेगळ्याच उर्जेने भारावून टाकत होता.
|
इंद्रायणी नदी पात्र |
नदीवर एक छोटा पूल बांधण्यात आला आहे. जेमतेम लोकं व दुचाकी जाईल एवढासाच हा पूल.
|
नदीवरील पूल |
कुंडमळ्याचा निसर्गरम्य परिसर नक्कीच मन प्रसन्न करणारा आहे. नदीपात्रातच प्रचंड मोठ्या कातळावर कुंडदेवी मातेचे मंदिर (Kunddevi Mata temple) आहे. देवीचे दर्शन घेतले व काही वेळ मंदिराजवळ घालवला.
|
श्री कुंडदेवी माता मंदिर |
रांजणखळगे कसे तयार होतात? (How Potholes are formed?)
रांजणखळगे ज्यास इंग्रजीमध्ये पॉटहोल्स (Potholes) तर स्थानिक लोक यास कुंड म्हणतात. अविरत वाहणाऱ्या पाण्याने कातळात घडवलेले हे शिल्पच जणू.
|
नदीवरील बंधारा |
अशा प्रकारची निसर्गाची कलाकृती तयार होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो. रांजणखळगे हे नदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे.
|
रांजणखळगे |
नदीपात्रात वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगड गोटे देखील वाहत येतात. नदीच्या पात्रात कठीण व मृदू खडकाचे स्तर एका आड एक असू शकतात.
|
रांजणखळगे |
दगड गोटे व खडक यांच्यात होणाऱ्या घर्षणाने मृदू खडकांची झीज होते व कठीण खडकाचा भाग तसाच राहतो. खडकावरील या खोलगट भागात दगड गोटे अडकले जातात व पाण्याच्या जोरदार प्रवाहाने हे दगड गोटे या भागात गोलगोल फिरवून खोलगट भागाचे अर्धगोलाकार खड्ड्यांमध्ये रूपांतर करतात.
|
रांजणखळगे |
वर्षानुवर्षे चाललेल्या या क्रियेमुळे खड्ड्यांच्या आकारात हळूहळू वाढ होऊन त्यांचे रांजणाकार खळग्यात रूपांतर होते. कुंडमळा येथे वेगवेगळ्या उंची, आकार व खोलीचे रांजणखळगे पाहायला मिळतात.
|
वेगवेगळ्या उंची, आकार व खोलीचे रांजणखळगे |
|
इंद्रायणी नदीचा प्रवाह |
महाराष्ट्रातील या सुंदर भौगोलिक वारसाला आपण नक्की भेट द्या.
जवळील अन्य ऐतिहासिक व धार्मिक स्थळ
घोरावडेश्वर लेणी (Ghoravadeshwar Caves)
बिर्ला गणपती मंदिर (Birla Ganpati Temple)
प्रतिशिर्डी शिरगाव (Pratishirdi Shirgaon)
इंदुरी किल्ला (Induri Fort)
भंडारा लेणी (Bhandara Buddhist Caves)
परतीचा प्रवास
पुन्हा बेगडेवाडी स्टेशन पासून मुंबई पुणे जुना महामार्गावर आलो व तेथून पुण्याच्या दिशेने निघालो. देहू रोड - खडकी - येरवडा प्रवास करत खराडी येथे आलो.
याच भटकंतीचा YouTube व्हिडिओ पाहायचा असेल तर कुंडमळा येथे क्लिक करा.
"भूगोल भटकंती" सिरीज मधील अन्य व्हिडिओ पाहण्यासाठी भूगोल भटकंती येथे क्लिक करा.
जय शिवराय
#kundmala #kund #potholes #BhugolBhatkanti #talegaon #dabhade #pune #SahyadriBhatkanti
1 Comments
Are these pot holes actually blow holes? This is quite interesting
ReplyDelete