कलावंतीण दुर्ग येथून दिसणारे माथेरान रांगेतील किल्ले व सुळके | Kalavantin Durg | Matheran Mountain Range Forts and Pinnacles | Geotags Bhatkanti | Sahyadri Bhatkanti

जियोटॅग भटकंती सिरीज - कलावंतीण दुर्ग येथून दिसणारे माथेरान रांगेतील किल्ले व सुळके

kalavantin durg

ठाकूरवाडी ते कलावंतीण दुर्ग ट्रेक (Thakurwadi village to Kalavantin Durg trek)
रात्री 9 वाजता ठाकूरवाडी गावातून (Base village for Kalavantin Durg trek - Thakurwadi) ट्रेक सुरु केला आणि एका तासात प्रबळमाची (Prabalmachi) गाव गाठले. गावात कॅम्पिंग करून दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता कलावंतीण सुळका (Kalavantin Pinnacle) चढण्यास  सुरुवात केली. अर्धा तासात सुळक्याच्या शेवटच्या टप्प्यात आलोत. ह्या चढाईसाठी गावकरी रोप बांधून काही शुल्लक दर आकारून आपल्याला सुळक्यावर चढण्यासाठी मदत करतात. आम्ही पोहचलो तेव्हा रोप बांधण्याचे काम सुरू होते. सूर्योदय होणार होता म्हणून तिथेच तो क्षण पाहत थांबलो होतोत. तेव्हा माथेरान डोंगर रांगेचा (Matheran Mountain Range) काढलेला हा फोटो. माथेरान ते मलंगगड ह्यामधील किल्ल्यांची, सुळक्यांची पूर्ण रांग दिसत होती. जवळील प्रबळगड (Prabalgad Fort) मात्र फोटोत मावत नव्हता. फोटोत दाखवल्याप्रमाणे अगदी जवळ जवळ ही ठिकाणे असून त्यापैकी बऱ्याच ठिकाणांना मी भेट दिली होती. म्हणून ह्या सुंदर दृश्याशी फार कनेक्ट करू शकलो. रात्रीचा ट्रेक, किल्ल्यावरून सूर्योदय पाहण्याचा अनुभव, हे सर्व काही पहिल्यांदा अनुभवत होतो मी. आयुष्यातील सुवर्ण दिवस.

माथेरान (Matheran)
माथेरान हे प्रसिद्ध ठिकाण. हजारो पर्यटक येथे येत असतात, विशेषतः पावसाळ्यात. आपण थेट गाडी घेऊन माथेरानला जाऊ शकता. पण माथेरान मधील पॉइंट फिरण्यासाठी मात्र गाडी घेऊन जाता येत नाही. फक्त चालत किंवा घोडा, हेच आपल्याकडील पर्याय. तसेच माथेरान मधील काही पॉइंटला ट्रेक करून देखील जाता येते. माथेरान प्रवेशद्वारातून आत आल्यावर उजव्या बाजूला एक मार्ग पॅनोरामा पॉइंटला (Panorama Point) जातो. तो पॉइंट आपल्याला फोटो मध्ये दिसेल.

पेब किल्ला किंवा विकटगड (Peb Fort or Vikatgad Fort)
माथेरान जवळच एक सुंदर किल्ला आहे. तो म्हणजे पेब किल्ला किंवा विकटगड. किल्ल्याच्या एका बाजूने माथेरान ट्रेन मार्ग (Matheran Train Route) तर दुसऱ्या बाजूला आनंदवाडी गावातून (Base village for Peb Fort trek - Anandwadi) ट्रेक मार्ग आहे. माथेरान ट्रेन मार्गाने येताना पॅनोरामा पॉईंटच्या पायथ्यापासून वळसा घालून आपण किल्ल्याला जातो. 

नाखिंड (Nakhind Ridge Trek)
पेब किल्ल्याच्या अगदी बाजूच्या डोंगरात नैसर्गिकरित्या तयार एक भौगोलिक रचना पाहायला मिळते. वर्षानुवर्ष हवेच्या खनन कार्यामुळे खडकाला पडणारे छिद्र. ज्याला नेढे (Nedhe - an naturally formed hole in the rock) बोलले जाते. हे ठिकाण प्रसिद्ध आहे नाखिंड (Nakhind) ह्या नावाने. पायथ्याच्या बेडीसगाव (Base village for Nakhind Ridge trek - Bedisgaon) येथून हा ट्रेक करता येतो. तसेच अर्ध्या मार्गात आपल्याला वाघिणीची वाडी (Waghinichi Wadi) हे गाव देखील लागते. ट्रेक सोपा जरी असला तरी वाघिणीची वाडी ते नाखिंड पर्यंतचा मार्ग अतिशय दाट जंगलातून जातो आणि पावसाळ्यात तर मार्गाचा अंदाज लावणे खूप अवघड. 

महाराष्ट्रात काही निवडक ठिकाणी नेढे सारखी भौगोलिक रचना आपण पाहिली असेल. राजगड आणि रतनगड येथील नेढे आपल्या परिचयाची असावी. तसेच माथेरान जवळील आणखी एक किल्ला, जो मोरबे धरणाला लागून आहे. तो म्हणजे इरशाळगड (Irshalgad Fort). ह्या गडावर देखील आपल्याला नेढे पाहायला मिळते. 

चंदेरी किल्ला (Chanderi Fort)
आपल्या विशिष्ट आकारामुळे चंदेरी किल्ला आणि म्हैसमाळ डोंगर (Mhaismal Hill) सहज ओळखू येतात. पायथ्याच्या चिंचावली गावातून (Base village for Chanderi Fort trek - Chinchavali) चंदेरी किल्ल्याचा ट्रेक करता येतो. किल्ल्यावरील गुहा (Caves at Chanderi Fort) पर्यंत जाणे तसे सोपे आहे. परंतु किल्ल्याच्या माथ्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत (Chhatrapati Shivaji Maharaj Statue at Chanderi Fort) जाणे कठीण आहे. आपल्या सोबत रोप व काही उपकरणे असणे आवश्यक. किल्ल्याच्या पायथ्याशी गाढेश्वर तलाव (Camping at Gadeshwar Lake) देखील आहे, जे सध्या कॅम्पिंगसाठी प्रसिद्ध होत आहे. 

ताहुली शिखर (Tahuli Peak)
ह्याच डोंगररांगेत पुढे पाहत गेल्यावर आपल्याला ताहुली शिखर, गणेश कार्तिक शिखर (Ganesh Kartik Pinnacle) आणि मलंगगड दिसतो. ताहुली शिखराचा ट्रेक पायथ्याच्या खुशिवली गावातून (Base village for Tahuli Peak trek - Khushivali) करता येतो जो अगदी ताहुली आणि मलंगगड ह्याच्या मध्ये आहे. ताहुलीला जाताना वाटेत आपल्याला गणेश कार्तिक शिखर लागतो. बारीक अंघुट्या सारखे दिसणारे हे शिखर गिर्यारोहकांना नक्कीच आकर्षित करते. 

मलंगगड (Malanggad Fort)
धार्मिक महत्त्व असलेले मलंगगड येथे जाण्यासाठी अतिशय सोपा मार्ग. पायथ्याच्या मलंगवाडी (Base village for Malanggad Fort trek - Malangwadi) गावातून गडावर जात येते. तसा हा किल्ला तीन टप्प्यात विभागला आहे. पीर माची, सोन माची आणि बालेकिल्ला. पीर माची (Peer Machi) पर्यंत अनेक भाविक येतेच असतात. पण तेथून अर्धा तासाच्या ट्रेक करून सोन माचीला (Son Machi) जाऊ शकता. इथपर्यंतचा प्रवास सोपा आहे. पण बालेकिल्ला गाठणे अवघड. त्यासाठी गिर्यारोहणाचे कौशल्य आणि त्यासाठीचे साहित्य गरजेचे. 

ह्या सिरीज मधील अन्य ब्लॉग वाचण्यासाठी Geotags Bhatkanti येथे क्लिक करा. 

रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील अन्य ब्लॉग वाचण्यासाठी रायगड आणि ठाणे येथे क्लिक करा.

#kalavantindurg #prabalgad #matheran #pebfort #vikatgad #chanderifort #mhaismal #tahulipeak #malanggad #panvel #raigad #vangani #thane #GeotagsBhatkanti #SahyadriBhatkanti
Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu