कडेपठार ते जेजुरीगड प्रवास | Kadepathar to Jejurigad Trek | धार्मिक भटकंती | जेजुरी | Dharmik Bhatkanti | Jejuri | Pune

धार्मिक भटकंती सिरीज - कडेपठार ते जेजुरीगड प्रवास 

जिल्हा - पुणे 
वेळ - ४ तास (पायथा - कडेपठार - जेजुरीगड - पायथा)
श्रेणी (Trek grade) - सोपी
सहनशक्ती (Endurance level) - मध्यम
जवळील रेल्वे स्टेशन (Nearest railway station) - जेजुरी
मुंबई ते जेजुरी - २१० किमी
पुणे ते जेजुरी - ५ ० किमी
दिनांक -  २० जुलै २०२२

जेजुरीगडापासून दक्षिणेला असलेल्या डोंगररांगेत, महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडेरायाचे मंदिर (Jejuri Khandoba Temple) आहे. हेच कडेपठार श्री खंडोबा देवस्थान (Kadepathar Temple) व येथून डोंगरमार्गानेच जेजुरीगडाला आम्ही प्रवास केला. त्यासोबतच दिवेघाटात श्री विठ्ठलाच्या भव्य मूर्तीचे आणि संत श्री ज्ञानेश्वर माऊली पालखीच्या परतीच्या प्रवासाचे झालेले दर्शन. ह्याच प्रवासाचा आपल्या धार्मिक भटकंती सिरीज मधील हा ब्लॉग. 

दक्षिण भारतात खंडेरायाची बरीच स्थाने आहेत. तरी या दैवताची राजधानी मात्र जेजुरीगडच समजली जाते. जेजुरीचा खंडोबा  म्हणजे प्रत्यक्ष महादेवाचा अवतारच मानला जातो व जनमानसात हे दैवत मार्तंड भैरव (Martand Bhairav) किंवा मल्हारी मार्तंड (Malhari Martand) या नावाने प्रचलित आहे

पुणे ते कडेपठार देवस्थान प्रवास (How to reach Jejuri from Pune!)

पुणे ते जेजुरी हे जवळपास 50 किलोमीटरचे अंतर व पुण्यावरून हडपसर - सासवड मार्गाने जाताना दिवेघाटात (Dive Ghat) आम्ही थांबलो. पावसाळा काही दिवसांवर होता. मस्तानी तलावाचे (Mastani Lake) पाणी पूर्णपणे आटले होते. 

jejurigad
मस्तानी तलाव

घाट संपला की श्री विठ्ठलाची भव्य मूर्ती (Shree Viththal Statue) आपल्याला खुणावते. येथील परिसराच्या सुशोभीकरणाचे काम सुरू होते. 

"ज्ञानोबा माऊली तुकाराम" असा गजर करत, टाळ मृदुंगाचा तालावर, दिवेघाट चढून आल्यावर, श्री विठ्ठलाच्या दर्शनाने वारकऱ्यांचा थकवा क्षणार्धात निघून जात असावा.

jejurigad
श्री विठ्ठलाची भव्य मूर्ती

मूर्ती शेजारील टेकडीवर आम्ही निघालो. 

jejurigad
मूर्ती शेजारील टेकडी

टेकडीवरून श्री विठ्ठल मूर्ती, दिवेघाटाचा परिसर, मस्तानी तलाव आणि डोंगरांची एक रांग नजरेत येत होती. 

jejurigad
दिवेघाटाचा परिसर आणि मस्तानी तलाव

ह्याच डोंगररांगेत पुढे मल्हारगड (Malhargad Fort) आहे.  घाटातून पुढे आल्यावर डाव्या बाजूने, काळेवाडी गावातून मल्हारगडाला जाता येते. 

jejurigad
डोंगररांग आणि मल्हारगड

हडपसर - सासवड - जेजुरी ह्या प्रवासात बऱ्याच लहान-मोठ्या वारकऱ्यांच्या दिंडी व पालख्यांचा परतीचा प्रवास पाहता आला. त्यात अविस्मरणीय राहिली ती, संत श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी (Sant Shree Dnyaneshwar Maharaj Palkhi). टाळ मृदुंगाचा ताल, मुखात अभंगवाणी आणि काय तो वारकऱ्यांचा उत्साह. एका वेगळ्याच उर्जेने भारावून गेलो. 

jejurigad
संत श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी

कडेपठार देवस्थानच्या पायथी पोहोचलोत. 

पायथा ते कडेपठार देवस्थान

पायथ्याशी असलेल्या भगवान महादेवाचे दर्शन घेऊन पायऱ्या चढण्यास सुरुवात केली. 

पायथा ते मंदिर, पूर्ण पायऱ्यांचा मार्ग आहे व या प्रवासाला अर्धा ते पाऊण तास पुरेसा. महाराष्ट्राचे कुलदैवत खंडेरायाच्या दर्शनासाठी चिमुकल्यांपासून ते वयोवृद्ध येथे आवर्जून येत असतात. 

jejurigad
पायऱ्यांचा मार्ग

जेजुरीगडाच्या दक्षिणेकडील डोंगररांगेत, थोड्या उंचीवर कडेपठार देवस्थान आहे. 

jejurigad
जेजुरीगडाच्या दक्षिणेकडील डोंगररांग

वाटेतील बानुबाई मंदिराचे (Banubai Temple) दर्शन घेऊन खंडोबा मंदिराकडे निघालो.

jejurigad
बानुबाई मंदिर

कडेपठार देवस्थान

कडेपठारला पोहोचणे थोडे थकावणारे असले, तरी खंडेरायाचे व येथील अन्य मंदिराचे दर्शन मात्र सुखावणारे आहे, यात शंका नाही. कडेपठार देवस्थानात लहान-मोठी अशी बरीच मंदिरे पाहायला मिळाली. 

jejurigad
कडेपठार येथील अन्य मंदिरे

खंडोबाचे मंदिर पूर्वाभिमुखी असून समोर मेघडंबरीत नंदी व पुढे भव्य कासव आहे. 

jejurigad
कडेपठार श्री खंडोबा मंदिर

खंडोबा मंदिराजवळ आणखीन काही मंदिर आहेत. 

jejurigad
मंदिराजवळील काही मंदिरे

घोडे उड्डाण (Ghode Uddan) परिसरात देखील छोटेखानी बरीच मंदिरे पाहायला मिळतात. 

jejurigad
घोडे उड्डाण परिसरातील मंदिरे

खंडोबा मंदिराच्या प्रवेशद्वारापासून एक वाट सरळ, काठावर महादेवाचे मंदिर असलेल्या छोट्या तळ्याकडे जाते.

jejurigad
छोटे तळे

कडेपठार देवस्थान ते जेजुरीगड ट्रेक

आता जेजुरीगडाकडे आम्ही निघालो. पायऱ्यांचा मार्ग मागे सोडून आता डोंगरमार्गावरून खडतर प्रवास सुरू झाला. 

jejurigad
डोंगरमार्गावरून जेजुरीगडाकडे जाणारी वाट

कडेपठारपासून ते जेजुरीगड गाठण्यास एक तास पुरेसा व मार्गात काही ठिकाणी कमानी देखील पाहायला मिळतात. 

jejurigad
कमानी

ह्या प्रवासात अर्ध वाटेत बानाई मंदिर (Banai Temple) देखील होते.

jejurigad
बानाई मंदिर


ह्या प्रवासात एका ठिकाणी एकावर एक काही बारीक दगडे रचून ठेवलेली होती. इच्छापूर्तीसाठी भाविकांनी अशी रचना केली असावी. 

jejurigad
एकावर एक रचलेली बारीक दगडे

जेजुरीगड

गडावर जाण्यासाठी पूर्व, पश्चिम व उत्तर दिशांना प्रवेशद्वार आहे. आम्ही पूर्व दरवाजाकडे निघालो. 

jejurigad
पूर्व दरवाजा

गडावर प्रवेश केल्यानंतर समोर दिसतात त्या उंचच उंच दीपमाळा व श्री खंडोबा मंदिर. 

jejurigad
श्री खंडोबा मंदिर

कडेपठार प्रमाणेच हे खंडोबाचे मंदिर देखील पूर्वाभिमुखी असून समोर मेघडंबरीत नंदी व पुढे भव्य कासव आहे. 

jejurigad
श्री खंडोबा मंदिर

"सदानंदाचा येळकोट", "येळकोट येळकोट जय मल्हार", "खंडोबाच्या नावानं चांगभलं" अशी आरोळी आणि सोबत उधळला जाणारा भंडारा आणि खोबरं. मंदिरामागेच तुळजाभवानीचे मंदिर आहे व परिसरात तळी भंडाराची जागा देखील आहे. 

jejurigad
तुळजाभवानी मंदिर

jejurigad
तळी भंडाराची जागा

चैत्र, माघ व श्रावणी पौर्णिमा तसेच चंपाषष्ठी, महाशिवरात्रीला देखील मोठ्या दिमाखात येथे उत्सव साजरे केले जातात. 

jejurigad
श्री खंडोबा मंदिर


पश्चिम दरवाजा मार्गे गड उतरण्यास सुरुवात केली. 

jejurigad
पश्चिम दरवाजा

वाटेत एका ऐतिहासिक क्षणाच दृश्य उभं केलं आहे. जेजुरीगडावरील शहाजीराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज या पिता-पुत्रांची भेट.

jejurigad
जेजुरीगडावरील शहाजीराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज या पिता-पुत्रांची भेट

थोडे खाली बानाई मंदिर (Banai Temple) आहे. जेजुरीगडाच्या पायथी पोहोचलोत. गडाचे मुख्य महाद्वार पाहिले, नंदी महादेवाचे दर्शन घेतले  व परतीच्या प्रवासाला लागलोत. 

jejurigad
बानाई मंदिर

jejurigad
नंदी महादेव

jejurigad
मुख्य महाद्वार

परतीचा प्रवास

पुन्हा जेजुरीपासून सासवडला आलोत व पुढे दिवे घाटातून हडपसर-सासवड मार्गे खराडीला, घरी निघालोत.

आजची आपली भटकंती येथेच संपते. ह्या सिरीज मधील अन्य ब्लॉग वाचण्यासाठी धार्मिक भटकंती येथे क्लिक  करा. 

ह्याच भटकंतीचा युट्युब विडिओ पाहण्यासाठी कडेपठार ते जेजुरीगड प्रवास येथे क्लिक करा. 

जय शिवराय

#jejuri #khandoba #temple #kadepathar #DharmikBhatkanti #jejurigad #pune #SahyadriBhatkanti
Reactions:

Post a Comment

3 Comments

  1. 1997 साली मी मित्रा समवेत कडेपठार ल्ला गेलो होतो, या वर्षी पावसाल्यात पुरंदर ट्रेक करतांना पुन्हा कडेपठार करण्याचा विचार आहे

    ReplyDelete
  2. Pahile Kadepatharcha Maan ahe ki Gadacha?

    ReplyDelete
Emoji
(y)
:)
:(
hihi
:-)
:D
=D
:-d
;(
;-(
@-)
:P
:o
:>)
(o)
:p
(p)
:-s
(m)
8-)
:-t
:-b
b-(
:-#
=p~
x-)
(k)

Close Menu