माहिती भटकंती सिरीज - रोहिडा किल्ला/विचित्रगड
छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन आणि ज्या गडावर नरवीर बाजीप्रभू देशपांडे सारखा हिरा हिंदवी स्वराज्याला गवसला असा भोर तालुका, पुणे जिल्ह्यातील रोहिडा किल्ला (Rohida Fort). ह्याच किल्ल्याची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगमध्ये आपण घेणार आहोत.
किल्ल्याची उंची (Height of the Rohida Fort) जवळपास 3650 फूट इतकी असून रोहिडा किल्ला हा ट्रेक सोप्या श्रेणीत येतो. किल्ल्याला येण्यासाठी जवळील रेल्वे स्टेशन पुणे व तेथून पायथ्याचे बाजारवाडी (Bazarwadi village) हे गाव जवळपास 70 किमी अंतरावर आहे. पुणे स्थानकापासून आधी स्वारगेट आणि मग तेथून भोर बस स्थानकाला यावे. येथून बाजारवाडी गाव 10 किमी अंतरावर आहे व तेथे जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत.
पायथ्याच्या बाजारवाडी गावातून किल्ल्यावर एक तासाचा ट्रेक करून जाता येते. किल्ल्याला विचित्रगड (Vichitragad Fort) या नावाने देखील ओळखले जाते. किल्ला जरी लहान असला तरी भेट देण्यासारख्या किल्ल्यावर बऱ्याच गोष्टी आहेत. किल्लावर पाण्याच्या टाक्या, राजवाडा व सदरचे अवशेष, तीन दरवाजे, शिलालेख, रोहीडमल्ल भैरवनाथ मंदिर (Rohidamalla Bhairavnath temple), चुन्याचा घाणा, चोर दरवाजा, इत्यादी ठिकाणे आहेत. किल्ल्यावरील बुरुज अतिशय विशेष. फत्ते, शिरवले, दामगुडे, पाटणे, वाघजाई, सर्जा ही गडावरील बुरुजांची नावे. त्याशिवाय बाजारवाडी गावात हनुमानाचे मंदिर आणि पुरातन भैरवनाथाचे मंदिर (Ancient Bhairavnath temple) देखील आहे.
किल्ल्याच्या दक्षिणेकडे केंजळगड किल्ला (Kenjalgad Fort) आपल्या विशिष्ट आकारामुळे सहज ओळखता येतो. या किल्ल्याला लागूनच रायरेश्वराचे पठार (Raireshwar Plateaeu) आहे व त्याच पठारावर रायरेश्वर किल्ला (Raireshwar Fort) आहे. तर मागील बाजूस धोम धरण (Dhom Dam) परिसरात असलेला कमळगड किल्ला (Kamalgad Fort) देखील येथून दिसतो. बरेच ट्रेकर रोहिडा किल्ला - रायरेश्वर पठार - केंजळगड किल्ला - कमळगड किल्ला हा रेंज ट्रेक (Rohida - Raireshwar - Kenjalgad - Kamalgad Fort range trek) देखील करतात.
ह्या सिरीज मधील अन्य ब्लॉग वाचण्यासाठी
माहिती भटकंती येथे क्लिक करा.
#MahitiBhatkanti #rohidafort #bajarwadi #bhor #pune #SahyadriBhatkanti
1 Comments
😍😍😍😍😍😍😍
ReplyDelete