तोरणा किल्ला | Torna Fort | माहिती भटकंती | प्रचंडगड | Prachandgad Fort | Velhe | Pune | Sahyadri Bhatkanti

माहिती भटकंती सिरीज - तोरणा किल्ला

पुणे जिल्ह्यातील, वेल्हे तालुक्यात वसलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले, असा तोरणा किल्ला. ह्या किल्ल्यास प्रचंडगड ह्या नावाने देखील ओळखता जाते. ह्याच किल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती आपण ह्या ब्लॉगमध्ये घेणार आहोत. 

torna fort trek

वेल्हे हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव. हे गाव पुण्यापासून ६० किमी तर मुंबईपासून जवळपास २०० किमी अंतरावर आहे. किल्ल्याला येण्यासाठी जवळील स्टेशन पुणे. स्थानकापासून आधी स्वारगेटला यावे व तेथून वेल्हे गावाला जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत. किल्ल्याची उंची (Height of the Torna Fort) जवळपास ४६०३ फूट एवढी असून, पायथा ते किल्ला गाठण्यास सुमारे दोन तास लागतात. तोरणा किल्ला ट्रेक, मध्यम श्रेणीत येत असून, सुरुवातीला सोपा वाटणारा ट्रेक, किल्ला जवळ येताच उभ्या चढाईमुळे अवघड वाटायला लागतो. 

वेल्हे गावातून गडाकडे जाणारा काँक्रिट रस्ता बनवलेला आहे व पुढे पार्किंगसाठी जागा आहे. येथून ट्रेक सुरु होतो. किल्ल्याचा आकार पाहून किल्ल्यास प्रचंडगड का म्हणतात ह्याची प्रचिती येते. हळूहळू सोपा वाटत असलेला मार्ग पुढे उभ्या चढणीचा होत जातो. 

दीड ते दोन तासाने गडाच्या प्रवेशद्वाराला आपण पोहचतो. प्रवेशद्वार मागेच तोरणजाई देवीचे मंदिर (Toranjai Devi Temple) आहे. पूर्ण गड फिरण्यासाठी २-३ तास सहज लागतात. आपण आपल्या सोयीनुसार गडावरील काही निवडक ठिकाणी देखील जाऊ शकता. अभेद्य अशी तटबंदी, झुंझार माचीकडे (Jhunjar Machi) जातानाचा थरार, किल्ल्यावरून दिसणारा राजगड व सिंहगड, तोरणेश्र्वर मंदिर (Torneshwar Temple), मेंगाई माता मंदिर (Mengai Devi Temple), कोकण दरवाजा (Kokan Darwaja), विस्तीर्ण अशी बुधला माची आणि बरच काही. बुधला माचीपासून (Budhla Machi) राजगड किल्ल्याला मार्ग जातो. राजगड किल्ला, अगदीच जवळच असल्याने किल्ल्याची तटबंदी, बालेकिल्ला, पद्मावती माची, संजीवनी माची, बुरुज, इत्यादी स्पष्ट ओळखू येतात.

याव्यतिरिक्त किल्ल्याच्या पायथ्याला तोरणा किल्ल्याचे किल्लेदार गोंदाजी भुरुक (Gondaji Bhuruk) यांचे समाधी स्थळ देखील आहे. समाधी बरोबरच येथे काही ऐतिहासिक ठेवा (दगडी शिलालेख, मुर्त्या) व भगवान महादेव आणि हनुमानाचे मंदिर देखील पाहायला मिळते.

ह्या सिरीज मधील अन्य ब्लॉग वाचण्यासाठी माहिती भटकंती येथे क्लिक करा. 

पुणे जिल्ह्यातील अन्य ब्लॉग वाचण्यासाठी पुणे येथे क्लिक करा.

#tornafort #MahitiBhatkanti #velhe #prachandgad #pune #SahyadriBhatkanti
Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu