श्री क्षेत्र आळंदी | Alandi temples | संत श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर | Sant Shree Dnyaneshwar Maharaj Sanjeevan Samadhi temple | धार्मिक भटकंती | Dharmik Bhatkanti | Alandi | Pune

धार्मिक भटकंती सिरीज - श्री क्षेत्र आळंदी व संत श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर

संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीने पावन व इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेली, देवाची आळंदी, म्हणजेच "श्री क्षेत्र आळंदी". याच ठिकाणाची माहिती आपल्या "धार्मिक भटकंती" सिरीज मार्फत ह्या ब्लॉगमध्ये आपण घेणार आहोत. 

sant dyaneshwar temple alandi

लग्नानंतर कोरोना लॉकडाऊनमुळे काही धार्मिक स्थळांना भेट देण्याचे राहिले होते. म्हणून 2021 च्या दिवाळीत आळंदीस आलो होतोत. मुंबईवरून आधी पुणे, खराडी येथील माझ्या सासरवाडीस आलोत व तेथून पुणे - नगर रोडने लोणीकंद गाठले. येथून डावीकडील मार्गाने आळंदीला निघालोत.

वाटेत श्री क्षेत्र तुळापूरला (Shree Kshetra Tulapur) भेट दिली. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीला (Chhatrapati Sambhaji Maharaj Samadhi) श्रद्धांजली अर्पण करून, येथील अद्भुत मंदिरे (Tulapur  temples) व त्रिवेणी संगमास (भीमा, भामा आणि इंद्रायणी या तीन नद्यांचा संगम) भेट दिली. या भटकंतीचा ब्लॉग वाचण्यासाठी श्री क्षेत्र तुळापूर इथे क्लिक करा.

sant dyaneshwar temple alandi
छत्रपती संभाजी महाराज स्मारक आणि समाधी - तुळापूर

sant dyaneshwar temple alandi
संगमेश्वर मंदिर - तुळापूर

sant dyaneshwar temple alandi
त्रिवेणी संगम - तुळापूर

तुळापूर पासून 10 किमी, तर पुणे स्थानकापासून 20 किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र आळंदी (Shree Kshetra Alandi) आहे. आळंदीला येताच हजेरी मारुती मंदिरास (Hajeri Maruti temple) भेट दिली. 

sant dyaneshwar temple alandi
हजेरी मारुती मंदिर

संत श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिराकडे (Sant Shree Dnyaneshwar Maharaj Sanjeevan Samadhi temple) येऊन दर्शन मंडपाकडे निघालोत. दर्शनासाठी रांगेत लागलोत. माऊलींच्या समाधीचे दर्शन घेऊन मंदिराबाहेर आलोत व इंद्रायणी नदीच्या (Indrayani river) काठी निघालोत.

sant dyaneshwar temple alandi
संत श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर

त्या काळात धर्माचे ज्ञान संस्कृत ग्रंथांमध्ये बंदिस्त होते. पण सर्वसामान्य लोकांची बोलण्याची व व्यवहाराची भाषा मात्र मराठीच होती. ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून "ज्ञानेश्वरी" हा ग्रंथ (Dnyaneshwari Granth) लिहिला. धर्माच्या ज्ञानाचे भांडार त्यांनी लोकांना खुले करून दिले. लोकांना बंधूभावाची शिकवण दिली. तरुण वयातच आळंदीमध्ये त्यांनी जिवंत समाधी घेतली. 

sant dyaneshwar temple alandi
संत श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी
(Source - Internet)

"ईश्वरावर श्रद्धा ठेवावी, सगळ्यांशी समतेने वागावे, दुःखी माणसांना मदत करावी" हा माऊलींचा उपदेश गेली 700 वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आजही घुमत आहे.
 
sant dyaneshwar temple alandi
संत श्री ज्ञानेश्वर महाराज

माऊलींच्या समाधीने पावन झालेल्या या भूमीचे वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व आहे. आषाढी वारी निमित्त माऊलींच्या पालखीसोबत हजारो वारकरी आळंदी ते पंढरपूर हा जवळपास 200 किलोमीटरचा पायी प्रवास करतात. 

sant dyaneshwar temple alandi
इंद्रायणी काठ

कार्तिक यात्रेदरम्यान संजीवन समाधी सोहळा, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांच्या भक्तीमय वातावरणात साजरा केला जातो. माऊलींच्या समाधी बरोबरच या तीर्थस्थानात अनेक मठ व मंदिरे (Alandi temples) देखील आहेत.

sant dyaneshwar temple alandi
श्री भक्त पुंडलिक आणि मारुती मंदिर

आठवणींसाठी इंद्रायणी काठी काही फोटोज काढून परतीच्या प्रवासाला लागलोत.

sant dyaneshwar temple alandi
sant dyaneshwar temple alandi

आपली धार्मिक भटकंती येथेच संपते. या सिरीजमधील अन्य ब्लॉग वाचण्यासाठी धार्मिक भटकंती येथे क्लिक करा.

याच भटकंतीचा युट्यूब व्हिडिओं पाहण्यासाठी श्री क्षेत्र आळंदी येथे क्लिक करा.

जय शिवराय

#alandi #temple #Dnyaneshwar #sanjivan #samadhi #pune #DharmikBhatkanti #SahyadriBhatkanti
Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu