माहिती भटकंती सिरीज - जीवधन किल्ला (Jivdhan Fort)
नाणेघाट हा सातवाहन कालीन व्यापारी मार्ग. जुन्नर आणि कोंकण ह्यांना जोडणारा हा घाट. ह्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी अनेक किल्ले बांधण्यात आले. त्यापैकी एक आणि नाणेघाटाचा पाठीराखा म्हणजेच जीवधन किल्ला (Jeevdhan Fort). ह्याच किल्ल्याची थोडक्यात माहिती आपल्या "माहिती भटकंती" सिरीज मार्फत आपण घेणार आहोत.
जीवधन किल्ल्याला कसे जायचे ? (How to reach Jivdhan Fort?)
किल्ल्याला येण्यासाठी पुणे हे जवळील रेल्वे स्टेशन. पुणे येथून येणार असाल तर जुन्नर मधील घाटघर (Ghatghar - Base village for Jivdhan Fort trek) पासून हा ट्रेक आपण करू शकतो. पुणे ते जुन्नर आणि जुन्नर ते घाटघर, असा एसटीचा प्रवास करावा लागतो. त्याव्यतिरक्त वैशाखरे (Vaishakhare - Base village for Naneghat trek) ह्या गावातून नाणेघाट ट्रेक करा आणि मग जीवधन किल्ल्याला देखील जाऊ शकता.
जीवधन किल्ल्यावर जाणाऱ्या वाटा (Trek routes for Jivdhan Fort)
गडावर जाण्यास जवळपास एक तास लागतो. ट्रेक सोपी ते मध्यम श्रेणीत (Jivdhan Fort trek grade - Easy to medium) येतो. किल्ल्याची उंची जवळपास 3757 फूट (Height of the Jivdhan Fort) एवढी असून घाटघर हे पायथ्याचे गाव. गडावर जाण्याच्या दोन वाटा आहेत. दोन्हीही वाटांसाठी घाटघर येथून मार्ग आहे.
पहिला मार्ग म्हणजे घाटघर येथून कल्याण दरवाजा मार्गे (Jivdhan Fort trek via Kalyan Darwaza) गडावर जाणे. सुरूवातीचा मार्ग दाट जंगलातून जातो. त्यानंतर मात्र दमछाक करणाऱ्या पायऱ्यांचा मार्ग आहे. पायऱ्या तुटलेल्या असल्या तरी रेलिंग असल्याने सुरक्षित वाटते. ह्या पायऱ्या थेट आपल्याला कल्याण दरवाजा पर्यंत घेऊन जातात. पण दरवाजा जवळची शेवटची चढाई करण्यासाठी थोडी मशगत करावी लागते.
दुसरा मार्ग म्हणजे घाटघर पासून किल्ल्याला थोडा वळसा घालून जुन्नर दरवाजा मार्गे (Jivdhan Fort trek via Junnar Darwaza) गडावर जाणे. दरवाजाची पूर्णपणे पडझड झालेली आहे. फार कमी पर्यटक ह्या मार्गाचा वापर करतात.
गडावर पाहण्याची ठिकाणे (Places to visit on Jivdhan Fort)
भक्कम आणि सुस्थितीत असलेला कल्याण दरवाजा, पडझड झालेला जुन्नर दरवाजा, गुहा, धान्य कोठार, पाण्याच्या टाक्या, बालेकिल्ला येथील जिवाईदेवी मंदिर (Jivai Devi Temple), मनात धडकी भरवणारा वानरलिंगी सुळका (Vanarlingi Pinnacle at Jivdhan Fort), इत्यादी.
पावसाळ्यातील येथील वातावरण तर काही औरच असते. त्यात नाणेघाट जवळील रिव्हर्स धबधबा (Reverse Waterfall at Naneghat) सध्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनलेले आहे. त्यामुळे पावसाळ्यात घाटघर परिसरात पर्यटकांची तुडुंब गर्दी असते. ज्यामुळे स्थानिकांना त्याचा फायदा होत आहे. येथे राहण्याची खाण्याची सर्व सोयी स्थानिकांद्वारे येथे उपलब्ध केलेल्या आहेत.
वानरलिंगी सुळका म्हणजे महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील गिर्यारोहकांसाठी एक आव्हाहन. त्यामुळे अधून मधून रॉक क्लाइंबिंगचा, व्हॅली क्रोसिंगचा (Valley crossing at Jivdhan Fort) थरार येथे आपल्याला पाहायला मिळेल.
जवळील अन्य पर्यटन स्थळे (Places to visit in Junnar region)
आजूबाजूच्या भागात बरेच किल्ले, ट्रेकिंग पॉइंट, पर्यटन स्थळे आहेत. जुन्नर भागात रेंज ट्रेक (Junnar Range Trek) करायचा विचार असेल तर चावंड किल्ला - नाणेघाट - जीवधन किल्ला - निमगिरी व हनुमंतगड - हडसर किल्ला - शिवनेरी किल्ला असे बरेच पर्याय आपल्याकडे आहेत. जर आपल्याकडे वेळ असेल तर अन्य काही पर्यटन स्थळे जसे की चावंड किल्ल्याजवळील कुकडेश्वर मंदिर, माणिकडोह धरणाचा विस्तीर्ण जलाशय, जुन्नर भागातील लेणी समूह, इत्यादी ठिकाणांना देखील भेट देऊ शकता.
ह्या सिरीज मधील अन्य ब्लॉग वाचण्यासाठी माहिती भटकंती येथे क्लिक करा.
पुणे जिल्ह्यातील ब्लॉग वाचण्यासाठी पुणे येथे क्लिक करा.
जय शिवराय
#jivdhanfort #jeevdhanfort #ghatghar #naneghat #MahitiBhatkanti #junnar #pune #SahyadriBhatkanti
0 Comments