Geotags Bhatkanti सिरीज
(जियोटॅग भटकंती - ठिकाणांचे भौगोलिक टॅगिंग)
छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन आणि ज्या गडावर नरवीर बाजीप्रभू देशपांडे सारखा हिरा हिंदवी स्वराज्याला गवसला असा भोर तालुका, पुणे जिल्ह्यातील रोहिडा किल्ला (Rohida Fort). पायथ्याच्या बाजारवाडी (Bazarwadi) गावातून किल्ल्यावर एक तासाचा ट्रेक करून जाता येते. किल्ल्याला विचित्रगड (Vichitragad Fort) या नावाने देखील ओळखले जाते. किल्ला जरी लहान असला तरी पाहण्याजोगी बऱ्याच गोष्टी आहेत. त्यात विशेष म्हणजे किल्ल्यावरील बुरुज. फत्ते, शिरवले, दामगुडे, पाटणे, वाघजाई, सर्जा ही काही गडावरील बुरुजांची नावे. त्यापैकी शिरवले बुरुज (Shirvale bastion) येथून काढलेला हा फोटो. या बुरुजावरुन किल्ल्याच्या दक्षिणेकडे पाहिले असता केंजळगड किल्ला (Kenjalgad Fort) आपल्या विशिष्ट आकारामुळे सहज ओळखता येतो. या किल्ल्याला लागूनच रायरेश्वराचे पठार (Raireshwar Plateaeu) आहे व त्याच पठारावर रायरेश्वर किल्ला (Raireshwar Fort) आहे. तर मागील बाजूस धोम धरण (Dhom Dam) परिसरात कमळगड किल्ला (Kamalgad Fort). बरेच ट्रेकर रोहिडा - रायरेश्वर - केंजळगड - कमळगड हा रेंज ट्रेक देखील करतात.
बुरुजाशिवाय रोहिडा किल्लावर पाण्याच्या टाक्या, राजवाडा व सदरचे अवशेष, तीन दरवाजे, शिलालेख, रोहीडमल्ल भैरवनाथ मंदिर, चुन्याचा घाणा, चोर दरवाजा, इत्यादी ठिकाणे आहेत.
#GeotagsBhatkanti #rohidafort #kenjalgad #raireshwar #kamalgad #SahyadriBhatkanti
0 Comments