Geotags Bhatkanti सिरीज - घोरावडेश्वर लेणी डोंगरापासून पश्चिमेकडे दिसणारे लोणावळा रांगेतील किल्ले
तळेगाव दाभाडे येथे मुंबई - पुणे जुन्या महामार्गाला लागूनच घोरावडेश्वर लेणी (Ghoravadeshwar Caves, Talegaon Dabhade) आहेत. लेणीकडे जाण्यासाठी महामार्गापासून दोन वाटा जातात. एक मुख्य वाट, जेथून पायऱ्या आहेत तर तर दुसरा उभ्या चढणीचा. मी दुसऱ्या वाटेने लेणींकडे निघालो. डोंगर माथ्यावर जाऊन दुसऱ्या बाजूने थोड खाली उतरून लेणींकडे जायचे होते. महामार्गापासून दुसऱ्या मार्गाने थोड उंचीवर आलो व अजून काही चढ बाकी होता. तेव्हा काढलेला हा फोटो. येथून समोर शेजारील डोंगरावरून येणारा पायऱ्यांचा मार्ग व उजवीकडे पाहिले असता मुंबई - पुणे जुना महामार्ग दिसेल. थोडं दूरवर पाहिले असता किल्ल्यांची एक रांग दिसून येत होती.
बारा मावळांपैकी एक, पवन मावळ व या मावळातील पवना धरणाच्या (Pavna Dam) विस्तीर्ण जलाशयाला लागून किल्ल्यांची एक चौकडी आहे. ते म्हणजे तिकोना किल्ला, तुंग किल्ला, लोहगड आणि विसापूर किल्ला. हे सर्व किल्ले येथून नजरेत येत होते. त्याशिवाय तुंग किल्ल्याच्या अगदीच मागे असलेला मोरगिरी किल्ला (Morgiri Fort) देखील ओळखता येत होता. मुंबई - पुणे जुना महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जाताना मळवली लागते. तेथून उजवीकडील मार्गाने एकविरा आई देवस्थानाला (Ekvira Aai Devasthan) जाता येते तर डावीकडील मार्ग मळवली स्टेशनला जातो. मळवली स्टेशनपासून लोहगड व विसापूर किल्ला (Lohgad and Visapur Fort) येथे जाता येते. तेथून पवना धरणाच्या जवळ येऊन, धरणाच्या कडीकडीने तिकोना किल्ल्याला (Tikona Fort) येता येते. तिकोना पेठ हे पायथ्याचे गाव. तिकोना किल्ल्यावरून धरणाच्या पलीकडे एक शिखर आपले लक्ष वेधतो. तो म्हणजे तुंग किल्ला. पुन्हा धरणाला वळसा घालून तुंग किल्ल्याला (Tung Fort) येता येते. पायथ्याच्या तुंगवाडी गावातून तो ट्रेक करता येतो. तेथून अगदीच जवळ असलेल्या मोरगिरी किल्ल्याला देखील जाता येते. पायथ्याच्या जांभुळणे गावातून मोरगिरी किल्ल्याचा ट्रेक करता येतो.
लोणावळा येथून देखील घुसळखांब गावाला येऊन मोरगिरी किल्ल्याकडे जाता येते. घुसळखांब गावा अगोदर कुरवंडे हे गाव लागते. तेथून नागफणी डोंगराचा (Duke's Nose) ट्रेक करता येतो. त्याशिवाय जवळील भुशी धरण, टायगर पॉइंट, लायन पॉइंट, इत्यादी अश्या काही पॉईंट्सना देखील भेट देऊ शकता. तसेच घुसळखांब गावापासून दोन मार्ग आहेत. उजवीकडील मार्ग कोरीगडला (Korigad Fort) जातो तर डावीकडील मार्ग मोरगिरी व तुंग किल्ल्याला.
पुणे जिल्ह्यातील अन्य ब्लॉग वाचण्यासाठी
पुणे येथे क्लिक करा.
#tikonafort #tungfort #lohgad #visapurfort #morgirifort #ghoravadeshwar #caves #GeotagsBhatkanti #SahyadriBhatkanti
0 Comments