तिकोना किल्ला | Tikona Fort | पावसाळी भटकंती | तिकोना पेठ | Monsoon Trek | Tikona Peth | Maval | Pune | Sahyadri Bhatkanti

जिल्हा - पुणे
पायथ्याचे गाव (Base village) -तिकोना पेठ (Tikona Peth)
उंची (Height of the Tikona fort) - ३५९० फूट 
वेळ - १ तास
श्रेणी (Trek grade) - सोपी
सहनशक्ती (Endurance level) - मध्यम
जवळील रेल्वे स्टेशन (Nearest railway station) - लोणावळा/कामशेत (Lonavala/Kamshet)
मुंबई ते तिकोना पेठ - १२० किमी
पुणे ते तिकोना पेठ - ६० किमी
दिनांक -  २१ ऑगस्ट २०२२

tikona fort trek

बारा मावळ्यांपैकी एक, पवन मावळ व या मावळातील पवना धरणाच्या (Pavna Dam) विस्तीर्ण जलाशयाला लागून गिरीदुर्गांची चौकडी आहे. लोहगड, विसापूर, तुंग व तिकोना किल्ला. यापैकी तिकोना किल्ला भेटीसाठी आपण निघालो आहोत. किल्ल्याचा त्रिकोणी आकार, प्रचंड कातळात खोदलेल्या लेण्या, इतिहासाचे साक्ष देणारे अवशेष आणि बालेकिल्ल्यावर जाणारी उभ्या चढाईची व अरुंद वाट. असा किल्ले तिकोना उर्फ वितंडगड. त्रिकोणी आकारामुळे किल्ल्याला तिकोना (Tikona Fort) हे नाव पडले आहे व तसेच किल्ला वितंडगड (Vitandgad) ह्या नावाने देखील ओळखले जातो. 

पुणे ते तिकोना पेठ गाव प्रवास (How to reach Tikona Peth village!)

मी पुण्यावरून बाईकने किल्ल्याला निघालो होतो. जुन्या मुंबई पुणे महामार्गाने देहू रोड ओलांडले आणि सोमाटणे टोल नाक्याजवळ पोहचलो. बिर्ला गणपतीच्या (Birla Ganpati temple) भव्य मूर्तीचे लांबूनच दर्शन घेतले आणि पुढील प्रवासास लागलोत.

tikona fort trek
जुना मुंबई पुणे महामार्ग

tikona fort trek
बिर्ला गणपती

टोल नाका ओलांडला की डाव्या बाजूने, परंदवाडी रोडने किल्ल्याकडे निघालो. 

tikona fort trek
परंदवाडी रोड

या भागात रोडला लागूनच नर्सरीचे प्रमाण फार जास्त आहे. 

tikona fort trek
रोडला लागूनच नर्सरी

वाटेत लागलेली काही गावे ओलांडून थेट ब्राह्मनोली ह्या गावातून बाहेर पडलो. लोणावळा किंवा कामशेत पासून येणारा एक मार्ग येथे मिळतो. 

tikona fort trek
ब्राह्मनोली गावाजवळ

तिकोना किल्ल्याला जाण्यासाठी, लोणावळा आणि कामशेत हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे. पण या स्टेशनपासुन तिकोना पेठ गावात जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सुविधा फारशी नियमित नाही. त्यामुळे तुमच्या स्वत:च्या वाहनाने किंवा तुम्ही ग्रुपमध्ये आला असाल तर ग्रुपसाठी स्टेशनपासुन गाडी करुन येण्याचा सल्ला दिला जातो. तिकोना पेठ हे गाव पुण्यापासून ६० किलोमीटर तर मुंबईपासून १२० किलोमीटर अंतरावर आहे.

धुक्याने वेढलेला तिकोना व तुंग किल्ला (Tung Fort) आता नजरेस येत होता. 

tikona fort trek
तुंग किल्ला

tikona fort trek
तिकोना किल्ला

पवना धरणाच्या जलाशया शेजारी थोडा वेळ विसावलो. तिकोना पेठ हे गाव अगदीच किल्ल्याच्या पायथी आहे. येथे पार्किंग व खाण्यापिण्याची सुविधा देखील मिळेल. 

tikona fort trek
tikona fort trek
तिकोना पेठ गाव व तिकोना किल्ला

ट्रेकला सुरुवात

बाईक पार्क केल्या व ट्रेकला सुरुवात झाली. 

tikona fort trek
ट्रेकला सुरुवात

ट्रेक मार्ग पूर्णपणे ओळखू येईल असा आहे. त्याशिवाय किल्ला नजरेसमोरच असल्याने मार्ग चुकण्याची कुठलीच शक्यता नाही. 

tikona fort trek
tikona fort trek
ट्रेक मार्ग

पंधरा मिनिटातच आम्ही वाटतच असलेल्या "मेट" या ठिकाणी पोहोचलो. मेट म्हणजे गडावर प्रवेशापूर्वी होणारी पहिली तपासणीची जागा किंवा गडावर होणारा हल्ला परतवून लावण्याचे पहिले ठिकाण. 

tikona fort trek
मेट

काही अंतरावर कातळात खोदलेल्या मार्गात प्रवेशद्वार लावण्यात आले आहे व आतील बाजूस लहान गुहा देखील आहे. 

tikona fort trek
प्रवेशद्वार

tikona fort trek
गुहा

जवळच पडझड झालेले किल्ल्याचे भव्य प्रवेशद्वार आहे. 

tikona fort trek
tikona fort trek
किल्ल्याचे भव्य प्रवेशद्वार

tikona fort trek
प्रवेशद्वार जवळील मंदिराचे अवशेष

गड भटकंती

महाराष्ट्रातील किल्ल्यांवर मारुतीची मूर्ती सहसा पहायला मिळतेच. पण येथील चपेटदान मारुतीची (Chapetdan Maruti) कातीळकोरीव मूर्ती अतिशय भव्य आहे. 

tikona fort trek
चपेटदान मारुती

किल्ल्यावर वाड्याचे अवशेष देखील पाहायला मिळतात. 

tikona fort trek
tikona fort trek
tikona fort trek
वाड्याचे अवशेष

उभ्या कातळात खोदलेल्या प्राचीन लेण्या (Ancient Caves) आपल्याला बराच काळ मागे घेऊन जातात. लेण्यांसमोर एक बांधीव तळे देखील आहे. 

tikona fort trek
प्राचीन लेण्या व बांधीव तळे

काही खोल्यांमध्ये विभागलेल्या या लेण्यांच्या एका दालनात तळजाई मातेची (Taljai Mata temple) स्थापना केली आहे व छतावर सुरेख शिल्पाकृती कोरलेली दिसते. 

tikona fort trek
tikona fort trek
तळजाई मंदिर

बालेकिल्ल्यावर जाण्याआधी उजवीकडे एक वाट कधीकाळी किल्ल्याचे प्रवेशद्वार असलेल्या महादरवाज्याकडे जाते. 

tikona fort trek
महादरवाज्याकडे

पायथ्यावरून महादरवाज्याकडे येणारी वाट आता जरी वापरात नसली तरी महादरवाजा व येथील तटबंदी आजही सुस्थितीत आहे. 

tikona fort trek
tikona fort trek
tikona fort trek
महादरवाजा व येथील तटबंदी

tikona fort trek

महादरवाजा शेजारीच पाण्याच्या व्यवस्थेकरिता दगडात कोरलेले अखंड पाण्याचे टाके (Water tanks) पाहायला मिळते. येथे जाणारी वाट थोडी अवघड आहे. त्यामुळे थोडे जपूनच जावे. 

tikona fort trek
tikona fort trek
पाण्याचे टाक्याकडे जाणारी वाट

tikona fort trek
tikona fort trek
पाण्याचे टाके

आता बालेकिल्ल्याकडे निघालो. थोडे पुढे आल्यावर आणखीन एक वाट बालेकिल्लाला जाणाऱ्या मार्गाला मिळताना दिसली. म्हणून ही वाट कोठे जाते ते पाहण्यासाठी निघालो. वाट खाली उतरायला लागली. 

tikona fort trek
बालेकिल्ल्याकडे जाताना

tikona fort trek
एक वाट बालेकिल्लाला जाणाऱ्या मार्गाला मिळताना

पुढे आल्यावर कळाले की लेण्यांकडे जाताना मुख्य मार्गापासून एक वाट वरच्या दिशेने जात होती. तीच ही वाट. पण चढाईला थोडी अवघड. 

tikona fort trek
वाट खाली उतरताना

tikona fort trek
मुख्य मार्गापासून एक वाट वरच्या दिशेने जाताना

पुन्हा बालेकिल्ल्याकडे मार्गस्थ झालो. किल्ल्यावर चुन्याचा घाणा देखील आहे. 

tikona fort trek
पुन्हा बालेकिल्ल्याकडे मार्गस्थ

tikona fort trek
चुन्याचा घाणा

बालेकिल्ल्याची चढाई सुरू झाली. बालेकिल्लाचा पहिला दरवाजा थोडा लहान आहे व आतील बाजूस पाण्याच टाक व लेणी आहेत. 

tikona fort trek
बालेकिल्ल्याची चढाई

tikona fort trek
पहिला दरवाजा

tikona fort trek
पाण्याच टाक व लेणी

येथून पुढील पायऱ्या अगदीच उभ्या चढाच्या व अंगावर येणाऱ्या आहेत. बालेकिल्ल्याचा दुसरा दरवाजा मात्र प्रशस्त आणि आखीवरेखीव आहे. 

tikona fort trek
उभ्या चढाच्या व अंगावर येणाऱ्या पायऱ्या

tikona fort trek
दुसरा दरवाजा

दरवाजा जवळच आणखीन काही गुहा आहेत. 

tikona fort trek
गुहा

शेवटच्या काही पायऱ्या चालून बालेकिल्ल्यावर आलोत. पायथ्यापासून बालेकिल्ला गाठण्यास आम्हाला एक तास लागला. 

tikona fort trek
बालेकिल्ला

बालेकिल्ल्यावरील महादेवाचे मंदिर (Shiva temple) खोदीव पाण्याच्या टाक्यावर उभं आहे. 

tikona fort trek
tikona fort trek
tikona fort trek
महादेवाचे मंदिर

वातावरण स्वच्छ असल्यास बालेकिल्ल्यावरून पवना धरणाचा विशाल जलाशय, तसेच तुंग, लोहगड (Lohgad Fort) व विसापूर (Visapur Fort) हे किल्ले सहज नजरेस पडतात. 

tikona fort trek
पवना धरण जलाशय

बालेकिल्ल्यावर महादेवाचे मंदिर, खोदीव टाक, काही अवशेष व बांधीव तळे इतकेच काही व आकाराने देखील लहान. 

tikona fort trek
बांधीव तळे

पण गडावर प्रेम करणाऱ्या आणि दगडात इतिहास शोधणाऱ्यांसाठी हा किल्ला म्हणजे पर्वणीच होय. अशाच एका गडप्रेमीशी बालेकिल्ल्यावर भेट झाली. 

tikona fort trek
एका गडप्रेमीशी बालेकिल्ल्यावर भेट

त्यांचे शब्द मनात घर करून राहिले "जेव्हा आपण किल्ल्यावर जातो, तेव्हा तेथील प्रत्येक वास्तू आपल्याशी बोलत आहे असा मनात भाव निर्माण होतो. एखाद्या खोबणीत जेव्हा हाथ ठेवतो, तेव्हा मनात भाव निर्माण होतो की माझ्या माँसाहेबांची बोटं येथे कधी तरी  लागली असतील, माझ्या शिवाजी महारांजाची बोटं येथे कधी तरी लागली असतील."

काही वेळ भगव्याजवळ निवांत घालवला. तितक्यात पावसाने जोर धरला, म्हणून गड उतरायला सुरुवात केली.

tikona fort trek

परतीचा प्रवास

अर्ध्या तासातच पुन्हा तिकोना पेठ ह्या गावात आलोत व न्याहरी करून परतीच्या मार्गाला लागलो. किल्ला पुन्हा धुक्यात हरवला होता. 

tikona fort trek
किल्ला पुन्हा धुक्यात हरवला

तुंग किल्ला अजूनही अर्ध धुक्यातच होता. काही वेळ तुंग किल्ला पाहत थांबलो. 

tikona fort trek
तुंग किल्ला

tikona fort trek

पुन्हा ब्राह्मणोली ह्या गावापासून उजवीकडील मार्गाने पुण्याच्या दिशेने प्रवास सुरु झाला. पाऊस थांबला होता.  धुके हळूहळू कमी होत होते. म्हणून मागे वळून लोहगड आणि विसापूर किल्ले दिसत आहेत का ते पाहत होतो. एका गावाजवळ थांबलोत. परतीच्या प्रवासात का होईना पण लोहगड आणि विसापूर किल्ले मला शेवटी दिसलेच. तेव्हा कुठे भटकंती परिपूर्ण झाल्याचा आनंद झाला. 

tikona fort trek
लोहगड आणि विसापूर किल्ला

सोमाटणे टोलनाका जवळ आलोत व तेथून देहू रोड - खडकी - येरवडा असा प्रवास करत खराडी येथे घरी आलो.

आजची आपली भटकंती येथेच संपते. ह्याच भटकंतीचा युट्यूब विडिओ पाहण्यासाठी तिकोना किल्ला येथे क्लिक करा. 

पुणे जिल्ह्यातील अन्य ब्लॉग वाचण्यासाठी पुणे येथे क्लिक करा.

जय शिवराय

#tikonafort #tikonapeth #maval #pune #SahyadriBhatkanti
Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu