"गौरमाता देवी मंदिर - भिवगड किल्ला"
धार्मिक भटकंती सिरीज - किल्ले भटकंती व तेथील ग्रामदैवता
कर्जत तालुक्यातील भिवगड किल्ल्याच्या पायथ्याशी गौरमाता देवीचे मंदिर (Goddess Gaurmata temple) आहे. मंदिरा समोरील डोंगर म्हणजेच भिवगड किल्ला (Bhivgad Fort). गावकरी मनोभावे ह्या देवीची पूजा करतात. मंदिराच्या एका बाजूला वडप गाव (Vadap village) तर दुसऱ्या बाजूला गौरकामत (Gaurkamat village) हे गाव. ह्याच देवीच्या नावावरून जवळील गावाचे गौरकामत हे नाव पडले असावे. ह्या दोन्ही गावातून भिवगड किल्ल्याचा ट्रेक करता येतो.
पायथा ते गडमाथा गाठण्यास दोन्ही गावातून एक तास पुरेसा. मी भिवगड किल्ल्याचा ट्रेक केला तेव्हा एका गावकऱ्याशी झालेल्या चर्चेत त्यांनी सांगितले की वर्षातून एकदा जत्रा प्रमाणेच मोठ्या जल्लोषात येथे उत्सव देखील साजरा केला जातो. मंदिराला लागून लोकांची वस्ती नाही त्यामुळे किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले हे मंदिर आणखीन उठून दिसते. किल्ल्यावर पाण्याच्या टाक्या, खांबटाके, प्रचंड कातळात खोदून काढलेला गौरकामत गावातून गडावर जाणारा मार्ग, गुहा, तटबंदीचे व अन्य काही अवशेष हे काही ठिकाणे पाहण्यासारखी. वडप गावातून किल्ल्याच्या बाजूला असलेल्या हंगामी धबधब्याचा (Vadap waterfall) आनंद देखील घेता येतो.
#DharmikBhatkanti #gaurmata #temple #bhivgad #karjat #SahyadriBhatkanti
0 Comments