लखनऊ भटकंती सिरीज - भाग तिसरा
नवाब वाजिद अली शाह प्राणी उद्यान
लखनऊ भटकंती या सिरीज अंतर्गत लखनऊ मधील प्रसिद्ध पर्यटन स्थळांची आपण भटकंती करत आहोत. "नवाबो का शहर" म्हणून ओळखले जाणारे लखनऊ जसे उत्कृष्ट ऐतिहासिक वास्तूसाठी प्रसिद्ध, तसेच येथील प्राणी संग्रहालयासाठी (Nawab Wajid Ali Shah Zoo) देखील प्रसिद्ध. अनेक जाती-प्रजातींचे प्राणी, पक्षी, मासे, ऐतिहासिक ठेवा असलेले वस्तुसंग्रहालय, तसेच पॅडल बोटची छोटी सफर आणि बटरफ्लाय पार्कमध्ये फुलपाखरांसोबत घालवलेले काही अविस्मरणीय क्षण हे सर्व काही ह्या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत.
प्राणी उद्यान पाहायला वेळ अपुरा पडू नये म्हणून सकाळी लवकरच उद्यानाकडे निघालोत. तिकीट काढले व संग्रहालय पाहण्यास आम्ही सुरुवात केली. पूर्ण दिवसही अपुरा पडावा इतके काही आम्हाला या प्राणी संग्रहालयात पाहायला व अनुभवास मिळाले.
|
उद्यानाचा नकाशा |
प्रत्येक प्राण्याविषयीची (Animals of Lucknow Zoo) थोडक्यात माहिती असलेला फलक येथे लावलेला आहे. जिराफ, हरीण, झेब्रा, वाघ, सिंह, बिबट्या, पाणघोडा, शहामृग, अस्वल, माकडे असे बरेच प्राणी आणि त्याचबरोबर साप, कासव, मगर हे देखील संग्रहालयात आहेत.
|
उद्यानातील काही प्राणी |
घुबडांच्या वेगवेगळ्या जाती-प्रजाती दाखवण्यासाठी एक वेगळे घुबड घर (Owl House at Lucknow Zoo) देखील येथे आहे.
|
घुबड घर |
अनेक प्रकारची पक्षी येथील पक्षी घरात (Bird Houseat Lucknow Zoo), तर रंगबिरंगी मासे (Aquarium at Lucknow Zoo) येथील मत्स्यालयात आपल्याला पाहायला मिळतील.
|
पक्षी घरातील काही पक्षी |
|
मत्सालय |
येथील वस्तुसंग्रहालय (State Museum at Lucknow Zoo) म्हणजे इतिहास, कला व विशेषतः पुरातत्व विभागात रुची असणाऱ्या लोकांसाठी खजिनाच. जैन, बुद्ध, हिंदू अशा विविध धर्मातील अनेक प्राचीन वास्तू या संग्रहालयात पाहायला मिळतील.
|
प्राचीन वास्तू |
त्याचप्रकारे इजिप्तची संस्कृतीचा (Egyptian Culture at Lucknow Zoo) देखावा देखील येथे आपल्याला पाहायला मिळेल.
|
इजिप्तची संस्कृती |
जुन्या काळातील अस्त्र, शस्त्र, धातू (Weapons and Metals of Ancient times at Lucknow Zoo) ही देखील येथे आहेत. तसेच भारतातील वेगवेगळ्या साम्राज्यात चालत असलेली नाणी (Coins of Ancient times at Lucknow Zoo) यांचा एक संग्रह देखील येथे आहे.
|
जुन्या काळातील शस्त्र |
विरंगुळा म्हणून पॅडल बोटची सफारी (Paddle Boat at Lucknow Zoo) देखील आम्ही इथे केली.
|
पॅडल बोट |
आमच्या या दिवसभराच्या भटकंतीतील सर्वात अविस्मरणीय क्षण राहिला तो म्हणजे बटरफ्लाय पार्क (Butterfly Park at Lucknow Zoo). अन्य ठिकाणी पिंजरातील प्राणी, पक्षी, एक तर आम्हाला घाबरत होते किंवा आम्ही त्यांना. इथे मात्र चित्र वेगळेच होते.
|
बटरफ्लाय पार्क |
येथील फुलपाखरांना पर्यटक आपल्याला इजा पोहोचवणार नाही याची खात्री तर होतीच, पण जेव्हा आपण त्यांना स्पर्श करतो तेव्हा हे पर्यटक मायेने आपल्यावरून हात फिरवत आहेत, अशी काहीशी भावना असल्याचे वाटत असावे.
|
बटरफ्लाय पार्क |
थोडा नाश्ता करून परतीच्या मार्गाला लागलोत.
लखनऊ भटकंती सिरीज मधील अन्य ब्लॉग वाचण्यासाठी लखनऊ भटकंती येथे क्लिक करा.
जय शिवराय
#lucknowzoo #lucknow #zoo #wajidali #chidiyaghar #uttarpradesh #LucknowBhatkanti #BharatBhatkanti #SahyadriBhatkanti
0 Comments