राजगड किल्ला | माहिती भटकंती | Rajgad Fort | Mahiti Bhatkanti | वेल्हे | पुणे | Velhe | Pune | Sahyadri Bhatkanti

माहिती भटकंती सिरीज - राजगड किल्ला

अभेद्य बालेकिल्ला, वैशिष्ट्यपूर्ण तटबंदीचे बांधकाम, नेढे सारखं निसर्गशिल्प, तीन दिशांना पसरलेल्या विस्तीर्ण माची आणि बरंच काही. "गडांचा राजा आणि राजांचा गड" म्हणून ज्या किल्ल्याची ख्याती आहे, असा किल्ले राजगड. ह्या किल्ल्याने स्वराज्याची पहिली राजधानी (First Capital of Maratha Empire or Swarajya) म्हणून मान मिळवला. दोन दशकांपेक्षा जास्त काळ स्वराज्याची राजधानी राहिलेल्या ह्या किल्ल्याला प्रत्येक भटक्याने भेट दिलीच असेल. ह्याच किल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती आपल्या "माहिती भटकंती" सिरीज मार्फत ह्या ब्लॉगमध्ये शेअर करत आहे. 


राजगडाचे अगोदरचे नाव "मुरुंबदेवाचा डोंगर" (Murumb Devacha Dongar). वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. त्यानंतर ह्या मुरुंबदेव डोंगराचे रुपांतरण एका अभेद्य किल्ल्यात करून त्यास राजगड (Rajgad Fort) नाव दिले. 

राजगड किल्ल्याला पुण्यापासून कसे जायचे? (How to reach Rajgad Fort from Pune?)
पुणे जिल्हा, वेल्हे तालुक्यातील (Velhe Taluka) हा किल्ला पुणे स्थानकापासून जवळपास 60 किमी अंतरावर आहे. किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या गुंजवणे व पाली गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी मार्ग आहेत. पुणे येथून आधी स्वारगेट येथे यावे आणि मग तेथून बसने गुंजवणे किंवा पाली गावास येता येते. 

गडावर जाणाऱ्या वाटा (Routes to trek the Rajgad Fort)
किल्ल्याची उंची (Height of the Rajgad Fort) जवळपास 1395 मीटर एवढी असून पाली गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी 1 तास लागतो तर गुंजवणे गावातून जवळपास दोन तास. दोन्हीं गावातून गडाकडे येणारा मार्ग पूर्णपणे ओळखू येईल असा असल्याने मार्ग चुकण्याची शक्यता नाही. 

पाली गावातून (Pali village) अगदी तासाभरात गडावर जाता येत असले, तरी ट्रेक मार्ग उभ्या चढाचा आणि उंच  पायऱ्यांचा असल्याने दमछाक करणारा आहे. पाली दरवाजा मार्गे गडावर प्रवेश केल्यावर पद्मावती माचीला आपण येतो. तर गुंजवणे गावातून (Gunjvane village) ट्रेक मंद चढ असलेला आहे. गावातून दोन मार्ग आहेत. एक मार्ग पद्मावती माचीवरील चोर दरवाजा (Chor Darwaja) येथे घेऊन जातो तर दुसरा मार्ग, पद्मावती आणि सुवेळा माचीच्या मध्ये असलेल्या गुंजवणे दरवाजा येथे घेऊन जातो. दोन्ही मार्गातून गडावर येताना शेवटच्या टप्प्यात थोडा चढ आहे. सहसा चोर दरवाजा मार्ग लोकांच्या जास्त पसंतीचा. राजगड किल्ला ट्रेकची श्रेणी (Easy trek grade) सोपी असून सहनशक्ती पातळी मध्यम (Moderate endurance level) आहे. 

गडावर भेट देण्याची ठिकाणे (Places to visit on the Rajgad Fort)
राजगड किल्ला म्हणजे तिन्ही दिशांना विस्तीर्ण पसरलेल्या माच्या आणि मधोमध गगनचुंबी बालेकिल्ला. पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी माची. सुवेळा आणि संजीवनी माचीच्या तटबंदीचे वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम आपल्याला माची पाहताच लक्षात येते. आपण ह्या आधी कधी राजगडाला गेला नसाल तर ह्या ब्लॉगमध्ये शेयर केलेल्या फोटोत संजीवनी माचीची दुहेरी तटबंदी पाहू शकता.

1. पद्मावती माची
पद्मावती माचीवर (Padmavati Machi) पद्मावती मातेचे मंदिर (Padmavati Devi temple) आहे. पद्मावती माचीचे नाव पद्मावती देवीच्या मंदिरावरून ठेवले आहे आणि त्याच नावाचे लहान तळे (Padmavati Lake) देखील जवळच आहे. शिवरायांनी मुरुंबदेव डोंगराचे राजगड असे नामकरण केल्यावर पद्मावती मंदिराची स्थापना केली होती असे सांगण्यात येते. पिण्यायोग्य पाण्याच स्वच्छ टाकं (Potable or drinkable water tank) देखील मंदिराला लागून आहे. त्याव्यतिरिक्त माचीवर रामेश्वर मंदिर (Rameshwar temple), सदर, राजवाडा व कचेरीचे अवशेष, दारुखाना, अंबरखाना व महाराणी सईबाई यांची समाधी (Maharani Saibai Samadhi) देखील आहे. पद्मावती आणि सुवेळा माची मधील मार्गात गुंजवणे दरवाजा (Gunjvane Darwaja) आहे व तेथे पाण्याचं टाकं देखील आहे. 

2. सुवेळा माची (Suvela Machi)
सुवेळा माची जवळ डुबा टेकडी (Duba hill), हनुमान मंदिर (Hanuman temple), नेढे (Nedhe or naturally formed hole in the rock), काळेश्वरी बुरुज (Kaleshwari Bastion), सदर, चिलखती बुरुज, तटबंदी दरवाजे, पाण्याच्या टाक्या (Water tanks) इत्यादी ठिकाणे आहेत.

3. संजीवनी माची (Sanjivani Machi)
संजीवनी माची जवळ सदर, टेहळणी बुरूज, पाण्याच्या टाक्या, तटबंदी दरवाजा, अळू दरवाजा (Alu Darwaja) इत्यादी ठिकाणे आहेत. संजीवनी माचीवरील अळू दरवाजा मार्गे तोरणा किल्ल्याला (Rajgad - Torna Fort range trek) जाता येते. 

4. बालेकिल्ला
तिन्ही माचीच्या अगदी मधोमध असलेल्या बालेकिल्ल्याची (Balekilla) चढाई थोडी कठीण आणि त्यात माकडे देखील भरपूर आहेत. बालेकिल्ल्यावर महादरवाजा, जननी देवी मंदिर (Janani Devi temple), चंद्रकोर तलाव, पाण्याच्या टाक्या, बुरुज, ब्रम्हेश्वर मंदिर (Brahmeshwar temple), बाजारपेठ, राजवाड्याचे अवशेष इत्यादी ठिकाणे आहेत.

पायथ्याची गावी व गडावर जेवण व पाणी मिळेल. तसेच कॅम्पिंगचा विचार असेल तर भाड्याने टेन्ट देखील मिळतात किंवा पद्मावती मंदिरात देखील राहू शकतात.

ह्या सीरिजमधील अन्य ब्लॉग वाचण्यासाठी माहिती भटकंती येथे क्लिक करा.

#rajgad #rajgadfort #MahitiBhatkanti #gunjvane #pune #SahyadriBhatkanti
Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu