"इरशाळ देवी मंदिर - इरशाळगड"
धार्मिक भटकंती सिरीज - किल्ले भटकंती व तेथील ग्रामदैवता
महाराष्ट्राला जेवढे ऐतिहासिक तेवढेच भौगोलिक महत्त्व देखील लाभलेले आहे. अनेक भौगोलिक नवल ह्या आपल्या सह्याद्रीत पाहायला मिळतात. त्यापैकी एक म्हणजे नेढे, जे नैसर्गिकरीत्या कातळात निर्माण झालेले छिद्र आहे (Nedhe - a naturally formed hole in a rock). राजगड, रतनगड अश्या प्रसिद्ध किल्ल्यावरील नेढे आपल्याला माहीत असेलच पण अन्य काही ठिकाणी देखील नेढे पाहायला मिळतात. त्यापैकी एक इरशाळगड. हे नाव पडले ते किल्ल्याच्या पायथी असलेल्या इरशाळ देवीच्या मंदिरामुळे (Goddess Irshal temple). तसेच मंदिर जवळील २०-२५ घरांची वाडी म्हणजे इरशाळवाडी (Irshalwadi).
किल्ल्याचा ट्रेक सुरु होतो रायगड जिल्हातील चौक येथील मोरबे धरण शेजारील मणिवली गावातून (Chowk Manivali village). दीड ते दोन तासाचा ट्रेक करून पहिले इरशाळवाडीत यावे लागते व तेथून अर्धा तासाचा ट्रेक केल्यावर गडावर जाता येते. वाडी ते गड ह्या दरम्यानच देवीचे मंदिर आपल्याला भेटेल. नेढे पर्यंत जाता येते आणि असेच आणखी एक मंदिर नेढे शेजारी देखील आहे.
#DharmikBhatkanti #irshalgad #irshaldevi #chauk #raigad #SahyadriBhatkanti
0 Comments