नाखिंड ट्रेक | भगीरथ धबधबा | Nakhind Ridge trek | Monsoon trek | Vangani | Bhagirath waterfall | Bedisgaon | Thane

जिल्हा - ठाणे
पायथ्याचे गाव (Base village) - बेडीसगाव (Bedisgaon)
उंची (Height of the Nakhind) - ~२३०० फूट 
वेळ - २ तास
श्रेणी (Trek grade) - सोपी
सहनशक्ती (Endurance level) - मध्यम
जवळील रेल्वे स्टेशन (Nearest railway station) - वांगणी (Vangani)
मुंबई ते बेडीसगाव - ७० किमी
पुणे ते बेडीसगाव - १२० किमी
दिनांक - ११ सप्टेंबर २०२१

nakhind ridge trek

नेढे (Nedhe - an naturally formed hole in the rock) म्हणजेच खडकातील नैसर्गिकरीत्या निर्माण झालेले छिद्र. महाराष्ट्रातील काही निवडक ठिकाणीच यांसारखी विलक्षण भौगोलिक रचना पाहायला मिळते. त्यापैकी नाखिंड एक. दोन्ही बाजूला खोल दरी आणि धुके व घनदाट झाडीत हरवलेली पायवाट, अशा अरुंद कड्यावरून नाखिंडपर्यंत चालण्याचा थरारक अनुभव व ट्रेकनंतर भगीरथ धबधब्याला (Bhagirath Waterfall, Bedisgaon) दिलेली भेट, त्याच भटकंतीचा हा ब्लॉग. 

मुंबई ते बेडीसगाव प्रवास (How to reach Bedis village)

मुंबईवरून घणसोली - शिळफाटा - बदलापूर असा प्रवास करत वांगणी गाठले. 

nakhind ridge trek
बदलापूर नेरळ रोड

माझ्यासोबत माझे तीन ट्रेकर मित्र होते. पवन, लक्ष्मण आणि मुकेश. ह्या अगोदर आम्ही चौघांनी सोबत गोरखगड आणि मृगगड ट्रेक केला होता. मुंबई ते वांगणी हे ७० किमीचे अंतर तर पुणे ते वांगणी १२० किमीचे अंतर. वांगणी मधील चौकापासून वांगणी गाव रोडने बेडीसगावाकडे निघालो. 

nakhind ridge trek
वांगणी मधील चौक

nakhind ridge trek
वांगणी गाव रोडने बेडीसगावाकडे

वांगणी ते बेडीसगाव हे जवळपास ५ किमीचे अंतर. मार्ग तसा चांगला होता पण काही ठिकाणी रस्त्याची स्थिती थोडी खराब होती. वाटेत भेटलेल्या काही गावकऱ्यांनी विचारात आम्ही बेडीसगावाकडे निघालो. नाखिंड ट्रेकसाठी वांगणी हे जवळील रेल्वे स्टेशन व तेथून बेडीसगावासाठी रिक्षाची सुविधा उपलब्ध आहे. बेडीसगाव अगोदर उजव्या बाजूला एक वाट भगीरथ धबधब्याकडे जाते. 

nakhind ridge trek
भगीरथ धबधब्याकडे जाणारी वाट

आम्ही अगोदर बेडीसगावात निघालो. गावात बाईक पार्क केली आणि ट्रेकला सुरुवात झाली. 

nakhind ridge trek
बेडीसगाव 

ट्रेकला सुरुवात

घनदाट जंगलातून मार्ग आणि पावसाळी हंगामात पावसाची अनिश्चितता. वाटेत लागलेला पाण्याचा ओढा ओलांडला आणि पावसाला सुरुवात झाली. 

nakhind ridge trek
ट्रेकला सुरवात

nakhind ridge trek
घनदाट जंगलातून मार्ग

nakhind ridge trek
मार्गात लागलेला पाण्याचा ओढा

हा ट्रेक दोन टप्प्यांमध्ये केला जातो. पहिला टप्पा हा बेडीसगाव ते वाघिणीची वाडी (Waghinichi wadi) इथपर्यंतचा सोप्या श्रेणीचा ट्रेक. हा ट्रेक मार्ग पूर्णपणे ओळखू येईल असा असल्याने वाट चुकण्याची कुठलीही शक्यता नाही. 

nakhind ridge trek
ट्रेक मार्ग

त्याचबरोबर लाईटच्या खांबाच्या मदतीने देखील वाघिणीच्या वाडीकडे जाणारा मार्ग ओळखता येतो. 

nakhind ridge trek
लाईटच्या खांबाशेजारून वाडीकडे जाणारा मार्ग

समोर वाघिणीची वाडी दिसत होती. दाट धुक्याचे सावट असल्याने वाडी मागील डोंगरात नक्की कोठे नाखिंड आहे याचा अंदाज लागत नव्हता. वाघिणीची वाडी पर्यंत पोहचायला आम्हाला जवळपास पाऊण तास लागला.

nakhind ridge trek
वाघिणीची वाडीकडे जाताना

वाडीत पोहोचलो आणि गावकऱ्यांना सुरुवातीचा मार्ग विचारून पुढील प्रवासास लागलोत. 

nakhind ridge trek
वाघिणीची वाडी

nakhind ridge trek
वाडीतून मागे वळून पाहिले असता दिसलेले विहंगम दृश्य

नाखिंड वरून एका बाजूला चंदेरी किल्ला, म्हैसमाळ, ताहुली, मलंगगड तर दुसऱ्या बाजूला पेब किल्ला, माथेरान, इरशाळगड, कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगड दिसतात. मला हे किल्ले, सह्य शिखरे पाहायची होती पण धुके इतके होते इच्छा पूर्ण होईल की नाही असे वाटत होते. आणखीन दीड दोन तास होते नाखिंडवर पोहचण्यासाठी. तेवढे वेळेत कदाचित जर पाऊस कमी झाला, थोडे वातावरण स्वच्छ झाले तर मला ते दृश्य पाहता येईल असा स्वतःला सांगत पुढील प्रवासास सुरू होता. 

nakhind ridge trek
ट्रेक्कर मंडळी सोबत सेल्फी

nakhind ridge trek
नाखिंडकडे जाताना

ट्रेकचा दुसरा टप्पा म्हणजे वाघिणीची वाडी ते नाखिंडपर्यंतचा ट्रेक. ट्रेक जरी सोप्या श्रेणीचा असला तरी घनदाट झाडीतून योग्य मार्ग ओळखणे फार अवघड झाले होते आणि त्यात पावसाची सोबत तर होतीच. आम्हालाही नक्की कल्पना नव्हती की आम्ही योग्य मार्गाने जात आहोत की नाही. 

nakhind ridge trek
नाखिंडकडे जाणारा मार्ग शोधताना

अक्षरशः परत वाडीत जावे लागते की काय असे वाटत होते. काही वेळ संयम बाळगून चालत राहिलोत. तेवढ्यात दगडावर एक मार्किंग मिळाली आणि नवीन ऊर्जेने पुन्हा ट्रेकला सुरुवात केली. 

nakhind ridge trek
दगडावरील मार्किंग

आपण योग्य मार्गावर आहोत असा स्वतःला विश्वास देत पुढील एक तास सातत्याने चालत राहिलो. 

nakhind ridge trek
nakhind ridge trek
ट्रेक मार्ग

नाखिंड भटकंती

शेवटी नाखिंडकडे जाणाऱ्या दक्षिणोत्तर पसरलेल्या अरुंद कड्यावर आम्ही पोहोचलो आणि नाखिंडकडे निघालो.

nakhind ridge trek
कड्यावरून नाखिंडकडे जाताना

पण खरी परीक्षा तर आता होती. मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा, दोन्ही बाजूला खोल दरी आणि धुके व झाडीत हरवलेली पायवाट, अशा वातावरणात या अरुंद कड्यावरून नाखिंडकडे जाणे, फार थरारक अनुभव होता. 

nakhind ridge trek
nakhind ridge trek
मुसळधार पाऊस, दाट धुक्यात कड्यावरून नाखिंडकडे जाताना 

नाखिंडला पोहचलो आणि नेढेमध्ये काही वेळ आराम केला. नेढेमध्ये बसून पावसापासून आमचा काही वेळ बचाव झाला, पण सोसाट्याचा थंड वारा मात्र अंगावर शहारे आणत होता. मार्ग शोधण्यासाठी अर्धा तास अधिकचा वेळ गेल्यामुळे वाघिणीची वाडी ते नाखिंड पर्यंत पोहचायला आम्हाला  २ तास लागले. 

nakhind ridge trek
nakhind ridge trek
nakhind ridge trek
nakhind ridge trek
नेढे

नेढेमध्ये बसून सोबत आणलेले भाकरी भाजी खाल्ली. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस सुरूच होता, त्यात दाट धुके. अश्या वातावरणात नेढेच्या वर जाणे जोखमीचे वाटत असल्याने आम्ही नेढेतच काही वेळ घालवला. नेढेच्या वरून आजूबाजूची सह्य शिखरे, किल्ले पाहण्याची इच्छा अधुरीच राहिली. पुन्हा नक्की येईन पण हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात आणि नेढेच्या वर देखील जाईल असा निश्चय करत परतीच्या प्रवासास लागलोत. नाखिंड ते वाघिणीची वाडीपर्यंत येण्यासाठी आम्हाला पाऊण तास लागला तर वाघिणीची 

nakhind ridge trek
नाखिंड पासून परतताना

पुन्हा बेडीसगावात आलोत आणि एका गावकऱ्याच्या घरी बकरीला आपल्या पिल्लाला जन्म देताना पाहिले. माझ्यासारख्या शहरी भागात राहणाऱ्या भटकंती प्रेमीसाठी हा फार विलक्षण अनुभव होता. 

nakhind ridge trek
बकरीने जन्म दिलेले पिल्लू

भगीरथ धबधबा

बेडीसगावातून थोडे पुढे आलोत आणि भगीरथ धबधब्याकडे निघालो. 

bhagirath waterfall
bhagirath waterfall
भगीरथ धबधब्याकडे जाताना

काही मिनिटातच धबधबाजवळ आम्ही पोहोचलो. पाण्याचा प्रवाह ओलांडून धबधब्याच्या पायथ्याशी निघालो. पायथ्याशी आल्यावर धबधब्याच्या अवाढवेतची प्रचिती आली. 

bhagirath waterfall
bhagirath waterfall
bhagirath waterfall
bhagirath waterfall
भगीरथ धबधबा

त्यात अतिवृष्टीमुळे धबधबा खाली जाणे सध्या जोखमीचे वाटत असल्याने तिथे काही वेळ थांबून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. 

परतीचा प्रवास 

पुन्हा वांगणी - बदलापूर - शिळफाटा - घणसोली असा प्रवास करत मुंबई गाठले. 

आपल्याला ह्याच भटकंतीचा यूट्यूब व्हिडिओ पाहायचा असेल तर नाखिंड येथे क्लिक करा. 

ठाणे जिल्ह्यातील अन्य ब्लॉग वाचण्यासाठी ठाणे येथे क्लिक करा.

जय शिवराय 

#nakhind #nakhindridge #bedisgaon #vangani #thane #sahyadribhatkanti
Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu