चावंड किल्ला | प्रसन्नगड | माहिती भटकंती | Chawand Fort | Prasannagad | Information | जुन्नर | पुणे | Junnar | Pune | Sahyadri Bhatkanti

माहिती भटकंती सिरीज - चावंड किल्ला /प्रसन्नगड

chawand fort junnar

पुणे स्थानकापासून (Nearest railway station - Pune) जवळपास 110 किमी आणि जुन्नरपासून 15 किमी अंतरावर असलेला चावंड किल्ला उर्फ प्रसन्नगड (Chavand Fort or Prasannagad Fort). तसे आणखीन बऱ्याच नावाने हा किल्ला ओळखला जातो. जसे की चामुंडगड, चावंडस, चामुंडगिरी, इत्यादी. किल्ल्याच्या पायथी "चावंड" नावाची छोटीशी वस्ती (Base village - Chawand) आहे. पुणे किंवा स्वारगेटपासून एसटीने आधी जुन्नर गाठावे आणि जुन्नरपासून पुन्हा एसटीने चावंड गावी जाता येतं. याच गावाच्या घरांच्या मधून जाणाऱ्या वाटेवर वनविभागाने बांधलेल्या पायरी मार्गाने गडावर पोहचता येते. 

किल्ल्याची उंची जवळपास 3400 फूट (Height of the Chawand Fort) इतकी असून पायथ्यापासूनची उंची जवळपास 650 फूट इतकी आहे. चावंड किल्ला ट्रेक सोप्या श्रेणीत (Trek grade - Easy) येत असून पायथ्यापासून किल्ल्यावर पोहोचण्यास अर्धा ते पाऊणतास पुरेसा. नळीच्या वाटेने वर आल्यावर कमानीखाली श्रीगणेश कोरलेले गडाचे प्रवेशद्वार आपले स्वागत करते. 

किल्ल्यावर पाहण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. ज्यात सदर व वाड्याचे अवशेष, पुष्कळ पाण्याच्या टाक्या, पुष्करणी व तेथील शिवालय (Pushkarni lake and Shiva temple), पुरातन शौचालय, किल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणी असलेले चावंडा मातेचे मंदिर, सप्तमातृका टाक्यांचा समूह (Saptamatruka water tanks), गुहा (Caves of Chawand Fort), तोफगाडा, विहीर, इत्यादींचा समावेश होतो. त्याव्यतिरिक्त किल्ल्यावरून वऱ्हाडी डोंगरे (Varhadi Pinnacles), निमगिरी किल्ला व हनुमंतगड (Nimgiri Fort and Hanumantgad Fort), हडसर किल्ला (Hadsar Fort) आणि माणिकडोह जलाशयाचा (Manikdoh Dam Reservoir) परिसर नजरेस येतो. 

आपल्याकडे वेळ असेल तर किल्ल्यापासून अगदीच 4 किमी अंतरावर असलेले कुकडेश्वर मंदिर (Kukdeshwar Temple, Junnar) नक्की पहा. तसेच रेंज ट्रेक (Junnar Range trek) करण्याचा विचार असेल तर नाणेघाट - जीवधन किल्ला - निमगिरी किल्ला व हनुमंतगड - हडसर किल्ला - शिवनेरी किल्ला - लेण्याद्री अशी बरीच ठिकाणे जवळपास आहेत.

ह्या सीरिजमधील अन्य ब्लॉग वाचण्यासाठी माहिती भटकंती येथे क्लिक करा.

जय शिवराय 🚩

#chawandfort #prasannagad #chawand #junnar  #MahitiBhatkanti #SahyadriBhatkanti
Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu