भवानी माता मंदिर | मृगगड किल्ला | धार्मिक भटकंती | Bhavani Mata temple | Mrugagad Fort | Dharmik Bhatkanti | Sahyadri Bhatkanti

"भवानी माता मंदिर - मृगगड किल्ला"
धार्मिक भटकंती सिरीज - किल्ले भटकंती आणि तेथील ग्रामदैवता

रायगड जिल्हा, सुधागड तालुक्यात मृगगड हा किल्ला (Mrugagad Fort). भेलीव (Bheliv village) ह्या गावातून किल्ल्याचा ट्रेक करता येतो. गावात असलेल्या भवानी मातेच्या मंदिरामागूनच (Goddess Bhavani Temple) ट्रेक मार्ग किल्ल्याच्या दिशेने जातो. 

मी गेलो होतो तेव्हा मंदिराचे दुरुस्तीचे काम सुरू होते. आता नक्कीच मंदिर परिसर आणखीन चांगला केला असावा. पायथा ते गडमाथा गाठण्यास एक तास पुरेसा. भवानी मातेची आणखीन एक प्रतिकृती गडमाथ्यावर देखील आहे. कातीळकोरीव पायऱ्या चढून वर आले की समोर देवीचे दर्शन होते. २०२१ मध्ये जेव्हा मी भेट दिली होती तेव्हा एका पत्र्याच्या शेडमध्ये ही मूर्ती आहे. सोप्या श्रेणीचा जंगल ट्रेक, खिंडीतून वाट, कातीळकोरीव पायऱ्या, गुहा, मातेची गडावरील मूर्ती, पाण्याच्या टाक्या व काही अवशेष हे या ट्रेकची वैशिष्ट. गडाच्या मागे मोराडीचा सुळका (Moradi Pinnacle) आणि त्यामागे लोणावळा डोंगररांग (Lonavala mountain range) आहे.

ह्या सिरीज मधील अन्य ब्लॉग वाचण्यासाठी धार्मिक भटकंती येथे क्लिक करा.

#DharmikBhatkanti #mrugagad #bheliv #sudhagad #raigad #SahyadriBhatkanti
Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu