शिवरायांची राजमुद्रा | अर्थ | तत्कालीन इतिहास | Rajmudra | Meaning | Contemporary History | शिवाजी महाराजांची राजमुद्रा | Meaning of Shivaji's Rajmudra | Sahyadri Bhatkanti |

सूक्ष्म भटकंती सिरीज - शिवरायांची राजमुद्रा, त्याचा अर्थ आणि तत्कालीन इतिहास

शिवरायांची राजमुद्रा (Chhatrapati Shivaji Maharaj Rajmudra) आपल्या सर्वांना माहीतच असावी. महाराजांची जयंती, पुण्यतिथी किंवा अगदीच काही राजनीतिक रॅली दरम्यान देखील फोटो, पोस्टर, झेंडे ह्यांवर राजमुद्रेचे चित्र तर आपण नक्कीच पाहिलेच असेल. बऱ्याच लोकांना राजमुद्रेवरील मजकूर (Text of Rajmudra) जशाच तशा तोंडपाठ असावा, काहींनी वाचण्याचा प्रयत्न केला असेल तर काहींना जशाच्या तशा वाचता न आला असेल. पण जेव्हा आपण पहिल्यांदा हे वाचले असेल तेव्हा 'त्या मजकुराचा अर्थ काय आहे!' (What is the meaning of text of Rajmudra?) हा प्रश्न आपण प्रत्येकाला पडला असेल.

rajmudra

शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेचा जणू संकेतच देणाऱ्या ह्या राजमुद्रेवरील मजकुराचा अर्थ आपण आज "सूक्ष्म भटकंती" या सिरीज मार्फत जाणून घेणार आहोत. लहान पण अतिशय महत्त्वाच्या गोष्टीनं बाबत माहिती जाणून घेण्यासाठी ही सिरीज आपण सुरू केली आहे.

तत्कालीन इतिहास (Contemporary History of Rajmudra)
रायरेश्वराच्या मंदिरात घेतलेली स्वराज्य स्थापनेची शपथ, मावळ खोऱ्यातील जमवाजमव, "शिवरायांसाठी जगायचे आणि शिवरायांसाठी मरायचे" असे मानणाऱ्या तरुण मावळ्यांची साथ. आता शिवरायांच्या हालचालींना उधाण आले. आपापसातील मतभेद बाजूला करून शिवरायांच्या स्वराज्याच्या ध्येयाने भारुन गेलेले बारा मावळातील मराठे, मावळे एकत्र आले. 

शिवरायांची राजमुद्रा (Royal Seal of Chhatrapati Shivaji Maharaj)
शिवरायांच्या नावाने जहागिरीचा कारभार सुरू झाला. शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. 

या मुद्रेवरील मजकूर असा की -

प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदीता ।।
शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।

त्याचा अर्थ असा की -

"प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंद्य होणारी अशी शहाजीराजांचा पुत्र शिवाजीराजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे"

असे सांगणारी ही राजमुद्रा स्वराज्य स्थापनेचा संकेतच होती. 

त्याकाळात राजमुद्रा बहुधा फारसी भाषेत कोरलेल्या असतं, पण शिवरायांची राजमुद्रा संस्कृत भाषेत (Rajmudra's text in Sanskrit language) होती. खोल गर्भित अर्थ असलेली ही राजमुद्रा तयार करणाऱ्या शहाजीराजांचे विचार आणि बुद्धिवैभव सहज लक्षात येते. मुद्रेतला प्रत्येक शब्द विचारपूर्वक मांडण्यात आला होता. त्या मुद्रेतून महाराजांचे भविष्यातील ध्येय आणि हेतू निश्चित झाले. स्वराज्य हवे तशी स्वभाषा हवी, स्वधर्म हवा, दुसऱ्या धर्माचा द्वेष देखील नको आणि शिवरायांनी आपला कारभार लोककल्याणासाठीच सुरू केला आहे, हे साऱ्या जनतेला कळले. 

स्वराज्याचे तोरण
किल्ल्यांशिवाय कसले आहे स्वराज्य! ज्याचे किल्ले त्याचे राज्य! किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता चालते. तेव्हा लवकरच एखादा भक्कम किल्ला हस्तगत केला पाहिजे असे शिवरायांनी ठरवले आणि पुढील काळात तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले.

या सिरीज मधील अन्य ब्लॉग वाचण्यासाठी Sukshma Bhatkanti येथे क्लिक करा.

#rajmudra #meaning #shivajimaharaj #shahajiraje #SukshmaBhatkanti #SahyadriBhatkanti
Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu